Champions Trophy 2025 Mohammad kaif reaction Pant and Samson : भारतीय संघाचा स्टार यष्टीरक्षक-फलंदाज ऋषभ पंतने आपल्या खेळाने सर्वांना प्रभावित केले आहे. मात्र, ऑस्ट्रेलिया दौऱ्यात त्याला आपली छाप सोडता आली नाही. ऋषभ पंतने कसोटी क्रिकेटमध्ये चांगली कामगिरी केली आहे. एकदिवसीय सामन्यांमध्ये तो अधिक यशस्वी ठरला आहे. आयपीएलमध्ये दिल्ली कॅपिटल्सचे सहाय्यक प्रशिक्षक म्हणून काम करणाऱ्या मोहम्मद कैफने ऋषभ पंत एक सल्ला दिला आहे. ज्यामध्ये ऋषभने कोणापासून दूर राहावे, हेही त्याने सांगितले आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

पंतने आपल्या आजूबाजूच्या लोकांना काळजीपूर्वक निवडावे –

चॅम्पियन्स ट्रॉफीसाठी २०२५ साठी भारताचा संघ अद्याप जाहीर झालेला नाही. शक्यतो आज संघाची घोषणा होऊ शकते. यामध्ये पंतसोबत संजू सॅमसनला संधी मिळणार का याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. पाहिले तर अलीकडच्या काळात सॅमसनने मर्यादित षटकांमध्ये पंतपेक्षा चांगली कामगिरी केली आहे. त्यामुळेच त्याचे नाव चर्चेत आहे. मात्र, मोहम्मद कैफ त्याच्या यूट्यूब चॅनलवर म्हणाला की, पंतच्या आधी संजूला प्राधान्य द्यायला हवे. त्याचबरोबर पंतने आपल्या आजूबाजूच्या लोकांना काळजीपूर्वक निवडावे, असेही तो म्हणाला.

ऋषभ पंतने वास्तव ओळखण्याची गरज –

माजी क्रिकेटपटू मोहम्मद कैफ पुढे म्हणाला, “ऋषभ पंतने वास्तव ओळखण्याची गरज आहे. जर कोणी त्याला सांगत असेल की त्याच्यावर अन्याय झाला आहे, तर तो खरं बोलत नाही. पंतने अशा मित्रांपासून दूर राहिले पाहिजे. कोणीतरी त्याला सांगावे की, त्याचे मर्यादित षटकांचे आकडे चांगले नाहीत. संजूने चॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये आपले स्थान निश्चित केले आहे. पंतला कठोर परिश्रम घ्यावे लागतील. संजू सॅमसनने खूप मोठा पल्ला गाठला आहे. पण तुम्हाला हे समजले पाहिजे की लोकांच्या भावना पंतशी जोडलेल्या आहेत. तो एक कसोटीतील मोठा मॅचविनर आहे.”

हेही वाचा – PAK vs WI : बाबर आझमच्या मूर्खपणावर चाहते संतापले, आऊट झाल्यानंतरही वाया घालवला DRS

यष्टिरक्षणामध्ये पंत संजूपेक्षा सरस –

फक्त फलंदाजीचा विचार केला तर संजू पंतच्या पुढे आहे, पण यष्टिरक्षणामध्ये पंत संजूपेक्षा सरस आहे, असे कैफचे मत आहे. माजी क्रिकेटपटू पुढे म्हणाला, “गाबा येथे खेळलेली त्याची खेळी आणि दक्षिण आफ्रिकेत त्याने झळकावलेले शतक कोणीही विसरू शकत नाही. त्याने परदेशातील कसोटी सामन्यांध्ये चांगली कामगिरी केली आहे. तसेच पंत हा संजूपेक्षा चांगला यष्टिरक्षक आहे. तो एमएस धोनीच्या पातळीपर्यंत पोहोचला आहे. पण फलंदाजीचा विचार केला तर संजू खूप पुढे गेला आहे. तो शानदार फलंदाजी करत आहे. दक्षिण आफ्रिकेत त्याने जबरदस्त शतक झळकावले होते. त्याने अधिक फटकेबाजी केली. तो चौकारांपेक्षा अधिक षटकार मारतो.”

मराठीतील सर्व क्रीडा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Mohammad kaif says sanju samson should be picked ahead of rishabh pant for champions trophy 2025 squad vbm