Mohammed Shami Mother: भारतीय संघाचा स्टार वेगवान गोलंदाज मोहम्मद शमी विश्वचषक स्पर्धेनंतर आपल्या घरी परतला आहे. शमीने आईबरोबरचा एक फोटोही शेअर केला आहे. हा फोटो शेअर करताना शमीने लिहिले की, त्याची आई त्याच्यासाठी खूप आहे. आई लवकरच बरी होईल, अशी आशाही शमीने व्यक्त केली आहे. या फोटोमध्ये शमी आईला मिठी मारताना दिसत आहे.

मोहम्मद शमीने एकदिवसीय विश्वचषक २०२३ मध्ये चमकदार कामगिरी केली आणि सर्वाधिक २४ विकेट्स घेणारा गोलंदाज ठरला. सर्वात महत्त्वाची बाब म्हणजे पहिल्या चार सामन्यांमध्ये शमीला खेळण्याची संधी मिळाली नाही, असे असतानाही त्याने सर्वांना मागे टाकत विकेट्स घेण्याच्या शर्यतीत पहिला आला. भारतीय भूमीवर वेगवान गोलंदाजाची ही कामगिरी अविश्वसनीय आहे. शमी हा वर्ल्ड कपमध्ये भारताकडून सर्वाधिक विकेट्स घेणारा गोलंदाज आहे.

Rajesh Khanna, sanjeev kumar
राजेश खन्नांपेक्षा शत्रुघ्न सिन्हा, संजीव कुमार वाईट होते, असं का म्हणाल्या शबाना आझमी?
Madhuri Dixit Refused Darr Offer Do You Know The Reason?
Madhuri Dixit : डर चित्रपट माधुरी दीक्षितने का…
rashmika mandanna salman khan
“मी आजारी आहे समजल्यावर…” रश्मिका मंदानाने सांगितला सलमान खानबरोबर काम करतानाचा ‘तो’ किस्सा, म्हणाली, “स्वप्न…”
Sanjay Raut Brother Post News
Sanjay Raut Brother : संजय राऊत यांच्या सख्ख्या भावाची पोस्ट चर्चेत; डिलिट करत म्हणाले, “मी..”
Anju Bhavnani
दीपिका-रणवीरची लेक झाली तीन महिन्यांची; आजी अंजू भवनानी यांनी नातीसाठी केली ‘ही’ गोष्ट, पाहा फोटो
PM Narendra Modi special Note for Kareena Kapoor and saif ali khan sons
करीना कपूर-सैफ अली खानच्या मुलांसाठी पंतप्रधान नरेंद्र मोदींनी दिली ‘ही’ खास भेट, अभिनेत्रीने फोटो केला शेअर
salman khan mother danching with helan
Video : सलमान खानच्या आईने हेलन यांच्याबरोबर धरला ठेका; उपस्थितही पाहतच राहिले, व्हिडीओ होतोय व्हायरल
Gashmeer Mahajani
“…तरच मूल होऊ द्या”, पालकत्वाविषयी स्पष्टच बोलला गश्मीर महाजनी; म्हणाला, “तुम्ही आई-वडील म्हणून कैद…”

एकदिवसीय विश्वचषक फायनल दरम्यान शमीच्या आईची प्रकृती खालावली होती. त्यालाही रुग्णालयात दाखल करावे लागले. मात्र, या काळात शमी देशासाठी सामनेही खेळत होता. टीम इंडियाला फायनलमध्ये पराभवाला सामोरे जावे लागले होते, मात्र शमीच्या कामगिरीचे सर्वांनी कौतुक केले. ३३ वर्षीय मोहम्मद शमी पुढील विश्वचषकात टीम इंडियासाठी चमत्कार करू शकतो आणि परदेशी भूमीवर विश्वचषक जिंकण्यात महत्त्वाची भूमिका बजावू शकतो.

विश्वचषकानंतर शमीने एका मुलाखतीत आपल्या आईबद्दल सांगितले की, “त्याचे कुटुंब त्याच्यासाठी खूप महत्वाचे आहे.” शमीने पुढे असेही सांगितले होते की, “त्याचे कुटुंबातील सदस्य त्याचे चांगले मित्र आहेत. शमीचे कुटुंब प्रत्येक अडचणीत त्याच्या पाठिशी होते. यामुळे तो या पदापर्यंत पोहोचण्यात यशस्वी ठरला आहे.”

हेही वाचा: IND vs AUS: भारत-ऑस्ट्रेलिया सामन्यात पावसाची शक्यता? जाणून घ्या विशाखापट्टणमचे हवामान आणि खेळपट्टी अंदाज

विश्वचषकाच्या फायनलमध्ये भारतीय संघ जरी ऑस्ट्रेलियाविरुद्ध हरला असला तरी आपल्या कामगिरीने सर्वांची मने जिंकली. टीम इंडियाने फायनल वगळता संपूर्ण स्पर्धेत चमकदार कामगिरी केली आणि सलग १० सामने जिंकले. आयसीसीने निवडलेल्या स्पर्धेतील सर्वोत्तम संघातही भारतीय खेळाडूंचा दबदबा दिसून आला. ११ पैकी सहा खेळाडू भारतातून निवडले गेले. विराट कोहलीने ११ डावात ७६५ धावा केल्या. तो सर्वाधिक धावा करणारा फलंदाज ठरला. दुसरीकडे, मोहम्मद शमीने सात सामन्यांत २४ विकेट्स घेतल्या. तो या स्पर्धेत सर्वाधिक विकेट्स घेणारा गोलंदाज ठरला होता. शमीच्या यशावर देशवासीय खूप अभिमान वाटत आहे.

Story img Loader