Mohammed Shami warns Australian Team:दिल्लीतील अरुण जेटली स्टेडियमवर भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील दुसऱ्या कसोटी सामन्याच्या पहिल्या दिवशी मोहम्मद शमीच्या घातक गोलंदाजीमुळे ऑस्ट्रेलियन संघ २६३ धावांत आटोपला. शमीने ६० धावांत एकूण ४ बळी घेतले आणि भारतासाठी पहिल्या डावात सर्वाधिक बळी घेणारा गोलंदाज ठरला. दिल्लीच्या फिरकी ट्रॅकवर शमीची कामगिरी कौतुकास पात्र आहे. सामन्यानंतर त्याने आपल्या अप्रतिम कामगिरीबद्दल सांगितले की, टीम इंडिया नाणेफेकवर अवलंबून नाही. तो म्हणाला की, भारतीय संघाने प्रत्येक वेळी विरोधी संघाला ऑलआऊट केले आहे, वेगवान गोलंदाजांनी तसे केले नाही तर फिरकीपटू ते करतील.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

सामन्यानंतरच्या पत्रकार परिषदेत मोहम्मद शमी म्हणाला, “एक संघ म्हणून आम्ही नाणेफेकीवर अवलंबून नाही. आम्हाला त्याची अजिबात चिंता नाही. नाणेफेकीत काय होते याने काही फरक पडत नाही. आम्हाला जे काही प्रथम मिळते ते आम्ही सादर करण्याचा प्रयत्न करतो. आपण त्या चौकटीत राहतो.” तो पुढे म्हणाला, “पहिलेही ऑल आउट झाले आहे. आधीही केले.. भविष्यातही करणार. भारताला ऑलआऊट करावे लागेल, जर आम्ही ते केले नाही तर फिरकीपटू ते करतील.”

हेही वाचा: IND vs AUS: live मॅचमध्ये अचानक चाहता घुसला अन् मोहम्मद शमीच्या ‘त्या’ एका कृतीने सगळ्यांचे मन जिंकले, Video व्हायरल

डावाच्या सुरुवातीला, शमीने चांगल्या लांबीच्या प्रदेशाला लक्ष्य केले ज्यामुळे त्याला डेव्हिड वॉर्नरला बाद करण्यात मदत झाली. डावाच्या अखेरीस, शमीने रिव्हर्स बॉलिंगने टेल-एंडर नॅथन लियॉन आणि नवोदित मॅथ्यू कुहनेमन यांची विकेट घेतली. शमी म्हणाला, “तुम्हाला भारतातील खेळपट्टीमध्ये फारसा फरक दिसणार नाही. जर तुम्हाला नवीन चेंडूची मदत मिळू शकते, तर तुम्ही जुन्या चेंडूवरही उलटू शकता. एक वेगवान गोलंदाज म्हणून, भारतीय परिस्थितीमध्ये मुख्य गोष्ट म्हणजे तुम्ही कोणत्या क्षेत्रात गोलंदाजी करता आणि तुम्हाला तुमचा वेग कायम राखावा लागतो.” तो पुढे म्हणाला, “सकाळच्या सत्रात ऑस्ट्रेलियाने धावा केल्या असल्या तरी येथील खेळपट्टी नागपूरपेक्षा फारशी वेगळी नाही. पण मी योग्य लाईन आणि लेन्थमध्ये गोलंदाजी करण्याचा प्रयत्न केला.”

हेही वाचा: IND vs AUS 2nd Test: ऑस्ट्रेलियाला मोठा धक्का! दिल्ली कसोटीतून डेव्हिड वॉर्नर बाहेर, सिराजचा चेंडू डोक्याला लागला, ‘या’ खेळाडूची एंट्री

नॅथन लायनची जबरदस्त गोलंदाजी

दुसऱ्या दिवसाचा खेळ सुरू झाला आहे. भारताचा कर्णधार रोहित शर्मा आणि उपकर्णधार लोकेश राहुल खेळपट्टीवर होते. दोघांनाही आज मोठी खेळी खेळायची आहे आणि टीम इंडियाला चांगल्या स्थितीत आणण्याचा प्रयत्न करायचा होता. मात्र बिनबाद ३३ वरून पुढे खेळताना पहिल्या सत्रातच ऑस्ट्रेलिया फिरकीपटू नॅथन लायनने जबरदस्त गोलंदाजी केली. तब्बल ४ विकेट्स घेत त्याने टीम इंडियाच्या फलंदाजीचे कंबरडे मोडले. केएल राहुल, रोहित शर्मा, १००वी कसोटी खेळणारा चेतेश्वर पुजारा आणि दुखापतीनंतर संघात पुनरागमन करणारा श्रेयस अय्यर हे बाद झाले असून आता संघाची मदार ही स्टार फलंदाज विराट कोहली आणि अष्टपैलू रवींद्र जडेजावर असणार आहे.

मराठीतील सर्व क्रीडा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Mohammed shami warns australia india me to all out hona hi hoga ham nahi karnege to spinner karnege avw