भारतीय गोलंदाजाऐवढा वेग नसतानाही जेम्स अँडरसन आपल्या कौशल्याच्या बळवार फलंदाजाना चकवण्यात यशस्वी होतो. अँडरसनचे हे कौशल्य पाहून भारताचा मोहम्मद शामी थक्क झाला आहे. मंगळवारी मोहम्मद शामी प्रसार माध्यमांशी बोलत होता. अँडरसन सर्वाधिक बळी घेण्याच्या विक्रमाच्या जवळ आहे. यासाठी त्याला फक्त सात विकेटची गरज आहे. अँडरसनने सात बळी घेतल्यास ग्लेन मॅग्राथचा(५६३) विक्रम मोडीत निघेल. शामीने अँडरसनला या ऐतिहासिक विक्रमांपूर्वी शुभेच्छा दिल्या आहेत.

प्रसारमाध्यमांशी बोलताना शामीने अँडरसनवर कौतुकांचा वर्षावर केला. ‘अँडरसनकडून मी खूप काही शिकलो. अँडरसनची गोलंदाजी पाहून मी नेहमी शिकण्याचा प्रयत्न करत असतो. भारतीय गोलंदाजांपेक्षा अँडरसनची गती कमी आहे. तरीही तो फलंदाजांना चकवण्यात यशस्वी होते. त्याचे हे कौशल्य शिकण्यासारखे आहे. सामन्याची स्थिती पाहून आपल्या गोलंदाजीमध्ये बदल कसा करावा हे अँडरसनकडून शिकण्यासारखे आहे’ असे शामी म्हणाला.

प्रत्येक खेळाडू आपल्या घरगुती वातावरणाचा फायदा घेतो. अँडरसननेही आपल्या गोलंदाजीने सर्वांची मने जिंकली आहेत. आम्ही त्याच्याकडून खूप काही शिकलो आहे. त्याची गोलंदाजी करण्याची शैली वेगळी आहे. मागील दौऱ्यामध्येही अँडरसनने आपली छाप पाडली होती. आतापर्यंत अँडरसनने केलेल्या कामगिरीने सर्वांची मने जिंकली आहेत. भारतीय गोलंदाजांनी या दौऱ्यामध्ये चांगली कामगिरी केली आहे. ४६ विकेटमधील वेगवान गोलदांजांनी ३८ विकेट घेतल्यात.

३० ऑगस्ट पासून भारत आणि इंग्लंड यांच्यामध्ये चौथ्या कसोटी सामन्याला सुरूवात होत आहे. पाच कसोटी सामन्यात भारतीय संघ २-१ ने पिछाडीवर आहे. चौथा कसोटी सामना जिंकून भारत मालिकेत बरोबरी करण्याच्या इराद्याने भारत मैदानावर उतरणार आहे. भारतीय संघात पुन्हा बदल होण्याची शक्याता वर्तवण्यात येत आहे. के. एल राहुल ऐवजी पृथ्वी शॉ याला संधी मिळण्याची शक्यता आहे.

Story img Loader