Mohammad Shami friend reveals about the car accident : टीम इंडियाचा वेगवान गोलंदाज मोहम्मद शमीने मैदानात आणि मैदानाबाहेर अनेक चढउतार पाहिले आहेत. दुखापतीमुळे वारंवार बाहेर राहणे, पत्नी हसीन जहाँशी संबंधित वैयक्तिक समस्या, मुलीपासून दूर राहणे आणि सर्वात त्रासदायक बाब म्हणजे हसीन जहाँने त्याच्यावर मॅच फिक्सिंग आणि इतर अनेक आरोप केले होते. पत्नी हसीन जहाँने शमीविरोधात घरगुती हिंसाचाराची तक्रारही दाखल केली होती. त्याचबरोबर तिने मोहम्मद शमीवर मॅच फिक्सिंगचा गंभीर आरोपही केला होता.

याच कारणामुळे बीसीसीआयने त्याचा केंद्रीय करार काही काळासाठी थांबवला होता. हा काळ शमीच्या कारकिर्दीतील सर्वात वाईट काळ होता, ज्याने त्याला आपले जीवन संपवण्याचा विचार करण्यास भाग पाडले. मात्र, मोहम्मद शमीला लवकरच मॅच फिक्सिंग प्रकरणात क्लीन चिट मिळाली.जेव्हा शमीला क्लीन चिट मिळाल्याची बातमी समजली, तेव्हा त्याच्या आनंदाला पारावार उरला नव्हता. मात्र, काही दिवसांनी मोहम्मद शमीचा एक मोठा अपघात झाला. त्या अपघातात शमीला जीव गमवावा लागला असता.

मोहम्मद शमीचा आत्महत्येचा प्रयत्न –

या अपघाताविषयी शमीने शुभंकर मिश्राच्या पॉडकास्टमध्ये सांगितले. यावेळी मोहम्मद शमीबरोबर त्याचा मित्र आमदार उमेश कुमारही उपस्थित होता. उमेशने सांगितले की, ‘शमीच्या आयुष्यातील सर्वात भावनिक क्षण म्हणजे ज्या रात्री त्याने आत्महत्या करण्याचा विचार केला होता. त्या रात्री तो आतून तुटला होता.’ दरम्यान, ‘शमी म्हणाला, माझ्या मते मला दोन प्रसंग आठवतात. एक ती रात्र आहे ज्याबद्दल हा सांगत आहे. एक तो प्रसंग होता, जिथे आम्हाला सगळं संपलं असं वाटत होतं. जेव्हा आमचा अपघात झाला होता. आम्ही दोघे गाडीत होतो. त्यावेळी मला वाटतं की कदाचित तो आमच्या दोघांचा आयुष्यातील शेवटचा दिवस ठरला असता.’

हेही वाचा – Test Rankings : आयसीसीची कसोटी क्रमवारी जाहीर! हॅरी ब्रूकची रोहितवर सरशी, जाणून घ्या टॉप-१० मधील खेळाडू

मोहम्मद शमीच्या कारला अपघात –

यावर उमेश म्हणाला, ‘हो. शमीला क्लीन चिट मिळाली होती. मग असे झाले की आम्ही डेहराडूनला गेलो. आम्ही दोघे डेहराडूनला गेलो. तेथे त्याने काही दिवस स्टेडियममध्ये सराव केला. आम्ही परतत होतो. सकाळचे पाच साडेपाच किंवा सहा वाजले असावेत आणि आम्हा दोघांनाही झोप लागली. मी ड्रायव्हिंग सीटवर होतो आणि हा माझ्या बाजूला होता. त्यावेळी अचानक वाहनाचा चक्काचूर झाल्यासारखा भास झाला. उमेशने पुढे म्हणाला, जेव्हा त्याला शुद्ध आली तेव्हा त्याने पाहिले की शमीच्या डाव्या बाजूने पूर्ण रक्तस्त्राव होत होता.’

यानंतर शमी म्हणाला, ‘ट्रकने कारला समोरून धडक दिली आणि समोरच्या इंडिकेटरपासून मागच्या इंडिकेटरपर्यंत कार फाडली. ते दृश्य खूपच भयानक होते. उमेश म्हणाला, खूप दुखापत झाल्याने सर्वकाही रक्तरंजित होते. माझा मुलगा, जो लहान आहे, त्याच्या चेहऱ्यावरही जखमा झाल्या होत्या आणि त्यावेळी मला काहीच सुचत नव्हते.’ मोहम्मद शमी म्हणाला, ‘यामध्ये सर्वात धक्कादायक गोष्ट म्हणजे ट्रकने धडक दिल्यानंतर पळ काढळा. या दरम्यान त्याने एस्कॉर्टची गाडीही उडवली. त्यानंतर जेव्हा गाडी असंतुलित होऊन रस्त्यावर गेली तेव्हा ट्रान्सफॉर्मर त्याच्यापासून दोन मीटर दूर होता.’

हेही वाचा – IND vs SL : भारत-श्रीलंका मालिका सुरू होण्यापूर्वीच मोठा धक्का! ‘हा’ मॅच विनर खेळाडू दुखापतीमुळे बाहेर

‘…तर कोणीही वाचले नसते’

त्यावर उमेश म्हणाला, ‘दोन मीटर नाही, फक्त एक मीटर. म्हणजे जिथे गाडी अडकली, तिथे एका बाजूला दरी होती आणि समोर एक खांब होता, त्यावर ट्रान्सफॉर्मर लावला होता आणि गाडी तिथेच थांबली होती, पण पलटली नाही. जर गाडीने पलटी खाली असती तर कोणीही वाचले नसते.’ वेगवान गोलंदाज पुढे म्हणाला की, ‘एका बाजूला दरी होती, समोर एक ट्रान्सफॉर्मर होता आणि मी त्यातून कसा तरी बाहेर पडलो. हा मागून बाहेर निघाला.’ अपघातानंतरची कहाणी सांगताना उमेश म्हणाला, ‘मग लगेच तातडीने शमी सीएमआयमध्ये दाखल केले. तिथे त्याच्यावर शस्त्रक्रिया झाली. अशा प्रकारे आम्ही दोघांनीही आयुष्यात हे दोन भयानक प्रसंग एकत्र पाहिले आहेत. जिथे आम्हाला सगळं संपलं असं वाटत होतं.’