Mohammed Shami Age Fraud Driving License Photo Goes Viral: मोहम्मद शमी जवळपास एका वर्षांच्या कालावधीनंतर दुखापतीतून सावरत क्रिकेटच्या मैदानावर उतरला आहे. शमीने रणजी ट्रॉफी सामन्यात चमकदार कामगिरी करत बंगालच्या विजयात मोठी भूमिका बजावली. मोहम्मद शमी रणजी ट्रॉफीत मध्य प्रदेशविरुद्ध चांगली कामगिरी केल्यानंतर तो ऑस्ट्रेलियासाठी रवाना होणार असल्याची चर्चा आहे. मीडिया रिपोर्ट्सनुसार, तो दुसऱ्या कसोटीपूर्वी भारतीय संघात सामील होऊ शकतो. दरम्यान, मोहम्मद शमी आता नव्या अडचणीत सापडल्याचे दिसत आहे.

एका व्यक्तीने शमीवर फसवणुकीचा आरोप केला आहे. शमीने त्याचे खरे वय लपवले असल्याचा दावा त्याने केला आहे. बीसीसीआयने चौकशी करून कारवाई करण्याची मागणीही या व्यक्तीने केली. अशा परिस्थितीत शमी ऑस्ट्रेलियाला बॉर्डर-गावस्कर ट्रॉफीसाठी जाऊ शकणार की नाही, असे प्रश्न उपस्थित केले जात आहेत.

Gujarat gold chain snatchers thieves active in vasai
गुजरातमधील सोनसाखळी चोर वसईत सक्रीय, गुन्हे प्रकटीकरण शाखेकडून अटक
kalyan yogidham society viral video
कल्याण मारहाण प्रकरण: “तो म्हणाला मुख्यमंत्री कार्यालयातून एक…
accused in satish wagh murder case get police custody till december 20
Satish Wagh Murder: सतीश वाघ खून प्रकरणातील आरोपींना २० डिसेंबरपर्यंत पोलीस कोठडी
fake power of attorney marathi news
सोलापूर : नामसाधर्म्याचा फायदा घेऊन बनावट कुलमुखत्यारपत्राद्वारे फसवणूक
Chennamaneni Ramesh BRS MLA
Chennamaneni Ramesh: भारतीय नागरिकत्व रद्द झालेले देशातील पहिले आमदार; कोण आहेत चेन्नमनेनी रमेश?
Sanjay Raut on Opration Lotus
Sanjay Raut : ‘मविआ’चे खासदार फुटणार असल्याची चर्चा; संजय राऊत म्हणाले, “भाजपा कोणतंही ऑपरेशन लोटस…”
Mohan Babu files police complaint against son Manchu Manoj
ज्येष्ठ अभिनेत्याने मुलगा अन् सूनेविरोधात दिली तक्रार; मुलानेही वडिलांवर केले आरोप
villagers rescue accused as well as cop falls into well In sangamner taluka
पुढे आरोपी, मागे पोलीस पाठलागाचा थरार ! आरोपी पाठोपाठ पोलीसही पडला विहिरीत

हेही वाचा – ENG vs WI: वेस्ट इंडिजचा इंग्लंडवर ऐतिहासिक विजय! संथ सुरूवातीनंतर षटकारांचा पाऊस, कॅरेबियन संघाने मोडला ७ वर्षे जुना विक्रम

इंदूरमध्ये मध्य प्रदेश आणि बंगाल यांच्यात रणजी करंडक सामना झाला. यादरम्यान शमी सामन्यातील सर्व ४ दिवस कोणत्याही अडचणीशिवाय खेळला. त्याने पहिल्या डावात ४ विकेट घेतले. तर दुसऱ्या डावातही दमदार कामगिरी करत संघाला ११ धावांनी रोमहर्षक विजय मिळवून दिला. मध्य प्रदेशविरुद्ध ३३८ धावांचा बचाव करणाऱ्या बंगालच्या दुसऱ्या डावात शमीने आधीच २ विकेट घेतले होते. यानंतर शमीने शेवटची विकेट घेत बंगालला ११ धावांनी रोमहर्षक विजय मिळवून दिला. मीडिया रिपोर्ट्सनुसार, तो बॉर्डर गावस्कर ट्रॉफीसाठी रोहित शर्माबरोबर ऑस्ट्रेलियाला रवाना होऊ शकतो. पण सध्या तो वेगळ्याच वादामुळे चर्चेत आला आहे.

हेही वाचा – IND vs AUS: शुबमन गिल ऑस्ट्रेलियाविरूद्ध पहिल्या कसोटीतून बाहेर, टीम इंडियाच्या अडचणी वाढल्या, ‘हा’ खेळाडू करणार पदार्पण?

मोहम्मद शमीवर खरे वय लपवल्याचा आरोप

मोहम्मद शमीवर पुन्हा एकदा नवीन आरोप करण्यात आला आहे. त्याची पत्नी हसीन जहाँनेही घरगुती हिंसाचार आणि मॅच फिक्सिंगसारखे गंभीर आरोप केले होते. मात्र, बीसीसीआयने त्याला फिक्सिंगप्रकरणी क्लीन चीट दिली. आता त्याच्यावर त्याचे खरे वय लपवल्याचा आरोप आहे. एका व्यक्तीने ड्रायव्हिंग लायसन्सचा फोटो सोशल मीडियावर शेअर केला आहे आणि दावा केला आहे की हे लायसन्स शमीचं आहे, त्यानुसार त्याचे वय ४२ आहे, तर शमीचे सध्याचे हे ३४ वर्षे आहे.

सोशल मीडियावर फोटो शेअर करणाऱ्या व्यक्तीच्या या दाव्यानंतर ड्रायव्हिंग लायसन्सचा फोटो व्हायरल होत आहे. मात्र, हा फोटो आणि त्यात दिलेली माहिती खरी आहे की ते एडिट करून पोस्ट करण्यात आली आहे, हे अद्याप स्पष्ट झालेले नाही.

हेही वाचा – IPL 2025 Mega Auction Schedule: आयपीएल २०२५ चा महालिलाव किती वाजता सुरू होणार? लाईव्ह टेलिकास्ट कुठे पाहता येईल? जाणून घ्या योग्य चॅनेल

भारतात वयाची फसवणूक केल्याबद्दल खेळाडूंना अनेकदा निलंबित करून बंदी घातली जाते. विशेषत: क्रिकेटमध्ये, अनेक क्रिकेटपटूंवर वयाच्या फसवणुकीसाठी अल्प कालावधीसाठी (१-२ वर्षे) बंदी घातली जाते. हे प्रामुख्याने अंडर-१९ क्रिकेटमुळे घडते. त्यांच्या राज्याकडून किंवा भारताकडून खेळण्याच्या प्रयत्नात, अनेक क्रिकेटपटू स्वतःहून किंवा त्यांच्या पालकांच्या, प्रशिक्षकांच्या प्रभावाखाली येऊन स्व:तचे वय कमी सांगतात. दोनच दिवसांपूर्वी हैदराबादच्या अंडर-१९ संघाच्या कर्णधारासह सहा खेळाडूंवर वयाच्या फसवणुकीसाठी दोन वर्षांची बंदी घालण्यात आली होती.

Story img Loader