भारताचा वेगवान गोलंदाज मोहम्मद शमी याने तंदुरुस्तीसाठी घेण्यात येणारी यो-यो चाचणी उत्तीर्ण केली आहे. इंग्लंड दौऱ्यातील कसोटी मालिकेच्या पार्श्वभूमीवर नुकतीच यो यो टेस्ट घेण्यात आली. या चाचणीत मोहम्मद शमी उत्तीर्ण झाला. शमीने इंस्टाग्रामवर या संबंधी फोटो शेअर केला असून त्यात ‘यो-यो टेस्ट पास झालो’, अशा आशयाचे कॅप्शन दिले आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

अफगाणिस्तानविरुद्ध झालेल्या एकमेव कसोटी सामन्याआधीही यो यो चाचणी घेण्यात आली होती. मात्र त्यावेळी मोहम्मद शमी, अंबाती रायडू आणि संजू सॅमसन ही चाचणी पास करता आली नव्हती. परिणामी त्यांना त्या कसोटीत सहभागी होता आले नव्हते. शमीच्या जागी संघात नवदीप सैनी याला स्थान देण्यात आले होते.

शमी हा गेल्या काही महिन्यापासून इतरही कारणांमुळे चर्चेत आहे. मात्र आयपीएलमध्ये त्याने दिल्लीच्या संघात स्थान मिळवले होते. आत इंग्लंडविरुद्ध कसोटी मालिका सुरु होण्याआधी त्याने यो-यो चाचणी पस केली आहे. त्यामुळे आता कसोटी संघातील पुनरागमनाची तो सज्ज झाला आहे.