ICC Cricket World Cup 2023, Pakistan vs Netherlands: एकदिवसीय विश्वचषक २०२३ स्पर्धेतील दुसऱ्या सामन्यात, पाकिस्तान आणि नेदरलँड संघ आमनेसामने आले. या सामन्यात पाकिस्तानी फलंदाज मोहम्मद रिझवान आणि सौद शकील यांच्या नावावर विशेष कामगिरी नोंदवण्यात आली आहे. एकदिवसीय विश्वचषकात पदार्पण करणारे रिझवान आणि शकील एका स्पेशल क्लबमध्ये सामील झाले.

मोहम्मद रिझवान आणि सौद शकीलने झळकावली अर्धशतकं –

एकदिवसीय विश्वचषकाच्या पदार्पणाच्या सामन्यात मोहम्मद रिझवान आणि सौद शकील यांनी अर्धशतकं झळकावली. विश्वचषकाच्या पदार्पणाच्या सामन्यात दोन फलंदाजांनी एकत्र अर्धशतके झळकावून एका खास क्लबमध्ये स्थान मिळवले. यापूर्वी, दोनदा पाकिस्तानच्या दोन खेळाडूंनी वनडे विश्वचषक पदार्पणाच्या एकाच सामन्यात अर्धशतकं झळकावली होती. या सामन्यात मोहम्मद रिझवान आणि सौद शकील यांनी ६८-६८ धावांची खेळी केली.

पाकिस्तानसाठी विश्वचषक पदार्पणात एकाच सामन्यात दोन अर्धशतके झळकावणारे फलंदाज –

माजिद खान आणि आसिफ इक्बाल विरुद्ध ऑस्ट्रेलिया- १९७५
मिसबाह उल हक आणि उमर अकमल विरुद्ध केनिया, २०११
मोहम्मद रिझवान आणि सौद शकील विरुद्ध नेदरलँड्स, २०२३

हेही वाचा – World Cup 2023, PAK vs NED: विश्वचषकाच्या पहिल्याच सामन्यात पाकिस्तानच्या फलंदाजांची दमछाक, नेदरलँडसमोर ठेवले २८७ धावांचे लक्ष्य

याशिवाय, मोहम्मद रिझवानने एकदिवसीय विश्वचषकात पदार्पणाच्या सामन्यात पाकिस्तानसाठी पाचव्या क्रमांकाची सर्वोच्च धावसंख्या नोंदवली. त्याचबरोबर यष्टीरक्षक म्हणून त्याने विश्वचषकात दुसऱ्या क्रमांकाची सर्वोच्च धावसंख्या नोंदवली.

पाकिस्तानसाठी विश्वचषक पदार्पणात सर्वोच्च धावसंख्या नोंदवणारे फलंदाज –

८२ – मोहसीन खान विरुद्ध श्रीलंका, १९८३
७८* – असद शफीक विरुद्ध झिम्बाब्वे, २०११
७६ – रमीझ राजा विरुद्ध श्रीलंका, १९८७
७१ – उमर अकमल विरुद्ध केनिया, २०११
६८ – मोहम्मद रिझवान विरुद्ध नेदरलँड्स, २०२३
६८ – सौद शकील विरुद्ध नेदरलँड्स, २०२३

हेही वाचा – Asian Games: भारतीय पुरुष हॉकी संघाने रचला इतिहास, ९ वर्षांनी सुवर्णपदकावर कोरले नाव

विश्वचषकातील पाकिस्तानच्या यष्टीरक्षकांची सर्वोत्तम वैयक्तिक धावसंख्या –

१०१* – सरफराज अहमद विरुद्ध आयर्लंड, अॅडलेड, २०१५
६८ – मोहम्मद रिझवान विरुद्ध नेदरलँड्स, हैदराबाद, २०२३
६३ – मोईन खान विरुद्ध दक्षिण आफ्रिका, नॉटिंगहॅम, १९९९
५९ – उमर अकमल विरुद्ध वेस्ट इंडीज, क्राइस्टचर्च, २०१५
५६ – सलीम युसूफ विरुद्ध वेस्ट इंडिज, लाहोर, १९८७

Story img Loader