IND vs ENG 3rd T20I Updates in Marathi: भारत आणि इंग्लंड यांच्यातील पाच सामन्यांच्या टी-२० मालिकेतील तिसरा सामना राजकोटच्या स्टेडियममध्ये खेळवला जात आहे. या मालिकेत टीम इंडिया सध्या २-० ने पुढे आहे. त्याचवेळी, मालिकेतील तिसऱ्या सामन्यासाठी टीम इंडियाने प्लेइंग इलेव्हनमध्ये मोठा बदल केला आहे. भारताचा वेगवान गोलंदाज मोहम्मद शमीचे भारतीय संघाच्या प्लेइंग इलेव्हनमध्ये पुनरागमन झाले आहे. यासह भारतीय चाहत्यांची १५ महिन्यांची प्रतीक्षा संपली आहे. मोहम्मद शमीने याआधी २०२३ च्या एकदिवसीय विश्वचषकात टीम इंडियासाठी शेवटचा सामना खेळला होता.
मोहम्मद शमीला २०२३ च्या एकदिवसीय विश्वचषकादरम्यान पायाच्या घोट्याला दुखापत झाली होता. त्यानंतर तो टीम इंडियाच्या बाहेर होता. यानंतर फेब्रुवारी २०२४ मध्ये त्याच्या घोट्यावर शस्त्रक्रिया करावी लागली. त्यानंतर देशांतर्गत क्रिकेट खेळून त्याने फिटनेसची चाचणी घेतली आणि टीम इंडियात पुनरागमन केले. शमीने रणजी ट्रॉफी, सय्यद मुश्ताक अली ट्रॉफी आणि विजय हजारे ट्रॉफीमध्ये बंगाल संघासाठी चांगली कामगिरी केली. मोहम्मद शमीची चॅम्पियन्स ट्रॉफीसाठी भारतीय संघात निवड झाली आहे. त्यामुळे शमीला आपला फॉर्म परत मिळवून देण्यासाठी ही मालिका खूप महत्त्वाची आहे. अर्शदीप सिंगला विश्रांती देत मोहम्मद शमीला प्लेईंग इलेव्हनमध्ये संधी मिळाली आहे.
शमी बऱ्याच दिवसांनी भारतीय संघासाठी टी-२० सामना खेळण्यासाठी उतरला आहे. २०२२ च्या टी-२० विश्वचषकानंतर तो भारतासाठी टी-२० सामना खेळण्याची ही पहिलीच वेळ आहे. या सामन्यापूर्वी मोहम्मद शमीने टीम इंडियासाठी केवळ २३ टी-२० सामने खेळले आहेत. यादरम्यान, त्याने ८.९४ च्या इकॉनॉमीने धावा केल्या आहेत आणि केवळ २४ विकेट घेतल्या आहेत.ॉ
भारताची प्लेइंग इलेव्हन:
संजू सॅमसन, अभिषेक शर्मा, सूर्यकुमार यादव, तिलक वर्मा, ध्रुव जुरेल, हार्दिक पंड्या, अक्षर पटेल, वॉशिंग्टन सुंदर, मोहम्मद शमी, रवी बिश्नोई आणि वरुण चक्रवर्ती.
इंग्लंडची प्लेइंग इलेव्हन:
जोस बटलर (कर्णधार), बेन डकेट, फिल सॉल्ट, हॅरी ब्रूक, लियाम लिव्हिंग्स्टन, जेमी स्मिथ, जेमी ओव्हरटन, ब्रेडन कार्स, जोफ्रा आर्चर, मार्क वुड आणि आदिल रशीद.
© IE Online Media Services (P) Ltd