वनडे विश्वचषक २०२३ होऊन बराच काळ लोटला असला तरी अंतिम सामन्यात ऑस्ट्रेलियाकडून भारताचा झालेला पराभव सर्वांच्या मनात कायम आहे. याच मुद्द्यावर माजी क्रिकेटपटू मोहम्मद कैफ यांनी एक मोठे वक्तव्य केले आहे. भारताचा कर्णधार रोहित शर्मा आणि मुख्य प्रशिक्षक राहुल द्रविड फायनलमध्ये त्यांची रणनिती यशस्वीपणे पार पाडण्यात अपयशी ठरले, असे कैफ म्हणाले.

दशकभरानंतर घरच्या मैदानावर विजेतेपद पटकावण्याचा मुख्य दावेदार असलेला भारत मोहिमेच्या साखळी टप्प्यात अपराजित राहिला. सलग दहा विजयांच्या जोरावर त्यांनी अंतिम लढतीत प्रवेश केला. मात्र, फायनलमध्ये ऑस्ट्रेलियन संघासमोर यजमानांचा दारूण पराभव झाला.

aayushman khurana
आयुष्मान खुरानाचा ताहिराबरोबर झाला होता ब्रेकअप; ‘हे’ होते कारण, अभिनेत्याने स्वत:चं केला खुलासा
Nana Patole On Devendra Fadnavis :
Nana Patole : निकालाआधी राजकीय घडामोडींना वेग; यातच…
Rohit Sharma to miss first Test against Australia Jasprit Bumrah to captain in Perth Devdutt Padikkal will be added in Team
IND vs AUS: रोहित शर्मा पहिल्या कसोटीतून बाहेर, BCCIला दिली माहिती; त्याच्या जागी ‘या’ खेळाडूला संघात स्थान मिळणार
IND vs AUS Sourav Ganguly Says Rohit Sharma should be playing the Perth Test
IND vs AUS : ‘… तर रोहित पुन्हा कधीही ऑस्ट्रेलियाला जाणार नाही’, सौरव गांगुलीचे हिटमॅनबद्दल मोठं वक्तव्य
maharashtra vidhan sabha election 2024 sudhir mungantiwar vs santosh singh Rawat Ballarpur Assembly constituency
लक्षवेधी लढत : मुनगंटीवार यांच्यासमोर कडवे आव्हान
Tilak Verma scores centuries in two consecutive T20 matches in South Africa
Tilak Varma : ‘…मी कल्पनाही केली नव्हती’, विक्रमी शतकानंतर तिलक वर्माने देवासह ‘या’ खेळाडूचे मानले आभार
Tilak Varma Statement on Maiden T20I Century Flying Kiss Celebration He Said It is For Suryakumar Yadav Gives credit to him IND vs SA
IND vs SA: तिलक वर्माने शतकानंतर कोणाला फ्लाईंग किस दिला? सामन्यानंतर स्वत:च सांगितलं…

अंतिम सामन्यादरम्यान समालोचन करणाऱ्या कैफने सांगितले की,रोहित आणि द्रविड यांनी अंतिम सामन्यापूर्वी सलग तीन दिवस संध्याकाळी खेळपट्टीची नियमित तपासणी केली. लल्लनटॉपला दिलेल्या मुलाखतीत बोलताना, कैफ म्हणाले की त्यांनी खेळपट्टीचा रंग हळूहळू बदलत असल्याचे पाहिले आणि भारतीय संघ व्यवस्थापनावर याबाबत टीका केली.

“रोहित शर्मा आणि राहुल द्रविड संध्याकाळी खेळपट्टीची पाहणी करण्यासाठी यायचे आणि सामन्याच्या आधी सलग तीन दिवस रोज येत असतं. त्यादरम्यान मी खेळपट्टीचा रंग बदलताना पाहिलं. ऑस्ट्रेलियाच्या संघात कमिन्स आहे, स्टार्क आहे, त्यांच्याकडे वेगवान गोलंदाजी करणारे गोलंदाज आहेत, त्यामुळे त्यांना स्लो पिच देऊया आणि तिथेच मोठी चूक झाली.” असे कैफ यांनी सांगितले.

“लोक बरेचदा म्हणतात की क्युरेटर्स खेळपट्टी बनवतात, यात आमचा काहीच हस्तक्षेप नसतो. हे सर्व खोटं आहे,” अशी टिप्पणी कैफ यांनी केली.

आयसीसी एकदिवसीय विश्वचषक २०२३ च्या अंतिम सामन्यात, ऑस्ट्रेलियाचा कर्णधार पॅट कमिन्सने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला, जो संघासाठी अगदी योग्य ठरा. प्रथम फलंदाजी करताना टीम इंडिया ५० षटकात २४० धावा करत सर्वबाद झाली. भारतीय संघाची मधली फळी धावा काढण्यासाठी खूप संघर्ष करताना दिसली. त्यानंतर ऑस्ट्रेलियाने ४३ षटकांतच ६ गडी गमावून २४१ धावांचे लक्ष्य पार केले. कांगारूंचा सलामीवीर ट्रॅव्हिस हेडने १३७ धावांची मॅचविनिंग इनिंग खेळली आणि भारताकडून जेतेपद हिसकावले.