Mohammed Shami Reveals MS Dhoni Retirement Strategy : एमएस धोनी आयपीएलमधून निवृत्ती कधी जाहीर करणार? हा एक प्रश्न आहे, ज्याचे उत्तर अजून मिळायचे आहे. माहीने ऑगस्ट २०२० मध्ये आपल्या आंतरराष्ट्रीय क्रिकेट कारकिर्दीला अलविदा केला होता. पण तो आयपीएलमध्ये सीएसकेसाठी खेळत आहे. धोनी आयपीएल २०२४ चा हंगामा सुरु होण्यापूर्वीपर्यंत धोनी निवृत्त होईल अंदात वर्तवला होता. मात्र, धोनीने हा हंगामही खेळताना दिसला. त्यामुळे माही कधी निवृत्त होणार या प्रश्नाचे उत्तर कोणाकडेच नाही. आता धोनीच्या निवृत्तीच्या प्लॅनबद्दल वेगवान गोलंदज मोहम्मद शमीने खुलासा केला आहे.
मोहम्मद शमीचा धोनीच्या निवृत्तीच्या प्लॅनबद्दल खुलासा –
शुभंकर मिश्राच्या यूट्यूब चॅनलवर बोलताना मोहम्मद शमी म्हणाला, “तुम्ही (मीडिया) लोक त्याच्या भविष्यावर प्रश्नचिन्ह लावत आहात. तो माणूस स्वत: म्हणतोय वेळ आल्यावर सांगेन. त्यामुळे हा प्रश्न तुम्ही सारखा विचारु नये. याबाबत माही भाईशी माझी चर्चा झाली आहे. ज्यामध्ये मी विचारले होते की खेळाडूने कधी निवृत्ती घ्यावी? यावर तो म्हणाला, एक म्हणजे जेव्हा तुम्हाला स्वतःला कंटाळा आल्यावर आणि दुसरे म्हणजे, जेव्हा तुम्हाला असे वाटते की तुम्हाला लाथ मारली जाईल (जेव्हा तुम्हाला कळेल की तुम्हाला संघातून वगळण्यात येईल) तेव्हा निवृत्ती घ्यावी.”
मोहम्मद शमी पुढे म्हणाला, “पण पहिली आणि सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे जेव्हा तुम्ही खेळाचा आनंद घेणे थांबवता, तेव्हा तुमचीवेळ आल्याचे लक्षण आहे. निवृत्तीसाठी सर्वोत्तम वेळ निवडल्यास ते अधिक चांगले होईल. कारण तुम्ही विशिष्ट स्वरूप राखू शकत नसल्यास तुमचे शरीर तुम्हाला संकेत देण्यास सुरुवात करते. हीच वेळ आहे जेव्हा खेळाडूने त्याच्या निवृत्तीची वेळ मानली पाहिजे.”
एमएस धोनी भारताचा सर्वात यशस्वी कर्णधार –
एमएस धोनी असला कर्णधार आहे, ज्याने टीम इंडियासाठी सर्वात जास्त आयसीसी ट्रॉफी जिंकल्या आहेत. धोनीच्या नेतृत्वाखाली टीम इंडियाने २००७ टी-२० विश्वचषक, २०११ एकदिवसीय विश्वचषक आणि २०१३ चॅम्पियन्स ट्रॉफी जिंकली आहे.