Mohammad Rizwan says I want to be the captain of the team not the king : पाकिस्तानच्या मर्यादित षटकातील संघांचा नवा कर्णधार म्हणून मोहम्मद रिझवानची नियुक्ती करण्यात आली आहे. इंग्लंडविरुद्धच्या दोन कसोटी सामन्यांसाठी पाकिस्तानच्या संघातून वगळलेले बाबर आझम, नसीम शाह आणि शाहीन शाह आफ्रिदी या त्रिकुटाचे आगामी ऑस्ट्रेलिया दौऱ्यासाठी निवडलेल्या पाकिस्तान संघात पुनरागमन झाले आहे. मात्र, ऑस्ट्रेलियानंतर झिम्बाब्वेमध्ये होणाऱ्या वनडे आणि टी-२० मालिकेसाठी निवडलेल्या संघात या तिघांचाही समावेश करण्यात आलेला नाही. अशात पाकिस्तानच्या वनडे आणि टी-२० संघांच्या कर्णधारपदी नियुक्ती झाल्यानंतर मोहम्मद रिझवानने मोठे वक्तव्य केले आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

‘राजा नव्हे तर कर्णधार बनण्याचा प्रयत्न करणार’ –

कर्णधारपदी नियुक्ती झाल्यानंतर मोहम्मद रिझवान म्हणाला, “जर मी स्वत:ला एक कर्णधार म्हणून किंग समजू लागलो, तर सर्व काही विस्कटून जाईल. त्याऐवजी, एक लीडर म्हणून मी संघातील १५ लोकांची सेवा करण्यासाठी आलो आहे. हे असेच झाले पाहिजे. आमच्याकडे यशाबद्दल सर्वांचे संदेश आणि समर्थन आहे, जे आम्हाला फक्त एकच सांगत आहेत, लढा, लढा आणि लढा. ते आम्हाला तोच संदेश वारंवार पाठवत आहेत आणि आम्ही सर्व देशाला दाखवून देण्याचा सर्वतोपरी प्रयत्न करू की आमच्यात लढण्यासाठी कोणतीही कमतरता नाही.”

स्टार फलंदाज बाबर आझमला पाकिस्तानच्या क्रिकेटचा किंग म्हटले जाते, अशात मोहम्मद रिझवानचे वरील विधान चकित करणारे आहे. कारण रिझवान एके काळी त्याच्या नेतृत्त्वाखालील संघाचा उपकर्णधार होता आणि त्याला वजीर समजले जायचे. बरं, आता सर्वकाही बदलले आहे. बाबर आझम फॉर्मशी झगडत असून तो खेळाडू म्हणून संघात आहे. यासोबतच पाकिस्तान क्रिकेट बोर्डाने (PCB) पाकिस्तान पुरुष क्रिकेटसाठी केंद्रीय कराराची नवीन यादीही जारी केली आहे. रिझवान व्यतिरिक्त बाबरने अ श्रेणीत आपले स्थान कायम राखले आहे. मात्र, शाहीन शाह आफ्रिदीला अ ऐवजी ब श्रेणीत ठेवण्यात आले आहे. शान मसूदच्या नेतृत्वाखालील पाकिस्तानने इंग्लंडविरुद्धची कसोटी मालिका जिंकून देखील त्याला ब श्रेणीत कायम ठेवले आहे.

हेही वाचा – Radha Yadav : राधा यादवच्या चित्ताकर्षक कॅचने चाहत्यांच्या डोळ्यांचे फेडले पारणे, VIDEO होतोय व्हायरल

बाबर आझमला पाठिंबा देणाऱ्या फखर जमान करारातून डच्चू –

फखर जमानने आठ वर्षांत प्रथमच पीसीबीचा केंद्रीय करार गमावला आहे. त्याच्या तंदुरुस्तीबद्दल शंका होती पण अलीकडेच पीसीबीसोबतच्या त्यांच्या नात्यात कटूता आली होती. कारण त्याने बाबरच्या समर्थनार्थ पोस्ट करताना पीसीबीवर टीका केला होती. त्यामुळे पीसीबीने फखरला कारणे दाखवा नोटीस बजावली होती फखरशिवाय इमाम उल हकनेही केंद्रीय करार गमावला असून त्याला कोणत्याही संघात स्थान देण्यात आलेले नाही. मात्र, पाकिस्तानचा ऑस्ट्रेलिया दौरा ४ नोव्हेंबरपासून सुरू होऊन १८ नोव्हेंबरला संपणार आहे. तर झिम्बाब्वे दौरा २४ नोव्हेंबर ते ५ डिसेंबरपर्यंत चालणार आहे.

हेही वाचा – IND vs AUS : ‘मोहम्मद शमीची अनुपस्थिती भारतासाठी मोठा धक्का पण…’, ऑस्ट्रेलियन संघाच्या मुख्य प्रशिक्षकाचे वक्तव्य

मोहम्मद रिझवान झिम्बाब्वे मालिकेत विश्रांती घेणार –

पीसीबीने पाकिस्तान संघांची घोषणा करताना सांगितले की, यष्टीरक्षक-फलंदाज मोहम्मद रिझवान ऑस्ट्रेलिया सामन्यांसाठी उपलब्ध असेल, परंतु झिम्बाब्वे दौऱ्यातील टी-२० मालिकेतून त्यात्याला विश्रांती दिली जाईल. मात्र, तो एकदिवसीय मालिकेत खेळणार आहे. बाबर, नसीम, ​​रिझवान, शाहीन आणि सलमान अली आगा व्यतिरिक्त, अराफत मिन्हास, हरिस रौफ, हसीबुल्ला आणि मोहम्मद इरफान खान हे ऑस्ट्रेलिया दौऱ्यासाठी एकदिवसीय आणि टी-२० दोन्ही संघात आहेत. सलमानशिवाय जहांदाद खानचा पहिल्यांदाच पाकिस्तानच्या टी-२० संघात समावेश करण्यात आला आहे. गेल्या महिन्यात फैसलाबाद येथे झालेल्या चॅम्पियन्स वन-डे चषक स्पर्धेत १७ विकेट्स घेऊन प्लेअर ऑफ द टूर्नामेंट ठरलेला वेगवान गोलंदाज मोहम्मद हसनैननेही वनडे संघात पुनरागमन केले आहे.

मराठीतील सर्व क्रीडा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Mohammad rizwan says i want to be the captain of the team not the king after being appointed captain white ball pakistan cricket vbm