ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या पहिल्या कसोटी सामन्यात भारतीय संघाने चमकदार कामगिरी केली. मोहम्मद शमी गोलंदाजीमध्ये तरबेज होताच, परंतु त्याने फलंदाजीमध्येही महत्त्वाची खेळी साकारली. मोहम्मद शमीने ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या पहिल्या डावात ४७ चेंडूत २ चौकार आणि ३ षटकारांच्या मदतीने ३७ धावा केल्या. या खेळीनंतर मोहम्मद शमीने आपल्या खेळीबद्दल जी प्रतिक्रिया दिली, त्याचा व्हिडिओ बीसीसीआयने शेअर केला आहे.
शमीने तिसर्या दिवशी अक्षर पटेलसोबत चांगली भागीदारी केली, ज्यामुळे भारताला ४०० धावांपर्यंत मजल मारता आली. दरम्यान, बीसीसीआयने नुकताच सोशल मीडियावर एक व्हिडिओ शेअर केला आहे. ज्यामध्ये अक्षर पटेल आणि मोहम्मद शमी त्यांच्या भागीदारीबद्दल बोलताना दिसत आहेत. त्याचबरोबर या चर्चेत शमीने आपल्या आक्रमक खेळीबद्दल महत्वाचा खुलासा केला आहे.
ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या पहिल्या कसोटी सामन्यात भारताने एक डाव आणि १३२ धावांनी विजय मिळवला, भारताने पहिल्या डावात ४०० धावा केल्या. ज्यामिळे आणि २२३ धावांची आघाडी घेतली होती. तिसऱ्या दिवशी भारताच्या खालच्या फळीतील फलंदाजांनी शानदार खेळ केला. अक्षर पटेलने तिसऱ्या दिवशी आपली अर्धशतकी खेळी वाढवली आणि ८७ धावांची खेळी केली. तिसर्या दिवसाच्या सुरुवातीला फलंदाजीला आलेला मोहम्मद शमी सुरुवातीपासूनच जबरदस्त फॉर्ममध्ये दिसत होता.
मैदानावर येताच शमीने मोठे फटके खेळायला सुरुवात केली. शमीच्या धडाकेबाज फलंदाजीचा सगळ्यांनीच मनमुराद आनंद लुटला. बीसीसीआयने शेअर केलेल्या व्हिडीओमध्ये दोन्ही खेळाडू त्यांच्या भागीदारीबद्दल बोलताना दिसत होते. अक्षरने मोहम्मद शमीला प्रश्न करताना म्हणाला, ‘श्री लाला, जे आज नागपूरहून आमच्यासोबत आले, ते इतक्या आत्मविश्वासाने आले होते, ते काय विचार करत होते?’
हेही वाचा – T20 WC 2023: मैदानावर कट्टर प्रतिस्पर्धी असलेल्या भारत-पाक संघाने सामन्यानंतर जिंकली मनं, पाहा VIDEO
ज्यावर शमीने उत्तर दिले, ”काही नाही यार, तू तिथे फलंदाजी करत होतास, त्यामुळे जास्तीत जास्त वेळ तिथे राहणे ही माझी भूमिका होती. धीर धरायचा होता पण माझ्याने ते होत नव्हते.”
हेही वाचा – WPL Auction 2023: आज, स्मृती मंधाना… हरमनप्रीतशिवाय, कोणत्या भारतीयांवर होऊ शकतो पैशांचा पाऊस? घ्या जाणून
शमीचा इगो हर्ट झाला होता –
मोहम्मद शमीशी पुढे बोलताना अक्षर पटेलने विचारले, ‘मी तुम्हाला शांत होण्यास सांगत होतो, थोडा धीर धरा, जेव्हा मी म्हणालो की धीर धरा, तेव्हा तुम्ही षटकार मारला, मी पुन्हा म्हणालो आणि तुम्ही पुन्हा षटकार मारला’, यावर शमीने उत्तर दिले. तो म्हणाला, ‘माझा इगो हर्ट झाला होता’. दुसरी कसोटी १७ फेब्रुवारीपासून दिल्लीत खेळवली जाणार असून त्या सामन्यातही भारतीय संघ आपला दबदबा कायम ठेवू इच्छितो.