Mohammed Shami brilliant bowling for Bengal in Vijay Hazare Trophy 2025 : भारतीय संघाचा वेगवान गोलंदाज मोहम्मद शमी एकापाठोपाठ एक चमकदार कामगिरी करत टीम इंडियाचे दरवाजे ठोठावत आहे. गेल्या वर्षी एकदिवसीय विश्वचषकाच्या अंतिम सामन्यानंतर वर्षभर क्रिकेटपासून दूर असलेला शमी परतल्यानंतर चमकदार कामगिरी करत आहे. त्याने आपला उत्कृष्ट फॉर्म सुरू ठेवताना गुरुवारी विजय हजारे ट्रॉफीच्या बाद फेरीत हरियाणाविरुद्धच्या सामन्यात दमदार गोलंदाजी केली. या सामन्यात त्याची सुरुवात खराब झाली होती, मात्र, त्यानंतर फलंदाजांना शमीने आपल्यापुढे घुडगे टेकायला लावले.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

मोहम्मद शमीने घेतल्या तीन विकेट्स –

मोहम्मद शमीने हरियाणाविरुद्धच्या बाद फेरीत ८ षटकांत ४८ धावा देत ३ विकेट्स घेतल्या. त्याचा पहिला बळी हिमांशू राणा हा सहाव्या षटकात यष्टिरक्षक अभिषेक पोरेलने झेलबाद झाला. शमीने त्याच्या पहिल्या स्पेलच्या उरलेल्या षटकांमध्ये ६.६७ च्या इकॉनॉमी रेटने ४० धावा दिल्या. ४२ व्या षटकात त्याने दिनेश बानाला बाद करताना आपली दुसरी विकेट घेतली. शमीने लवकरच अंशुल कंबोजला पॅव्हेलियनमध्ये पाठवले आणि सामन्यातील आपली तिसरी विकेट घेतली. या सामन्यात डावाच्या सुरुवातीला सलामीवीर अर्श रंगाने शमीच्या चेंडूंवर दोन षटकार ठोकले होते.

मोहम्मद शमी टीम इंडियात पुनरागमनासाठी सज्ज –

विशेष म्हणजे निवड समिती बाद फेरीचा सामना पाहण्यासाठी स्टेडियममध्ये उपस्थित असल्याची माहिती आहे. इंग्लंडविरुद्धच्या मर्यादित षटकांच्या मालिका आणि पाकिस्तानमध्ये होणाऱ्या चॅम्पियन्स ट्रॉफीसाठी बीसीसीआय लवकरच संघ जाहीर करणार आहे. अशा परिस्थितीत शमी वर्षभरानंतर राष्ट्रीय संघात पुनरागमन करेल अशी पूर्ण आशा आहे. बॉर्डर-गावसकर करंडक स्पर्धेच्या मध्यभागी तो पुनरागमन करेल अशी अपेक्षा होती, परंतु त्याला रिकव्हरीदरम्यान समस्या आल्या, त्यामुळे टीम इंडियातील त्याचे पुनरागमन लांबणीवर पडले.

हेही वाचा – Pat Cummins : चॅम्पियन्स ट्रॉफीपूर्वी ऑस्ट्रेलियाला धक्का? ‘हा’ स्टार खेळाडू संपूर्ण स्पर्धेला मुकण्याची शक्यता

मोहम्मद शमीचे जबरदस्त कमबॅक –

२०२४ च्या सुरुवातीला एकदिवसीय विश्वचषकादरम्यान घोट्याला दुखापत झाल्यानंतर शमीवर शस्त्रक्रिया करावी लागली. त्यानंतर नॅशनल क्रिकेट अकादमी (एनसीए) मध्ये त्याने रिकव्हरीला सुरुवात केली आणि रणजी ट्रॉफीमध्ये पुनरागमन केले. त्यानंतर त्याने सय्यद मुश्ताक अली ट्रॉफीमध्ये भाग घेतला आणि त्यानंतर विजय हजारे ट्रॉफीच्या प्राथमिक फेरीच्या सामन्यांसाठी त्याला विश्रांती देण्यात आली. मात्र, आता तो भारताच्या चॅम्पियन्स ट्रॉफी संघात स्थान मिळवण्याच्या जवळ आहे.