Mohammed Shami Controversial Statement on India Matches at Dubai: चॅम्पियन्स ट्रॉफी २०२५ चे यजमानपद पाकिस्तानकडे होते, तर हायब्रिड मॉडेलअंतर्गत भारताचे सामना दुबईत होते. भारताचे सर्व सामने दुबईत खेळवले गेले आणि आता भारतीय संघ अंतिम फेरीत पोहोचल्याने अंतिम सामनाही पाकिस्तानऐवजी दुबईत होणार आहे. भारताचे सर्व सामने दुबईत होत असल्याने संघाला टीकेला सामोरे जावे लागत आहे. यादरम्यान संघाचे कोच गौतम गंभीरने दुबईत सामने खेळण्याबाबत अभ्यासपूर्ण वक्तव्य देत सर्वांची बोलती बंद केली होती, पण आता शमीच्या वक्तव्याने पुन्हा सर्वांचं लक्ष वेधलं आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

अलीकडेच नासेर हुसेन आणि मायकेल आथर्टन यांनी एका पॉडकास्टमध्ये सांगितले की भारतीय संघ एकाच ठिकाणी सामने खेळण्याचा एक फायदा आहे ज्याचे मोजमाप करणे कठीण आहे. मात्र, भारतीय संघाचा कर्णधार रोहित शर्मा आणि गौतम गंभीर यांनी याला नकार दिला. त्याचवेळी आता भारताचा वेगवान गोलंदाज मोहम्मद शमीने दुबईत खेळणे फायदेशीर असल्याचे सांगून या प्रकरणाला पुन्हा चर्चेत आणलं आहे.

भारताच्या सेमीफायनलमधील विजयानंतर बोलताना मोहम्मद शमीने सांगितले की एकाच ठिकाणी सर्वच सामने खेळणं खूप फायद्याचं आहे. मोहम्मद शमीला वाटले की एकाच शहरात राहून खेळणं हा एक निश्चित फायदा आहे. शमी म्हणाला, “एकाच ठिकाणी सामने खेळणं हा नक्कीच एक फायदा आहे. तुम्हाला परिस्थिती आणि खेळपट्टीची अधिक चांगली समज मिळते. यामुळे आम्हाला खूप मदत झाली आहे.”

अलीकडेच नासेर हुसेन आणि मायकेल आथर्टन यांनी स्काय स्पोर्ट्स पॉडकास्टमध्ये या विषयावर चर्चा केली. अथर्टन म्हणाले होते की, फक्त दुबईत खेळून भारताला काय फायदा? मला वाटते की हा एक अशा फायदा आहे, जो मोजणं अशक्य आहे. पण हा एक निर्विवाद फायदा आहे. हुसेन यांनीही याला होकार दिला होता.

दुबईमध्ये भारताला सर्व सामने खेळण्याची परवानगी मिळाल्याबद्दल चिंता व्यक्त करणाऱ्या भारतीय संघाच्या टीकाकारांसाठी शमीची टिप्पणी चर्चेसाठी मोठा विषय ठरेल. भारताला आता न्यूझीलंडविरूद्ध अंतिम फेरीचा सामना खेळणार आहे. हा सामना ९ मार्च रविवारी होईल.