Mohammed Shami Set to Make Ranji Trophy Comeback: भारतीय संघ २२ नोव्हेंबरपासून ऑस्ट्रेलियाविरुद्ध बॉर्डर-गावस्कर ट्रॉफीचे सामने खेळवले जाणार आहेत. बीसीसीआयने कसोटी मालिकेसाठी भारती. संघ आधीच जाहीर केला आहे. तंदुरुस्त नसल्यामुळे मोहम्मद शमीला यावेळी संघात स्थान मिळाले नव्हते. पण आता भारतीय संघासाठी एक आनंदाची बातमी आली आहे. भारताचा स्टार गोलंदाज पुन्हा एकदा मैदानावर पुनरागमन करण्यासाठी सज्ज झाला आहे.

मोहम्मद शमी फिट झाल्यानंतर आता रणजी ट्रॉफीचे सामने खेळणार आहे. रणजी ट्रॉफीत जर शमी चांगली कामगिरी करू शकला तर कदाचित बॉर्डर गावस्कर ट्रॉफीच्या दुसऱ्या सामन्यासाठी त्याचा संघात समावेश केला जाऊ शकतो. भारत-ऑस्ट्रेलियातील दुसरा सामना ६ डिसेंबरला खेळवला जाणार आहे. मोहम्मद शमी रणजी सामना कधी खेळणार आहे, जाणून घेऊया.

Jasprit Bumrah and Tabraiz Shamsi have similar T20I stats
Jasprit Bumrah : तबरेझ शम्सीच्या पोस्टने क्रिकेट विश्वाला दिला आश्चर्याचा धक्का! जसप्रीत बुमराहबरोबर घडला असा योगायोग की विश्वासच बसणार नाही
Nana Patole On Devendra Fadnavis :
Nana Patole : निकालाआधी राजकीय घडामोडींना वेग; यातच…
Mohammed Shami Accused of Age Fraud With Viral photos of Driving License Ahead Of Border Gavaskar Trophy IND vs AUS
Mohammed Shami Age Fraud: मोहम्मद शमीनं खरं वय लपवलं? फसवणूक केल्याचे जाहीर आरोप; BCCI कडे केली तपासाची मागणी!
Deputy Commissioner Bhagyashree Navtake refusal to investigate multi-state credit union scam
बहुराज्यीय पतसंस्था घोटाळ्याच्या चौकशीला उपायुक्त नवटके यांच्याकडून सुरुवातीला नकार
yogi Adityanath batenge to katenge
‘बटेंगे तो कटेंगे’, ‘एक हैं तो सेफ हैं’, योगी आदित्यनाथ यांची घोषणा
Sanju Samson broke Yusuf Pathan's 15-year-old record
IND vs SA : संजू सॅमसनने सलग दोन शतकांनंतर केला नकोसा विक्रम, ‘या’ बाबतीत युसूफ-रोहितला टाकले मागे
Sanju Samson's wife reacts to hundred vs Proteas: My forever favourite hero
Sanju Samson : ‘तेरा ध्यान किधर है, तेरा हीरो…’, संजू सॅमसनच्या शतकी खेळीनंतर पत्नी चारुलताच्या इन्स्टा स्टोरीने वेधलं लक्ष

हेही वाचा – Prithvi Shaw: पृथ्वी शॉचा वाढदिवसाच्या पार्टीत ‘तांबडी चामडी’ गाण्यावर भन्नाट डान्स, सोशल मीडियावर होतोय ट्रोल, VIDEO व्हायरल

मोहम्मद शमीचा रणजी ट्रॉफीसाठी बंगाल संघात समावेश करण्यात आला आहे. बंगालचा सामना मध्य प्रदेश विरुद्ध होणार आहे, हा सामना १३ नोव्हेंबरपासून (बुधवार) इंदूरमध्ये सुरू होत आहे. शमी बंगालच्या संघात सामील झाल्याने त्यांचे गोलंदाजी आक्रमण अधिक मजबूत होणार आहे. शमी जवळपास वर्षभराने पुन्हा एकदा स्पर्धात्मक क्रिकेटमध्ये पुनरागमन करणार आहे.

हेही वाचा – IND vs SA: “आता उभा राहून मजा बघ…”, हार्दिक पंड्याला मोठेपणा करणं पडलं भारी, अर्शदीपला बोललेल्या वाक्यानंतर होतोय ट्रोल

मोहम्मद शमी दुखापतीमुळे २०२३ च्या एकदिवसीय विश्वचषकापासून मैदानाबाहेर आहे. २०२३ मध्ये त्याने ऑस्ट्रेलियाविरुद्ध टीम इंडियासाठी शेवटचा आंतरराष्ट्रीय सामना खेळला होता. शमीने २०२३ च्या एकदिवसीय विश्वचषक स्पर्धेत भारतासाठी अविश्वसनीय कामगिरी केली होती. शमीने उपांत्य फेरीच्या सामन्यात ७ विकेट्स घेत उत्कृष्ट कामगिरी केली होती. या वनडे वर्ल्डकपमध्ये शमीने २४ विकेट्स मिळवले होते.

मोहम्मद शमीची गणना भारताच्या सर्वोत्तम गोलंदाजांमध्ये केली जाते. त्याने टीम इंडियासाठी अनेक सामने स्वबळावर जिंकले आहेत. २०२१ मध्ये पर्थमध्ये झालेल्या बॉर्डर गावस्कर सामन्यात शमीने सर्वाधिक ६ विकेट्स घेतले होते. त्यामुळे यंदाच्या पर्थमध्ये होणाऱ्या भारत ऑस्ट्रेलियामधील पहिल्याच सामन्यात त्याची उणीव भासणार आहे.

हेही वाचा – IND vs SA: भारत-दक्षिण आफ्रिका तिसरा टी-२० सामना दुसऱ्या सामन्यापेक्षा उशिराने सुरू होणार, जाणून घ्या काय आहे नेमकी वेळ?

आतापर्यंत, टीम इंडियासाठी, मोहम्मद शमीने ६४ कसोटी सामन्यात २२९ विकेट्स, १०१ कसोटी सामन्यात १९५ विकेट्स आणि २३ टी-२० आंतरराष्ट्रीय सामन्यात २४ विकेट्स घेतले आहेत.