India vs New Zealand ICC Cricket World Cup 2023: विश्वचषकाच्या २१व्या सामन्यात भारत आणि न्यूझीलंडचे संघ आमनेसामने आहेत. धरमशाला येथील हिमाचल प्रदेश क्रिकेट असोसिएशन स्टेडियमवर टीम इंडियाचा कर्णधार रोहित शर्माने नाणेफेक जिंकून गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. भारतीय संघ आज दोन बदलांसह मैदानात उतरला. अष्टपैलू हार्दिक पांड्याला दुखापत झाल्यामुळे हे करावे लागले. शार्दुल ठाकूरला संघाचे समतोल साधण्यासाठी बाहेर व्हावे लागले. मोहम्मद शमी आणि सूर्यकुमार यादव यांना प्लेइंग-११ मध्ये ठेवण्यात आले होते.

नवव्या षटकात मोहम्मद शमीला रोहित शर्माने गोलंदाजीसाठी पाचारण केले. शमीने या विश्वचषकात पहिल्याच चेंडूवर विकेट घेतली. त्याने किवी सलामीवीर विल यंगला क्लीन बोल्ड केले. यंग २७ चेंडूत १७ धावा करून बाद झाला. विश्वचषकाच्या इतिहासात शमीची ही ३२वी विकेट आहे. स्पर्धेत सर्वाधिक विकेट घेणारा तो तिसरा भारतीय गोलंदाज ठरला. त्याने अनिल कुंबळेला मागे टाकले. त्याने आजच्या सामन्यात पाच विकेट्स घेत भारतीय संघाला सामन्यात परत आणले.

IND vs NZ AB de Villiers statement on Virat Kohli and Team India
IND vs NZ : ‘आता तो काळ गेला…’, लाजिरवाण्या पराभवानंतर विराटसह टीम इंडियाबद्दल एबी डिव्हिलियर्सचे मोठे वक्तव्य
sharad pawar raj thackeray (1)
शरद पवारांचं राज ठाकरेंना आव्हान; जातीयवादाच्या टीकेवर म्हणाले,…
Rohit Sharma Statement on India Defeat Against New Zealand in Test Series Said We just didnt bat well enough IND vs NZ Pune
IND vs NZ: “…तर आता परिस्थिती वेगळी असती”, रोहित शर्माचे भारताने मालिका गमावल्यानंतर मोठे वक्तव्य, कोणावर फोडले पराभवाचे खापर?
IND vs NZ vs New Zealand 2nd Pune Test Match Updates in Marathi
IND vs NZ : १२ वर्षांनंतर भारताला मायदेशात कसोटी मालिका गमावण्याचा धोका, इतिहास बदलणार का?
IND vs NZ India vs New Zealand Pune Test Match Updates in Marathi
IND vs NZ : रविचंद्रन अश्विनने शेन वॉर्नला मागे टाकत केला मोठा पराक्रम; ‘ही’ कामगिरी करणारा ठरला तिसरा गोलंदाज
IND vs NZ Sarfaraz Urges Rohit for DRS
IND vs NZ : सर्फराझच्या हट्टाने भारताला मिळवून दिली विकेट, रोहितकडे DRS घेण्यासाठी आग्रह करतानाचा VIDEO व्हायरल
India Predicted Playing XI for IND vs NZ 2nd Pune Test Washington Sundar Might Replace Ravichandran Ashwin
IND vs NZ: अश्विनच्या जागी वॉशिंग्टन सुंदरला संघात देणार संधी? न्यूझीलंडविरूद्ध कसोटीसाठी कशी असणार भारताची प्लेईंग इलेव्हन?
IND vs NZ 1st Test New Zealand beat India by 8 wickets
IND vs NZ : न्यूझीलंडविरुद्धच्या पराभवानंतर भारताने नोंदवला लाजिरवाणा विक्रम, १९ वर्षांनंतर झाली मोठी उलथापालथ

मोहम्मद शमीला चार सामन्यांत संधी मिळाली नाही

न्यूझीलंडविरुद्धच्या सामन्यापूर्वी शमी चार सामन्यांत खेळू शकला नव्हता. टीम कॉम्बिनेशनमुळे त्याची संघात जागा उपलब्ध होऊ शकली नाही. शमीच्या जागी मोहम्मद सिराजला सतत संधी दिली जात असून सिराजही चांगली कामगिरी करत आहे.

वर्ल्ड कपमध्ये सर्वाधिक विकेट घेणारे भारतीय गोलंदाज

गोलंदाजविकेट्स
झहीर खान४४
जवागल श्रीनाथ४४
मोहम्मद शमी३६
अनिल कुंबले३१

शमीने कपिल देवसह पाच गोलंदाजांना एकाच वेळी मागे सोडले

मोहम्मद शमी व्यतिरिक्त विश्वचषकात भारतासाठी एका सामन्यात पाच किंवा त्यापेक्षा जास्त विकेट घेणार्‍यांची नावे आहेत कपिल देव, व्यंकटेश प्रसाद, रॉबिन सिंग, आशिष नेहरा आणि युवराज सिंग. शमी वगळता बाकी सर्वांनी एकदाच असे केले आहे.

हेही वाचा: IND vs NZ Live, World Cup 2023: मोहम्मद शमीचे पंचक! डॅरिल मिशेलच्या शतकी खेळीमुळे न्यूझीलंडने भारतासमोर ठेवले २७४ धावांचे आव्हान

मोहम्मद शमीने ताहिरची केली बरोबरी

शमीने पाचव्यांदा विश्वचषकात एका सामन्यात चार किंवा त्याहून अधिक विकेट्स घेतल्या. या बाबतीत तो संयुक्तपणे दुसऱ्या स्थानावर आहे. शमीने दक्षिण आफ्रिकेचा माजी फिरकीपटू इम्रान ताहिरची बरोबरी केली. आता फक्त ऑस्ट्रेलियाचा वेगवान गोलंदाज मिचेल स्टार्क त्याच्या पुढे आहे. असे त्याने सहा वेळा केले आहे.

न्यूझीलंडने भारतासमोर २७३ धावांचे ठेवले आव्हान

प्रथम फलंदाजी करताना न्यूझीलंडने ५० षटकांत सर्व गडी गमावून २७३ धावा केल्या. हा सामना जिंकण्यासाठी भारताला २७४ धावांची गरज आहे. न्यूझीलंडकडून डॅरिल मिशेलने सर्वाधिक १३० धावा केल्या. रचिन रवींद्रने ७५ आणि ग्लेन फिलिप्सने २३ धावांचे योगदान दिले. या तिघांव्यतिरिक्त केवळ विल यंग (१७ धावा) दुहेरी आकडा गाठू शकला. भारताकडून मोहम्मद शमीने पाच आणि कुलदीप यादवने दोन विकेट्स घेतल्या. जसप्रीत बुमराह आणि मोहम्मद सिराज यांना प्रत्येकी एक विकेट त्याला मदत केली. या मैदानावर न्यूझीलंडच्या गोलंदाजीसमोर या धावसंख्येचा पाठलाग करणे सोपे नसेल.