Mohammad Kaif said Hardik Pandya started taking responsibility: भारताचा माजी फलंदाज मोहम्मद कैफने हार्दिक पांड्याचे खूप कौतुक केले आहे. हा भारतीय अष्टपैलू खेळाडू आता जबाबदारी घ्यायला शिकला असल्याचे कैफचे म्हणणे आहे. आशिया चषक २०२३ च्या सामन्यात हार्दिकने पाकिस्तानविरुद्ध (भारत विरुद्ध पाकिस्तान) शानदार अर्धशतक झळकावले होते. शनिवार 2 सप्टेंबर रोजी झालेल्या सामन्यात हार्दिकने ८७ धावांची खेळी करत भारतीय संघाला संकटातून बाहेर काढले होते.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

हार्दिकने जेव्हापासून आयपीएलचे कर्णधारपद सांभाळायला सुरुवात केली, तेव्हापासून तो अधिक जबाबदारीने खेळत असल्याचेही कैफचे मत आहे. हार्दिक पांड्या इंडियन प्रीमियर लीगमध्ये गुजरात टायटन्सचा कर्णधार आहे. पाकिस्तानविरुद्धच्या सामन्यात हार्दिकच्या खेळीमुळे भारताला २६६ धावांपर्यंत मजल मारता आली. श्रीलंकेतील कँडी येथे झालेला हा सामना पावसामुळे पूर्ण होऊ शकला नाही. पावसामुळे पाकिस्तानी संघाचा डाव सुरू होऊ शकला नाही.

मोहम्मद कैफ म्हणाला, “हार्दिकमध्ये हा बदल गुजरात टायटन्सचा कर्णधार झाल्यानंतर झाला. तो जबाबदारी घ्यायला शिकला आहे. तो तिसऱ्या आणि चौथ्या क्रमांकावर खेळायचा. सर्वात मोठी गोष्ट म्हणजे परिस्थितीनुसार स्वतःला कसे साचेबद्ध करायचे, हे हार्दिकने शिकले आहे.”
हार्दिक जेव्हा फलंदाजीला आला तेव्हा भारतीय संघाची अवस्था खूपच वाईट होती. पांड्या आला तेव्हा भारताची धावसंख्या चार विकेटवर ६६ धावा होती. यानंतर त्याने इशान किशनसोबत आशिया कपच्या इतिहासातील पाचव्या विकेटसाठी सर्वात मोठी भागीदारी केली. दोघांनी मिळून १३८ धावा जोडल्या.

हेही वाचा – AFG vs BAN: २३ वर्षीय गोलंदाजाच्या ‘या’ कृतीवर संतापला अफगाणिस्तानचा फलंदाज, पाहा VIDEO

कैफ पुढे म्हणाला, “जेव्हा तो पाचव्या आणि सहाव्या क्रमांकावर खेळतो, तेव्हा तो मोठे शॉट्स मारते. जेव्हा तो तिसऱ्या किंवा चौथ्या क्रमांकावर खेळतो तेव्हा त्याला भागीदारी करावी लागते हे त्याला माहीत असते. त्यामुळे तो वेळ घेतो. त्यांनी शनिवारी हे करुन दाखवले. कारण हार्दिक जेव्हा खेळायला आला तेव्हा परिस्थिती खूपच वाईट होती.”माजी खेळाडू म्हणाला की, पांड्याने संयमाने फलंदाजी केली आणि फक्त क्रिकेटींग शॉट्स खेळले. तो म्हणाला की, हार्दिकलाही स्पिनविरुद्ध कसे खेळायचे हे चांगले माहित आहे. पांड्याने पाकिस्तानविरुद्धच्या पाच सामन्यात एकूण २०९ धावा केल्या आहेत. त्याची फलंदाजीची सरासरी ६९.६६ आहे.

हेही वाचा – India vs Nepal: नेपाळविरुद्ध टीम इंडिया ‘या’ प्लेइंग इलेव्हनसह उतरू शकते मैदानात, मोहम्मद शमी घेणार बुमराहची जागा?

कैफ म्हणाला, “भारतीय संघ खूप दबावाखाली होता. त्याने संयमाने फलंदाजी केली आणि क्रिकेटच्या पुस्तकातील शॉट्स मारले. त्याने नंतर षटकार मारला पण डावाच्या सुरुवातीला त्याने कमी जोखीम घेतली. त्याला फिरकी कशी खेळायची हे माहीत आहे. त्याला पूल आणि ड्रायव्ह कसे खेळायचे हे माहीत आहे. तसेच त्याने आज कट कसा खेळायचा हे पण शिकवलं. त्याने मॅचमध्ये स्कूपही खेळला.”

मराठीतील सर्व क्रीडा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Mohammad kaif said hardik pandya started taking responsibility after becoming the captain of gujarat titans vbm
Show comments