आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेने (आयसीसी) यंदाच्या कामगिरीच्या आधारे तयार केलेल्या आयसीसीच्या जागतिक कसोटी संघात भारताच्या एकाही खेळाडूला स्थान मिळालेले नाही, तर एकदिवसीय संघात भारताच्या फक्त महम्मद शमीचा समावेश करण्यात आला आहे.
कसोटी संघाचा बारावा खेळाडू म्हणून भारताचा ऑफ-स्पिनर रविचंद्रन अश्विनची निवड करण्यात आली आहे. भारताचे माजी कर्णधार अनिल कुंबळे यांच्या समितीनेच या दोन्ही संघांची निवड केली आहे. १८ सप्टेंबर २०१४ ते १३ सप्टेंबर २०१५ या कालावधीतील कामगिरीच्या आधारे हे संघ निवडण्यात आले आहेत.
संघ (फलंदाजीच्या क्रमानुसार)
डेव्हिड वॉर्नर (ऑस्ट्रेलिया), कर्णधार – अ‍ॅलिस्टर कुक (इंग्लंड), केन विल्यमसन (न्यूझीलंड), युनिस खान (पाकिस्तान), स्टीव्हन स्मिथ (ऑस्ट्रेलिया), जो रूट (इंग्लंड), यष्टिरक्षक – सर्फराज अहमद (पाकिस्तान), स्टुअर्ट ब्रॉड (इंग्लंड), ट्रेंट बोल्ट (न्यूझीलंड), यासिर शहा (पाकिस्तान), जोश हॅझलवूड (ऑस्ट्रेलिया), बारावा खेळाडू-रविचंद्रन अश्विन (भारत)
एकदिवसीय संघ (फलंदाजीच्या क्रमानुसार)
तिलकरत्ने दिलशान (श्रीलंका), हशिम अमला (दक्षिण आफ्रिका), यष्टिरक्षक – कुमार संगकारा(श्रीलंका), ए बी डी’व्हिलियर्स-कर्णधार (दक्षिण आफ्रिका), स्टीव्हन स्मिथ (ऑस्ट्रेलिया), रॉस टेलर (न्यूझीलंड), ट्रेंट बोल्ट (न्यूझीलंड), महम्मद शमी (भारत), मिचेल स्टार्क (ऑस्ट्रेलिया), मुस्ताफिझुर रहेमान (बांगलादेश), इम्रान ताहीर (दक्षिण आफ्रिका), बारावा खेळाडू-जो रूट (इंग्लंड).

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा