भारताच्या सर्वात यशस्वी क्रिकेट कर्णधारांपैकी एक असलेल्या मोहम्मद अझरुद्दीनने आपली जुनी बॅट दाखवत क्रिकेटमधील मोठ्या विक्रमाची आठवण काढली. या बॅटचे फोटो अझरुद्दीनने सोशल मीडियावरही शेअर केले. याच बॅटने अझरुद्दीनने इंग्लंडविरुद्ध मोठा विक्रम नोंदवला होता, ज्यामुळे भारतीयांची मान जागतिक क्रिकेटमध्ये उंचावली होती.
आपल्या आंतरराष्ट्रीय कारकिर्दीच्या पहिल्या तीन कसोटी सामन्यात सलग तीन शतक ठोकत अझरुद्दीनने विक्रम केला होता, जो अजूनही अबाधित आहे. हा विक्रम ज्या बॅटने केला होता, त्या बॅटचे फोटो अझरुद्दीनने सर्वांसमोर शेअर केले. ”या बॅटने मी १९८४-८५मध्ये पहिल्या तीन कसोटी सामन्यात इंग्लंडविरुद्ध सलग शतके ठोकली आणि विश्वविक्रम केला. एका हंगामात मी या बॅटने ८००पेक्षा जास्त धावा केल्या आहेत. माझ्या आजोबांनी ही बॅट निवडली होती”, असे अझरुद्दीनने ट्वीट केलेल्या या फोटोच्या कॅप्शनमध्ये म्हटले आहे.
पाकिस्तान सुपर लीगमध्ये खेळणार झहीर खान
With this bat, I made a world record of three consecutive hundreds in my first three tests against England in 84-85.
In a season I scored more than 800 runs with this very bat, chosen by my grandfather. #FondMemories pic.twitter.com/ci8dkc5tzz— Mohammed Azharuddin (@azharflicks) May 22, 2021
१९८४मध्ये ईडन गार्डन्सवर इंग्लंडविरुद्धच्या कसोटी सामन्यात अझरुद्दीनने पदार्पण केले. पहिल्या डावात त्याने ३२२ चेंडूंत ११० धावा केल्या आणि हा सामना अनिर्णीत राहिला. चेन्नईतील दुसर्या कसोटी सामन्यात पहिल्या डावात ४८ धावांवर बाद झाल्यानंतर अझरुद्दीनने दुसर्या डावात १०५ धावा केल्या. मात्र माइक गॅटिंग आणि ग्रॅमी फ्लॉवरच्या दुहेरी शतकानंतर त्याचे हे शतक व्यर्थ गेले. इंग्लंडने हा सामना नऊ गडी राखून जिंकला.
कानपूरमधील तिसऱ्या कसोटी सामन्यात पुन्हा अझरुद्दीनने शतक ठोकले त्याने २७० चेंडूत १२२ धावा केल्या. दुसऱ्या डावात त्याने ५४ धावा केल्या पण सामना अनिर्णित राखण्यात तो अपयशी ठरला. हा विक्रम अजूनही कोणाला मोडता आलेला नाही. नंतर तो टीम इंडियाचा कर्णधारही झाला.
पुढच्या जन्मी मला १२वा खेळाडू म्हणून राहायचे नाही – युवराज सिंग