स्पॉट फिक्सिंगचा आरोप असलेल्या मोहम्मद आमिरचा पाकिस्तानी क्रिकेट संघात पुन्हा समावेश करण्याच्या मुदद्यावरून वृत्तवाहिनीवर सुरू असलेल्या चर्चेदरम्यान पाकिस्तानचे माजी क्रिकेटपटू रमीझ राजा आणि मोहम्मद युसूफ यांच्यात शाब्दिक खडाजंगी  पहायला मिळाली. या चर्चेदरम्यान रमीझ राजा आणि मोहम्मद युसूफ या दोघांनीही एकमेकांवर वैयक्तिक दोषारोप करताना अक्षरश: खालची पातळी गाठली. यावेळी मोहम्मद युसूफने रमीझ राजा यांच्यावर टीका करताना त्यांचे क्रिकेटमधील कर्तुत्त्व शून्य असून ते केवळ इंग्रजीचे शिक्षक असल्याचे म्हटले. ५७ कसोटी सामन्यांमध्ये केवळ दोन शतके झळकावणाऱ्या तुमच्यासारख्या लोकांना क्रिकेटविषयी बोलण्याचा कोणताही हक्क नाही. तुम्ही फक्त एक शिक्षक आहात, इंग्रजीचे शिक्षक, बाकी काही नाही, असे युसूफने म्हटले. दरम्यान, रमीझ राजा यांनीदेखील मोहम्मद युसूफच्या दाढीवरून टिप्पणी केली. दाढी वाढवलेला मोहम्मद युसूफ ढोंगी असून त्याच्यामुळे पाकिस्तानी क्रिकेट संघाला अनेक अडचणींचा सामना करावा लागला, असे रमीझ राजा यांनी म्हटले. दरम्यान, या जाहीर चर्चेची ध्वनीचित्रफीत सोशल मिडीयावर व्हायरल झाली असून अनेक माजी खेळाडू आणि जाणकारांनी या दोन्ही खेळाडुंच्या वर्तनाविषयी नाराजी व्यक्त केली आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा