Mohammad Shami Friend Umesh Kumar Reveals He Contemplated Suicide: भारतीय संघाचा भेदक गोलंदाज मोहम्मद शमी सध्या दुखापतीनंतर सावरत पुनरागमनासाठी मेहनत करत आहे. यादरम्यानच मोहम्मद शमीबद्दल एक मोठा खुलासा त्याच्या मित्राने केला आहे. मोहम्मद शमीचा मित्र उमेश कुमारने मोठा खुलासा केला आहे. एकेकाळी शमी (Mohammad Shami) आत्महत्या करण्याचा विचार करत होता. शुभंकर मिश्रा यांच्या पोडकास्टमध्ये दिलेल्या मुलाखतीत उमेशने या गोष्टींचा खुलासा केला आहे. शमी आपल्या पत्नीपासून विभक्त झाला आहे. पत्नी हसीन जहानपासून विभक्त होत असतानाचा तो काळ शमीसाठी खूपच तणावपूर्ण होता, कारण त्याच्या पत्नीने त्याच्यावर घरगुती हिंसाचाराचा गुन्हा दाखल केला होता. याचसह मॅच फिक्सिंगचे आरोपही केले होते.
हेही वाचा – Olympics 2024: ऑलिम्पिकच्या लोगोमध्ये पाच वर्तुळ का असतात? काय आहे याचा अर्थ; जाणून घ्या
मोहम्मद शमीच्या जीवनात अनेक चढ उतारांचा त्याने सामना केला आहे. मोहम्मद शमी आणि त्याची पत्नी हसीन जहाँ हे विभक्त झाले आहेत आणि त्यांची मुलगीही त्याच्या पत्नीसोबत राहते. शमीच्या पत्नीने त्याच्यावर घरगुती हिंसाचाराचा गुन्हा दाखल केला होता. त्याने शमीवर पाकिस्तानी महिलेकडून पैसे घेऊन मॅच फिक्सिंग केल्याचा आरोपही केला होता. अधिकाऱ्यांनी या आरोपातून शमीची निर्दोष मुक्तता केली असली तरी, त्याचा मित्र उमेश कुमार याने शुभंकर मिश्राच्या पॉडकास्टवर खुलासा केला की त्या काळात शमीने आत्महत्येचा विचारही केला होता.
हेही वाचा – IND vs SL: टी-२० मालिकेसाठी श्रीलंकेचा संघ जाहीर, नव्या कर्णधाराची केली घोषणा; अनुभवी खेळाडूला डच्चू
मोहम्मद शमीने का केलेला आत्महत्येचा प्रयत्न?
उमेशने एका मुलाखतीत शमीबद्दल खुलासा केला आणि म्हणाला, “शमी त्यावेळी सर्व गोष्टींशी लढत होता. तो माझ्यासोबत माझ्या घरी राहत होता. पण जेव्हा पाकिस्तानबरोबर फिक्सिंग झाल्याचे आरोप समोर आले त्या रात्री चौकशी झाली, तेव्हा तो आतून तुटला होता आणि म्हणाला की तो सर्व काही सहन करू शकतो, परंतु आपल्या देशाचा विश्वासघात केल्याचा आरोप सहन करू शकत नाही.
पुढे सांगताना उमेश म्हणाला, “त्या रात्री त्याला काहीतरी मोठं करायचं होतं (आपलं आयुष्य संपवायचं होतं) असंही बातम्यांमध्ये आलं होतं. पहाटे ४ वाजता पाणी प्यायला उठून मी किचनच्या दिशेने जात होतो, तेव्हा मला दिसलं. की तो बाल्कनीत उभा होता. तो १९वा मजला होता, जिथे आम्ही थांबलो होतो. तिथे काय घडलं हे मला समजलं होतं. माझ्यामते ती रात्र शमीच्या कारकिर्दीतील सर्वात मोठी रात्र होती. नंतर, एके दिवशी, आम्ही बोलत असताना, त्याच्या फोनवर एक मेसेज आला की त्याला या प्रकरणाच्या चौकशी समितीकडून क्लीन चिट मिळाली आहे. कदाचित विश्वचषक जिंकूनही त्याला जितका आनंद झाला नसता तितका आनंद तो क्लीन चिटचा मेसेज वाचल्यावर झाला.
शमीने यावर आपले मत व्यक्त केले आणि म्हणाला, “तुम्ही कशाला अधिक प्राधान्य देता यावर आणि नंतर त्याचे म्हणणे किती खरे आहे हे समोरच्या व्यक्तीवर अवलंबून असते. त्यामुळे जेव्हा तुम्हाला माहित असेल की समोरच्या व्यक्तीचं वागणं चुकीचं आहे आणि तुमच्यासाठी महत्त्वाचं नाही, तेव्हा आपण कोणत्या गोष्टीला प्राधान्य द्यायचं ते ठरवावं. आज जर मी मोहम्मद शमी नसतो, तर कोणीही माझ्या या स्थितीची पर्वा करणार नाही आणि मीडियालाही त्यात काही रस नसता. मग ज्या गोष्टीने मला शमी बनवले आहे ती गोष्ट मी का सोडू… त्यामुळे आपल्याला लढत राहावे लागेल.”