Mohammad Shami revealed that Virat Rohit does not like to face me in the nets : टीम इंडियाचा वेगवान गोलंदाज मोहम्मद शमी सध्या शस्त्रक्रियेतून बरा झाला आहे. एकदिवसीय विश्वचषकानंतर तो मैदानात उतरलेला नाही. दुखापत असूनही शमीने गेल्या वर्षी विश्वचषकात गोलंदाजी करून टीम इंडियाला फायनल पोहोचण्यात महत्त्वाची भूमिका निभावली होती. तो सध्या ‘अकिलीस टेंडन’च्या दुखापतीमुळे क्रिकेटपासून दूर आहे. ३३ वर्षीय शमी आयपीएल २०२४ आणि टी-२० वर्ल्ड कप २०२४ मध्येही खेळू शकला नाही. आता त्याने टीम इंडियाबाबत बोलताना विराट-रोहितबद्दल मोठा खुलासा केला आहे.

मोहम्मद शमीने भारतीय स्टार फलंदाज विराट कोहली आणि रोहित शर्मा नेट सत्रादरम्यान त्याचा सामना का करत नाहीत? याबद्दल खुलासा केला आहे. मोहम्मद शमी हा भारताच्या आघाडीच्या वेगवान गोलंदाजांपैकी एक आहे, तर विराट आणि रोहित हे दोघेही जगप्रसिद्ध फलंदाज आहेत. स्टार वेगवान गोलंदाजांनी शुभंकर मिश्राच्या पॉडकास्टवर दिलेल्या मुलाखतीत बोलताना रोहित-विराटबद्दल खुलासा केला.

Loksatta ulta chashma
उलटा चष्मा: बैलबुद्धी? नंदीबैल?
Ramdas Kadam On Uddhav Thackeray
Ramdas Kadam : “उद्धव ठाकरेंना म्हटलं होतं दोन तासांत आमदार परत आणतो; पण…”, शिवसेना शिंदे गटाच्या नेत्याचं मोठं विधान
Parents silent actions affect children
पालकांच्या निशब्द कृतीचा फटका
a man saved dogs life | dog lovers
याला म्हणतात खरी माणुसकी! स्वतःचा जीव धोक्यात टाकून वाचवले कुत्र्याचे प्राण, व्हिडिओ होतोय व्हायरल
woman have to fight against atrocities marathi news
आता तूच भेद या अन्यायाच्या भिंती…
Brother and sister fight on Raksha Bandhan
राखी बांधू देत नाही म्हणून भावाचे केस ओढले, बहीण भाऊ रक्षाबंधनाच्या दिवशीच भिडले, पाहा Viral Video
News About Sanjoy Roy What His Mother in Law Said?
Sanjoy Roy : “संजय रॉयला फाशी दिली तरीही आम्हाला काहीच..”, कोलकाता प्रकरणातील आरोपीच्या सासूची प्रतिक्रिया
Surykumar Yadav react on insta story about Kolkata Doctor Rape and Murder Case
Surykumar Yadav : कोलकाता बलात्कार प्रकरणावर सूर्याची संतप्त प्रतिक्रिया; म्हणाला, ‘मुलींच्या रक्षणाची नव्हे तर मुलांना सज्ञान करण्याची गरज…’

‘रोहित-विराट दोघांनाही माझा सामना करायाला आवडत नाही’

मोहम्मद शमीने पॉडकास्टमध्ये खुलासा केला की रोहित-विराट दोघेही नेट सेशनमध्ये त्याचा सामना करत नाही. तो म्हणाला, “रोहित शर्मा आणि विराट कोहली यांना नेटवर माझ्या बॉलिंगवर खेळायला आवडत नाही. मी अनेक मुलाखतींमध्ये ऐकले आहे, पण त्यांना नेट सेशनमध्ये माझा सामना करायला आवडत नाही. रोहित शर्मा तर अगोदरच सांगतो की मी तुमचा सामना करत नाहीय आणि विराटला दोनदा आऊट झाल्यानंतर राग येतो.”

हेही वाचा – Mohammed Shami : ‘तुमच्यात जर दम असेल…’, मोहम्मद शमी सानिया मिर्झाबरोबरच्या लग्नाच्या अफवांवर संतापला

‘विराटशी माझी अनोखी मैत्री आहे’

मोहम्मद शमीने कोहलीबरोबरच्या त्याच्या स्पर्धात्मक भावनेबद्दलही सांगितले. वेगवान गोलंदाजाने सांगितले की कोहलीला नेहमीच शमीला चौकार मारायचे असतात, तर फलंदाजाला बाद करण्याचे त्याचे लक्ष्य असते. शमी म्हणाला, ”विराट आणि मी नेहमीच एकमेकांना आव्हान देत असतो. त्याला ‘सिल्की शॉट्स’ खेळायला आवडतात, तर मी नेहमी त्याला नेटमध्ये आऊट करण्याचे ध्येय ठेवतो. यावरुन बंध आणि मैत्री स्पष्टपणे दिसते. नेट्समध्ये आपल्या मित्रांना आऊट करणण्यासाठी कठोर परिश्रम आणि लक्ष केंद्रित करावे लागते.”