Mohammad Rizwan Love Story: टी२० वर्ल्ड कप २०२४ स्पर्धेत काल भारत-पाकिस्तानमध्ये रोमांचक सामना झाला. शेवटच्या ४५ मिनिटात टीम इंडियाने फक्त सामनाच जिंकला नाही, तर क्रिकेट चाहत्यांना खेळाचा सर्वोत्तम थरार अनुभवता आला. टीम इंडियाने पाकिस्तान विरुद्ध मिळवलेला हा विजय खूप खास आहे. दरम्यान यासगळ्यात चर्चा सुरु आहे ती मोहम्मद रिझवान याच्या कधीही समोर न आलेल्या लव्ह स्टोरीची..पाकिस्तान क्रिकेट संघाचा यष्टिरक्षक-फलंदाज मोहम्मद रिझवान हा स्वत:च्या वैयक्तीक आयष्याबद्दल फारसं बोलत नाही. तो त्याच्या वैयक्तिक आयुष्याबद्दल कधीच काही बोलत नाही. सामान्यतः क्रिकेटपटू त्यांच्या खेळाविषयी आणि वैयक्तिक आयुष्याविषयी अनेकदा माहिती सोशल मीडियावर शेअर करतात, पण रिझवानच्या बाबतीत असे नाही आणि तो या प्लॅटफॉर्मवर क्रिकेटशिवाय इतर कोणतीही माहिती शेअर करत नाही.
सोशल मीडियावर त्याच्या कुटुंबाचा किंवा पत्नीचा फोटोही नाही, पण तुम्हाला माहिती आहे का की रिजवाननेही प्रेमविवाह केला होता आणि त्याने आपले प्रेम मिळवण्यासाठी बराच वेळ वाट पाहिली. ३२ वर्षांच्या मोहम्मद रिझवानने टी-ट्वेंटी वर्ल्ड कपपूर्वी त्याच्या खासगी आयुष्याबद्दल म्हणजेच लव स्टोरीचा खुलासा केला होता
“मी माझे प्रेम मिळवण्यासाठी ८ वर्षे वाट पाहिली”
मोहम्मद रिजवान ३२ वर्षांचा असून त्याने २०१५ मध्ये लग्न केले होते. त्याला ज्या मुलीशी लग्न करायचे होते तिचे कुटुंबीय त्यासाठी तयार नव्हते, पण रिजवानने करणार तर तिच्याशीच असा निर्धार केला होता आणि त्यासाठी त्यानं ८ वर्ष वाट पाहिली. याच काळात रिझवान दिवसातून ५ वेळा नमाजमध्ये प्रार्थना करत असल्याचं तो सांगतो. माझं प्रेम मला मिळावं यासाठी तो दररोज प्रार्थना करत असायचा. अखेर घरचे लग्नाला तयार झाले अन् रिझवानला त्याचं प्रेम मिळालं. रिझवानने २०१५ मध्ये धुमधडाक्यात लग्न केलं. रिझवान आता दोन मुलांचा बाप आहे.
टी २० विश्वचषक २०२४ दरम्यान केला लव्ह स्टोरीचा खुलासा
रिझवानने अलीकडेच टी २० विश्वचषक २०२४ दरम्यान त्याच्या व्ह स्टोरीचा खुलासा केला. अमेरिकेतील एका कार्यक्रमादरम्यान त्याने आपल्या लव्ह लाईफबद्दल सर्व काही सांगितले. रिझवानचा त्याच्या देवावर खूप विश्वास आहे आणि त्याने सांगितले की देवाने त्याचा विश्वास आणि त्याची प्रार्थना व्यर्थ जाऊ दिली नाही आणि त्याची इच्छा पूर्ण झाली. रिझवान जेव्हा त्याच्या वैयक्तिक आयुष्याबद्दल सांगत होता, तेव्हा पाकिस्तान क्रिकेट संघाचा कर्णधार बाबर आझमही तिथे उपस्थित होता.