ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या पहिल्या कसोटीत मोहम्मद शमीने डेव्हिड वॉर्नरला क्लीन-बोल्ड करून इतिहास रचला. मोहम्मद शमीने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये ४०० बळी पूर्ण केले आहेत. भारताकडून सर्वाधिक आंतरराष्ट्रीय विकेट घेणारा तो नववा गोलंदाज ठरला आहे. या विकेटसह शमीही स्पेशल क्लबमध्ये देखील सामील झाला आहे.
शमी कपिल-झहीरच्या क्लबमध्ये झाला सामील –
मोहम्मद शमी ४०० विकेट्स घेतल्यानंतर अनिल कुंबळे, झहीर खान, कपिल देव, हरभजन सिंग यांसारख्या दिग्गज गोलंदाजांच्या क्लबमध्ये सामील झाला आहे. जी त्याची खास कामगिरी आहे. कारण भारताकडून सर्वाधिक विकेट घेण्याचा विक्रम अनिल कुंबळेच्या नावावर आहे. पण आता शमीने या दिग्गजांच्या यादीत आपले नाव जोडले आहे.
भारतासाठी सर्वाधिक आंतरराष्ट्रीय विकेट घेणारे गोलंदाज –
अनिल कुंबळे – ९५३
हरभजन सिंग – ७०७
कपिल देव – ६८७
आर अश्विन – ६७२
झहीर खान – ५९७
जवागल श्रीनाथ – ५५१
रवींद्र जडेजा – ४८२
इशांत शर्मा – ४३४
मोहम्मद शमी – ४००*
हेही वाचा – IND vs AUS 1st Test: टप्पा पडताच शमीचा चेंडू घुसला थेट स्टंपमध्ये, डेव्हिड वॉर्नरही झाला अवाक, पाहा VIDEO
शमीचा उत्कृष्ट विक्रम –
मोहम्मद शमी आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये ४०० विकेट घेणारा जगातील ५६ वा गोलंदाज बनला आहे. आज सकाळपासून मोहम्मद शमी उत्कृष्ट लयीत दिसला. त्याने ऑस्ट्रेलियाचा फलंदाज डेव्हिड वॉर्नरला क्लीन बोल्ड केले. वॉर्नरने केवळ ४ चेंडू खेळले होते, परंतु मोहम्मद शमीच्या आतल्या चेंडूचा बचाव करताना वॉर्नर पूर्णपणे चुकला आणि त्याचे स्टंप उडून गेली.
हेही वाचा – IND vs AUS 1st Test: श्रीकर भरतने मार्नस लाबुशेनच्या धोनी स्टाईलने उडवल्या बेल्स, पाहा VIDEO
सामन्याबद्दल बोलायचे, तर ऑस्ट्रेलिया संघाने प्रथम फलंदाजी करताना ५० षटकानंतर ५ बाद १४४ धावा केल्या. ज्यापैकी रवींद्र जडेजाने सर्वाधिक ३ विकेट्स घेतल्या. त्याचबरोबर सिराज आणि शमीने प्रत्येकी एक विकेट घेतली. ऑस्ट्रेलियाकडून सर्वाधिक धावा मार्नस लाबुशेनने केल्या. त्याने ४९ धावांचे योगदान दिले.