IND vs PAK, Asia Cup 2023: भारत आशिया चषक २०२३ मधील आपल्या मोहिमेची सुरुवात २ सप्टेंबर रोजी पाकिस्तान विरुद्धच्या सामन्याने होणार आहे. पण या महत्त्वाच्या सामन्याआधी भारताचा स्टार वेगवान गोलंदाज मोहम्मद शमीने त्याच्या गोलंदाजी संदर्भात मोठे विधान केले आहे. तो म्हणतो की, तो नवीन आणि जुना दोन्ही चेंडूंनी चांगली गोलंदाजी करू शकतो. आता जसप्रीत बुमराह या स्पर्धेसाठी पुनरागमन करत असल्याने शनिवारी पाकिस्तानविरुद्धच्या सामन्यात त्याच्यासोबत कोण नवीन चेंडू टाकणार हे पाहणे उत्सुकतेचे ठरणार आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

स्टार स्पोर्ट्सवरील संभाषणादरम्यान भारताचा स्टार गोलंदाज मोहम्मद शमी म्हणाला, “मला नवीन चेंडू किंवा जुन्या चेंडूने गोलंदाजी करण्यास कोणतीही अडचण नाही. माझ्यात तसा अहंकार नाही किंवा इगो नाही. माझे एकच उद्दिष्ट आहे की, ते म्हणजे माझे १०० टक्के प्रयत्न मैदानावर देणे. जर मी हे करू शकलो तर त्याचे परिणाम आपोआप दिसून येतील.”

हेही वाचा: Sunil Chettri: गुड न्यूज! फुटबॉल संघाचा कर्णधार सुनील छेत्रीच्या घरी लहान पाहुण्याचं आगमन, पत्नी सोनमने दिला मुलाला जन्म

विश्वचषकापूर्वी जसप्रीत बुमराहचे पुनरागमन संघात होणार असल्याने त्याची संघाला खूप मदतच होणार आहे, असे त्याने सांगितले. मोहम्मद शमी पुढे म्हणाला, “जसप्रीत बुमराह बऱ्याच दिवसांपासून खेळत नव्हता. आम्ही त्याला खूप मिस केले. त्याच्या पुनरागमनामुळे आमची गोलंदाजी खूप मजबूत झाली आहे. तो तंदुरुस्त दिसत आहे आणि चांगला खेळत आहे. आशिया कपमध्ये त्याच्याकडून उत्तम कामगिरी होईल अशी आशा आहे.”

जसप्रीत बुमराहचे आयर्लंड दौऱ्यावर ११ महिन्यांनंतर भारतीय संघात पुनरागमन झाले आहे. जिथे त्याने उत्कृष्ट गोलंदाजी करताना अनेक विकेट्स घेतल्या. आता बुमराहकडून आशिया कपमध्येही टीम इंडियाला चांगल्या गोलंदाजीची अपेक्षा आहे. त्याचबरोबर मोहम्मद शमी, सिराज यांच्याकडूनही चांगल्या कामगिरीची भारताला गरज आहे.

हेही वाचा: BCCI Media Rights: ५, ९६६. ४ कोटींचा करार! BCCIची झाली चांदी, टीम इंडियाच्या मॅचेस चाहत्यांना आता ‘या’ चॅनेलवर पाहता येणार

आशिया कपसाठी दोन्ही संघ

भारत: रोहित शर्मा (कर्णधार), हार्दिक पांड्या (उपकर्णधार), शुबमन गिल, विराट कोहली, श्रेयस अय्यर, के.एल. राहुल, सूर्यकुमार यादव, तिलक वर्मा, इशान किशन, रवींद्र जडेजा, शार्दुल ठाकूर, अक्षर पटेल, कुलदीप यादव, जसप्रीत बुमराह, मोहम्मद शमी, मोहम्मद सिराज, प्रसिद्ध कृष्णा. बॅकअप: संजू सॅमसन.

पाकिस्तानः अब्दुल्ला शफीक, फखर जमान, इमाम-उल-हक, बाबर आझम (कर्णधार), सलमान अली आगा, इफ्तिखार अहमद, तैयब ताहिर, मोहम्मद रिझवान, मोहम्मद हरीस, शादाब खान (उपकर्णधार), मोहम्मद नवाज, उसामा मीर, फहीम अश्रफ , हारिस रौफ, मोहम्मद वसीम ज्युनियर, नसीम शाह, शाहीन आफ्रिदी.