India vs South Africa 2nd Test Match: भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यातील दोन कसोटी सामन्यांच्या मालिकेतील दुसरा आणि शेवटचा सामना आजपासून खेळवला जात आहे. केपटाऊनच्या न्यूलँड्स मैदानावर मोहम्मद सिराजने अफलातून वेगवान गोलंदाजी करत दक्षिण आफ्रिकेच्या फलंदाजांना गुडघे टेकण्यास भाग पडले. दक्षिण आफ्रिकेचा कर्णधार डीन एल्गरने नाणेफेक जिंकून फलंदाजीचा निर्णय घेतला. सेंच्युरियनमधील पहिली कसोटी जिंकून दक्षिण आफ्रिकेने मालिकेत १-० अशी आघाडी घेतली आहे. टीम इंडियाला दुसरी कसोटी जिंकून मालिका बरोबरीत सोडवायची आहे. दक्षिण आफ्रिकेने पहिल्या डावात ५५ धावा केल्या आहेत.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

मोहम्मद सिराजने अप्रतिम गोलंदाजीचे प्रदर्शन करत १५ धावांमध्ये ६ विकेट्स घेत एक इतिहास रचला आहे. दक्षिण आफ्रिकेत यजमान संघाविरुद्ध, कमी धावांत सर्वाधिक विकेट्स घेणारा पहिला भारतीय गोलंदाज ठरला आहे. त्याने माजी दिग्गज खेळाडू जवागल श्रीनाथ, हरभजन सिंग आणि अनिल कुंबळे यांचा विक्रम मोडला आहे. त्याचबरोबर मिया सिराजने सध्याच्या संघातील शार्दुल ठाकूर, रवींद्र जडेजा यांना देखील मागे टाकले आहे.

दक्षिण आफ्रिकेत भारतीय गोलंदाजांची सर्वोत्तम गोलंदाजी

७/६१ – शार्दुल ठाकूर, जोहान्सबर्ग, २०२२

७/१२० – हरभजन सिंग, केपटाऊन, २०११

६/१५ – मोहम्मद सिराज, केप टाउन, २०२४

६/५३ – अनिल कुंबळे, जोहान्सबर्ग, १९९२

६/७६ – जवागल श्रीनाथ, गकेबरहा, २००१

६/१३८ – रवींद्र जडेजा, डरबन, २०१३

दक्षिण आफ्रिकेचा डाव ५५ धावांवर संपला

दक्षिण आफ्रिकेचा पहिला डाव ५५ धावांवर आटोपला. पहिल्या सामन्यात सामान्य दिसणाऱ्या भारतीय गोलंदाजांनी या सामन्यात जबरदस्त कामगिरी केली. मोहम्मद सिराजने सर्वाधिक सहा विकेट्स घेतल्या. जसप्रीत बुमराह आणि मुकेश कुमार यांनी प्रत्येकी दोन विकेट्स घेतल्या. दक्षिण आफ्रिकेचे दोनच फलंदाज दुहेरी आकडा गाठू शकले. काइल व्हर्नने १५ आणि डेव्हिड बेडिंगहॅमने १२ धावांचे योगदान दिले. याशिवाय एकाही फलंदाजाला दुहेरी आकडा गाठता आला नाही. एडन मार्कराम (२४ धावा), डीन एल्गर (१७ धावा), टोनी डी जॉर्जी (१२ धावा), ट्रिस्टन स्टब्स (१२ धावा), मार्को जॅनसेन (० धावा), केशव महाराज (१ धावा), कागिसो रबाडा (१ धावा), नांद्रे बर्जर बाद (४ धावा).

हेही वाचा: NZ vs SA: न्यूझीलंड दौऱ्यासाठी कमकुवत संघ निवडल्याची टीका होताच दक्षिण आफ्रिकेने दिले स्पष्टीकरण; म्हणाले, “आम्ही कसोटीचा…”

दोन्ही संघांची प्लेइंग११

भारत: रोहित शर्मा (कर्णधार), यशस्वी जैस्वाल, शुबमन गिल, विराट कोहली, श्रेयस अय्यर, के.एल. राहुल (यष्टीरक्षक), रवींद्र जडेजा, जसप्रीत बुमराह, मोहम्मद सिराज, प्रसिध कृष्णा, मुकेश कुमार.

दक्षिण आफ्रिका: डीन एल्गर (कर्णधार), एडन मार्कराम, टोनी डी जिओर्गी, ट्रिस्टन स्टब्स, डेव्हिड बेडिंगहॅम, काइल वेरेयन (यष्टीरक्षक), मार्को जॅनसेन, केशव महाराज, कागिसो रबाडा, नांद्रे बर्गर, लुंगी एनगिडी.

मराठीतील सर्व क्रीडा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Mohammad siraj displayed brilliant bowling and took 6 wickets for 15 runs create new record at cape town avw