Mohammad Shami and Umesh Yadav dropped from Indian Test squad: पुढील महिन्यात भारतीय संघ वेस्ट इंडिज दौऱ्यावर जाणार आहे. या दौऱ्याला १२ जुलैपासून सुरुवात होणार आहे. या दौऱ्यात दोन्ही संघात कसोटी, वनडे आणि टी-२० मालिका खेळली जाणार आहे. त्यामुळे बीसीसीआयने कसोटी आणि वनडे मालिकेसाठी शुक्रवारी जाहीर केला आहे. दरम्यान कसोटी मालिकेसाठी निवडलेल्या संघातून अनुभवी गोलंदाज उमेश यादव आणि मोहम्मद शमीला संघातून वगळण्यात आले आहे. त्यांच्ंया जागी युवा खेळाडूंना संधी दिली आहे.
अनुभवी गोलंदाज उमेश यादव आणि मोहम्मद शमीला वगळण्यात आले. त्यांच्या जागी युवा गोलंदाज मुकेश कुमार आणि नवदीप सैनीला संधी देण्यात आली आहे. त्याचबरोबर चेतेश्वक पुजारासाख्या अनुभवी खेळाडूला वगळून यशस्वी जैस्वाल आणि ऋतुराज गायकवाडसारख्या खेळाडूंना संधी दिली आहे. या संघांमध्ये अनुभवी आणि युवा खेळाडूंना सधी देण्यात आली आहे.
अजिंक्य रहाणेनं तब्बल दीड वर्षांनंतर भारतीय संघात पुनरागमन केलं आहे. पुनरागमनाच्या सामन्यात अजिंक्यने उत्कृष्ट कामगिरी करत सर्वांचं लक्ष वेधून घेतलं होतं. जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धेच्या अंतिम सामन्यात त्याने पहिल्या डावात ८९ तर दुसऱ्या डावात ४६ धावांची खेळी केली होती. या सामन्यात तो भारताकडून सर्वाधिक धावा करणारा फलंदाज ठरला होता. तसेच आयपीएल २०२३ मध्येही त्याने जबरदस्त कामगिरी केली होती. हे त्याचं आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधलं दमदार पुनरागमन पाहून बीसीसीआयने अजिंक्यला पुन्हा एकदा भारताच्या कसोटी संघाच्या उपकर्णधारपदी नियुक्त केलं आहे.
वेस्ट इंडिजविरुद्धच्या कसोटी मालिकेसाठी टीम इंडिया –
रोहित शर्मा (कर्णधार), शुबमन गिल, ऋतुराज गायकवाड, विराट कोहली, यशस्वी जैस्वाल, अजिंक्य रहाणे (उपकर्णधार), केएस भरत (यष्टीरक्षक), इशान किशन (यष्टीरक्षक), आर अश्विन, रवींद्र जडेजा, शार्दुल ठाकूर, अक्षर पटेल, मोहम्मद सिराज, मुकेश कुमार, जयदेव उनाडकट आणि नवदीप सैनी