Mohammed Siraj Highest Bowling Speed: भारताचा वेगवान गोलंदाज मोहम्मद सिराज आपल्या वेगवान गोलंदाजीने ऑस्ट्रेलियात भेदक गोलंदाजी करत आहे. दुसऱ्या कसोटीत त्याला अद्याप एकही विकेट मिळाली नाही, पण तो भेदक गोलंदाजी करत फलंदाजांना धावा काढण्यासाठी कष्ट घ्यायला भाग पाडत आहे. सिराज वेगवान गोलंदाजी करत असला तरी ॲडलेड कसोटीत दाखवलेल्या त्याच्या चेंडूच्या वेगाने सर्वांनाच आश्चर्याचा धक्का बसला. ॲडलेड कसोटीत सिराजने खरंच १८१.६ किमी प्रति तास वेगाने खरंच चेंडू टाकला का, जाणून घेऊया यामागचं सत्य…
गुलाबी चेंडूच्या कसोटीच्या पहिल्या दिवसाचा खेळ संपेपर्यंत नऑस्ट्रेलियाने १ बाद ८६ धावा केल्या. तर जसप्रीत बुमराहला एक विकेट मिळाली होती. यासह भारताकडे ९९ धावांची आघाडी होती. दुसऱ्या दिवसाच्या पहिल्या सत्रात जसप्रीत बुमराहने भारताला दोन महत्त्वाचे विकेट मिळवून दिले. नाथन मॅकस्विनी आणि स्टीव्ह स्मिथ यांना बुमराहने झेलबाद केले.
मोहम्मद सिराजने टाकला जगातील सर्वात वेगवान चेंडू?
२५व्या षटकात मोहम्मद सिराजला चेंडू देण्यात आला. त्याने पूर्ण षटक टाकले. शेवटच्या चेंडूच्या दरम्यान पडद्यावर त्याच्या चेंडूचा वेग दाखवला ते पाहून सर्वांनाच धक्का बसला. स्क्रीनवर दिलेल्या माहितीनुसार, सिराजने या षटकातील शेवटचा चेंडू ताशी १८१ किमी वेगाने टाकला. क्रिकेटमध्ये आजपर्यंत कोणीही इतक्या वेगाने चेंडू टाकलेला नाही.
हेही वाचा – VIDEO: लबुशेनच्या ‘त्या’ कृतीमुळे मोहम्मद सिराज संतापला, थेट चेंडूच मारला फेकून; मैदानात नेमकं काय घडलं?
क्रिकेटमध्ये सर्वात वेगवान चेंडू टाकण्याचा विश्वविक्रम पाकिस्तानच्या शोएब अख्तरच्या नावावर आहे. त्याने २००३ च्या विश्वचषकात इंग्लंडविरुद्ध १६१.३ किमी प्रतितास वेगाने चेंडू टाकला होता. पण सिराजने टाकलेल्या चेंडूचा वेग हा कितीतरी पटीने अधिक होता. सिराजने ताशी १८१ किमी वेगाने चेंडू टाकला नाही. स्पीड मीटर किंवा ब्रॉडकास्टद्वारे ही चूक झाली. या कारणास्तव कोणत्याही प्रकारच्या विश्वविक्रमाची चर्चा झाली नाही.