Mohammed Shami Gets Bail: भारतीय क्रिकेट संघाचा महत्त्वाचा वेगवान गोलंदाज मोहम्मद शमीला १९ सप्टेंबर रोजी पत्नीच्या छळ आणि घरगुती हिंसाचार प्रकरणात मोठा दिलासा मिळाला आहे. शमीला अलीपूर कोर्टात हजर राहण्याचे आदेश देण्यात आले होते, त्यानंतर त्याचा जामीन अर्ज मंजूर करण्यात आला आहे. कोर्टात हजर राहण्याबरोबरच मोहम्मद शमीने जामीन अर्जही दाखल केला होता.

मंगळवारी अलीपूर कोर्टाने भारतीय क्रिकेटपटू मोहम्मद शमीला दोन हजार रुपयांच्या जातमुचलक्यावर जामीन मंजूर केला. शमी मंगळवारी कोलकात्याच्या अलीपूर एसीजेएम कोर्टात प्रत्यक्ष हजर झाला आणि त्याला जामीन मिळाला. २०१८ मध्ये हसीन जहाँने जाधवपूर पोलिस ठाण्यात दाखल केलेल्या एफआयआरच्या आधारे मोहम्मद शमी आणि त्याच्या कुटुंबातील काही सदस्यांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला होता. त्यानंतर शमीविरुद्ध कायदेशीर कारवाई सुरू करण्यात आली.

Baba Siddiqui murder case Arrest of accused financial helper Mumbai
बाबा सिद्दीकी हत्या प्रकरण: आरोपींना आर्थिक मदत करणाऱ्याला अटक
Nana Patole On Devendra Fadnavis :
Nana Patole : निकालाआधी राजकीय घडामोडींना वेग; यातच…
Mohammed Shami Accused of Age Fraud With Viral photos of Driving License Ahead Of Border Gavaskar Trophy IND vs AUS
Mohammed Shami Age Fraud: मोहम्मद शमीनं खरं वय लपवलं? फसवणूक केल्याचे जाहीर आरोप; BCCI कडे केली तपासाची मागणी!
Immediate relief, Nawab Malik, High Court,
नवाब मलिक यांना तूर्त दिलासा, मात्र….; वैद्यकीय जामिनावर असताना त्रासाविना प्रचार करत असल्याची उच्च न्यायालयाकडून दखल
Attack on police officer on patrol
मुंबई : गस्तीवर असलेल्या पोलीस अधिकाऱ्यावर हल्ला
nawab malik
नवाब मलिक यांचा जामीन रद्द करा ,मागणीसाठी उच्च न्यायालयात याचिका; जामिनाच्या अटींचे उल्लंघन केल्याचा दावा
Mohammed Shami set for Ranji Trophy comeback, sparks Border-Gavaskar Trophy hopes
Mohammed Shami: भारतीय संघासाठी बॉर्डर गावस्कर ट्रॉफीपूर्वी आनंदाची बातमी, मोहम्मद शमीच्या ‘या’ तारखेला क्रिकेटच्या मैदानावर करणार पुनरागमन

तत्पूर्वी, वकिलाने शमीला न्यायालयात हजर राहून जामीन घेण्यास सांगितले होते. २०१८ मध्ये, शमीवर त्याची माजी पत्नी हसीन जहाँने घरगुती हिंसाचाराचा आरोप केला होता आणि तिने खालच्या न्यायालयात केस दाखल केली होती. पत्नीच्या छळ प्रकरणात मोहम्मद शमी पहिल्यांदाच कोर्टात हजर झाला. ५ ऑक्टोबरपासून खेळल्या जाणार्‍या विश्वचषक २०२३च्या आधी, भारतीय क्रिकेटपटू मंगळवारी, १९ सप्टेंबर रोजी न्यायालयात हजर झाला आणि जामिनासाठी अर्ज केला. न्यायाधिशांनी याचिका मान्य करत जामीन मंजूर केला.

हेही वाचा: चीनकडून भारताचा पराभव ; आशियाई क्रीडा स्पर्धेतील फुटबॉलच्या पहिल्या सामन्यात १-५ अशा फरकाने हार

विश्वचषकापूर्वी भारतीय क्रिकेटपटू मंगळवारी कोर्टात हजर झाले. शमीचा भाऊ मोहम्मद हसिमही त्याच्यासोबत होता. दोघांनी जामिनासाठी अर्ज केला. न्यायाधीशांनी याचिका मान्य करत दोघांनाही जामीन मंजूर केला. शमीचे वकील सलीम रहमान म्हणाले, “शमी आणि त्याचा भाऊ हसिम कोर्टात हजर झाले. त्यांनी जामिनासाठी अर्ज केला. तो अर्ज न्यायालयाने मंजूर केला आहे.” सलीम यांच्याशिवाय वकील नजमुल आलम सरकार न्यायालयात उपस्थित होते.

२३ ऑगस्ट रोजी अलीपूरच्या अतिरिक्त सत्र न्यायाधीशांनी असा निर्णय दिला की, हसीनच्या तक्रारीच्या अनुषंगाने शमीला बोलावण्याचे कोणतेही कारण न्यायालयाला सापडले नाही. त्यामुळे सध्या त्याला न्यायालयात हजर राहण्याची गरज नाही. मात्र, पुढील ३० दिवसांच्या आत भारतीय क्रिकेटपटूला खटल्यातील पुढील कार्यवाहीसाठी ट्रायल कोर्टात अर्ज करावा लागेल. या कालावधीत तो जामिनासाठी अर्ज करू शकतो. ट्रायल कोर्ट शमीरच्या जामिनावर कायद्यानुसार निर्णय देईल. या आदेशानंतर शमी कोर्टात हजर झाला आणि त्याला जामीन मिळाला.

८ मार्च २०१८ रोजी हसीनने मोहम्मद शमी आणि त्याच्या भावाविरुद्ध जादवपूर पोलिस ठाण्यात एफआयआर दाखल केला होता आणि त्यांच्यावर तिचा छळ केल्याचा आरोप केला होता. २९ ऑगस्ट २०१९ रोजी अलीपूरच्या ACJM कोर्टाने शमीविरोधात अटक वॉरंट जारी केले होते. त्याच वर्षी ९ सप्टेंबर रोजी अलीपूर जिल्हा सत्र न्यायालयाने या आदेशाला स्थगिती दिली. जवळपास चार वर्षांपासून हे प्रकरण प्रलंबित आहे.

हेही वाचा: विश्वचषक नेमबाजी स्पर्धा : निश्चलची रौप्य कामगिरी

ऑस्ट्रेलिया मालिकेत शमीवर सर्वांची नजर असेल

मोहम्मद शमीला आशिया चषक २०२३ मध्ये फक्त २ सामने खेळण्याची संधी मिळाली, ज्यामध्ये त्याने एक नेपाळविरुद्ध आणि दुसरा बांगलादेश संघाविरुद्ध खेळला. या दोन्ही सामन्यांमध्ये शमीने आपल्या गोलंदाजीने सर्वांना प्रभावित केले. आता त्याला विश्वचषकापूर्वी ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या ३ सामन्यांच्या वन डे मालिकेतील सर्व सामने खेळण्याची संधी मिळू शकते. अशा स्थितीत त्याच्या गोलंदाजीच्या कामगिरीकडे सर्वांच्या नजरा लागल्या आहेत.