Mohammed Rizwan DRS Video PAK vs AUS: पाकिस्तानने पहिला वनडे सामन्यात पराभूत झाल्यानंतर दुसऱ्या वनडेत विजय मिळवत जबरदस्त पुनरागमन केलं. ॲडलेडमध्ये पाकिस्तानच्या वेगवान गोलंदाजांनी ऑस्ट्रेलियाचा डाव अवघ्या १६३ धावांत गुंडाळला. ऑस्ट्रेलियन संघ केवळ ३५ षटकेच फलंदाजी करू शकला. तर प्रत्युत्तरात पाकिस्तानने २७ षटकांत १ विकेट गमावत मोठा विजय मिळवला. मात्र, पाकिस्तानच्या या उत्कृष्ट कामगिरीदरम्यान मोहम्मद रिझवानने मोठी चूक केली. ऑस्ट्रेलियाच्या खेळाडूच्या सांगण्यावरून रिव्ह्यू घेतला आणि फसला.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

३४ व्या षटकात मोहम्मद रिझवानबरोबर ही घटना घडली. नसीम शाह गोलंदाजी करत होता तर ऑस्ट्रेलियाचा अ‍ॅडम झाम्पा स्ट्राईकवर होता. ॲडम झाम्पाने नसीम शाहच्या बाऊन्सरवर स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न केला. चेंडूचा त्याच्या बॅटशी संपर्क झाला नाही आणि तो थेट रिझवानच्या हातात गेला. यानंतर रिझवानने झेलबादसाठी अपील करण्यास सुरुवात केली. पण अंपायरने झाम्पाला नाबाद दिले.

हेही वाचा – IND vs SA: भारत-आफ्रिका टी-२० मालिका लाईव्ह कुठे पाहता येणार? पहिल्या-दुसऱ्या सामन्याच्या वेळा वेगवेगळ्या, वाचा सविस्तर

पंचांनी झाम्पाला बाद दिल्यानंतर लगेच रिझवान पुढे आला आणि त्याने झाम्पाला विचारलं की – मी डीआरएस घेऊ का, यावर झाम्पा म्हणाला हो जरूर घे. झाम्पाचं बोलणं ऐकताच रिझवानने लगेच रिव्ह्यू घेतला आणि रिप्लेमध्ये ऑस्ट्रेलियाचा फलंदाज नाबाद असल्याचे दिसून आले. नसीम शाहच्या चेंडूवर झाम्पाचा एक सोपा झेल रिझवानने सोडला होता, जो थेट हवेत गेला होता. त्यानंतर तो झेल रिझवानला सहज पकडता आला असता, पण चेंडू ग्लोव्ह्जला लागून बाजूला पडला आणि झाम्पाला जीवदान मिळालं.

प्रथम फलंदाजी करताना ऑस्ट्रेलियाने १६४ धावांचे लक्ष्य ठेवले होते. संघ ३५ षटकांत सर्वबाद झाला. त्याच्यासाठी स्टीव्ह स्मिथने सर्वाधिक ३५ धावा केल्या. प्रत्युत्तरात पाकिस्तानने केवळ १ गडी गमावून २६.३ षटकात लक्ष्य गाठले. सॅम अयुबने ८२ धावांची शानदार खेळी केली. अब्दुल्ला शफीक ६४ धावा करून नाबाद राहिला. त्याने ४ चौकार आणि ३ षटकार मारले. बाबर आझम १५ धावा करून नाबाद राहिला. अशा प्रकारे पाकिस्तानने हा सामना 9 विकेटने जिंकला.

मराठीतील सर्व क्रीडा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Mohammed rizwan takes drs after consulting with adam zampa and loses review watch video aus vs pak 2nd odi bdg