Mohammad Siraj and Zanai Bhosle dating rumours : भारतीय क्रिकेटपटू मोहम्मद सिराजच्या एका फोटोमुळे सोशल मीडियावर चर्चांना उधाण आले आहे. डीएसपी सिराजचे हे फोटो क्रिकेटशी संबंधित नसून बॉलीवूडशी संबंधित आहे. प्रसिद्ध गायिका आशा भोसले यांची नात अभिनेत्री-गायिका जनाई भोसलेचा मोहम्मद सिराजसोबतचा फोटो व्हायरल झाला आहे. जनाईने तिचा २३वा वाढदिवस मुंबईतील वांद्रे येथे साजरा केला आणि सेलिब्रेशनचे फोटो शेअर केले. यानंतर सिराज आणि जनाईचे फोटो व्हायरल होत आहेत. अशा परिस्थितीत त्यांच्या डेटिंगच्या अफवांनाही उधाण आले. दोघांच्या चाहत्यांना असे वाटते की त्यांच्यामध्ये मैत्रीपेक्षा काहीतरी अधिक आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

जनाई भोसलेचा सिराज सोबतचा फोटो व्हायरल –

जनाई भोसलेने तिच्या वाढदिवसाच्या सेलिब्रेशनचे काही फोटो शेअर केले आहेत. यातील एका फोटोत जनाई आणि सिराज एकमेकांकडे प्रेमळपणे हसताना दिसत आहेत, ज्याकडे नेटिझन्स दुर्लक्ष करू शकत नाहीत. जनाईची आजी आशा भोसले, अभिनेता जॅकी श्रॉफ आणि क्रिकेटपटू सिद्धेश लाड आणि श्रेयस अय्यर देखील या फोटोंमध्ये दिसत आहेत. मात्र, चाहत्यांना सिराज आणि जनाईच्या फोटोंमध्ये जास्त रस दिसत आहे. आता जनाईच्या या पोस्टवर विविध प्रकारच्या कमेंट्स येत आहेत.

जनाई-सिराजच्या फोटोवर चाहत्यांनी पाडला कमेंट्सचा पाऊस –

एका चाहत्यांनी लिहिले की “तुम्ही सिराज भाईजानशी लग्न करणार आहात का?” दुसऱ्याने लिहले, “डीएसपी सर इतके कठोर माणूस आहेत, पण ते इथे वितळले.” या सर्व कमेंट्स दर्शवतात की त्यांना आधीपासूनच या नात्यावर संशय आहे. यामध्ये भर घालताना एकाने लिहिले, “भाभीने फक्त गुजरात टायटन्सला फॉलो केले आहे. कारण यावेळी डीएसपी गुजरातमध्ये आहेत.”

सध्या सिराज-जनाईच्या डेटिंगची सर्वत्र चर्चा आहेत. अशात, आपल्या मधुर आवाजासाठी प्रसिद्ध असलेल्या या तरुण गायिकेने अलीकडेच एका नवीन म्युझिक प्रोजेक्टची घोषणा केली आहे, जी तिच्या वाढत्या चाहत्यांसाठी एक भेट ठरणार आहे. दरम्यान, मोहम्मद सिराज गुजरात टायटन्ससोबत एका रोमांचक हंगामासाठी तयारी करत आहे, जिथे त्याची वेगवान गोलंदाजी नक्कीच प्रभाव पाडेल. तो सध्या भारताच्या टी-२० आणि वनडे संघातून बाहेर आहे. तो देशांतर्गत क्रिकेट खेळताना दिसण्याची शक्यता आहे.

मराठीतील सर्व क्रीडा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Mohammad siraj dating singer asha bhosle granddaughter zanai bhosle rumored after birthday party photo viral vbm