Mohammed Siraj Travis Head Punishment After Fight: भारत वि ऑस्ट्रेलिया अॅडलेड कसोटीत मोहम्मद सिराज आणि ट्रॅव्हिस हेड यांच्यातील वाद चर्चेचा विषय ठरला होता. भर मैदानात झालेल्या या वादावर चाहते, माजी क्रिकेटपटू, संघाचे कर्णधार यांनी मत मांडली. सिराज आणि हेडने देखील आपपल्या बाजूने मैदानात काय घडलं, याबाबत सांगितलं. पण तिसरा कसोटी सामना संपल्यानंतर दुसऱ्या दिवशी आयसीसीने या दोन्ही खेळाडूंना शिक्षा दिली. पण हेडपेक्षा जास्त शिक्षा मोहम्मद सिराजला देण्यात आली आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेने (ICC) मोहम्मद सिराज आणि ट्रॅव्हिस हेड यांना सोमवारी, ९ डिसेंबरला ॲडलेड येथे बॉर्डर-गावस्कर ट्रॉफीच्या दुसऱ्या कसोटी सामन्यात मैदानावर वाद घातल्याबद्दल कठोर शिक्षा सुनावली. सिराजला त्याच्या मॅच फीच्या २०टक्के दंड ठोठावण्यात आला होता तर हेड मात्र या दंडातून बचावला, परंतु भारतीय वेगवान गोलंदाजाशी झालेल्या वादामुळे त्याला एका डिमेरिट पॉइंट मिळाला आहे. २० टक्के दंडाबरोबर मोहम्मद सिराजच्या खात्यातही एक डिमेरिट गुण जोडला गेला आहे.

हेही वाचा – सॅम करनचा भाऊ इंग्लंड नव्हे तर ‘या’ देशाकडून खेळणार क्रिकेट, वनडे मालिकेसाठी संघात निवड

शिस्तभंगाच्या सुनावणीनंतर, सिराज आणि हेड यांना आयसीसीच्या आचारसंहितेचा भंग केल्याबद्दल शिक्षा देण्यात आली. आयसीसीने एका निवेदनात म्हटले आहे की, “सिराजला खेळाडू आणि सपोर्ट स्टाफसाठीच्या आयसीसी आचारसंहितेच्या नियम २.५ चे उल्लंघन केल्याबद्दल दोषी आढळल्यानंतर मॅच फीच्या २० टक्के दंड ठोठावण्यात आला आहे.” सिराजला मॅच फी चा दंड झालेली वरील नियम ‘फलंदाजाचा अपमान करणारी भाषा, कृती किंवा हावभाव करणे किंवा फलंदाज बाद झाल्यावर त्यांना आक्रमक प्रतिक्रियेसाठी उकसवणे’ याच्याशी संबंधित आहे.

हेही वाचा – VIDEO: सिराज आणि हेडमध्ये नेमकं काय बोलणं झालं? सिराजने भांडण मिटवलं का? त्यावर हेड काय म्हणाला?

आचारसंहिता २.१३ चा भंग केल्याबद्दल हेडला दंड

आयसीसीने म्हटले की, खेळाडू आणि सपोर्ट कर्मचाऱ्यांसाठी आयसीसीच्या आचारसंहितेच्या नियम २.१३ चे उल्लंघन केल्याबद्दल हेडलाही ‘दंड’ ठोठावण्यात आला आहे. तर ‘आंतरराष्ट्रीय सामन्यादरम्यान खेळाडू, सपोर्ट स्टाफ, पंच किंवा सामनाधिकारी यांच्याशी गैरवर्तन’ या नियमांचे उल्लंघन न केल्यामुळे तो मॅच फिच्या दंडापासून बचावला.

हेही वाचा – IND vs AUS: “मर्यादा ओलांडायला नको…”, रोहित शर्माने सिराज-हेडच्या वादात भारतीय गोलंदाजाची घेतली बाजू, सामन्यानंतर केलं मोठं वक्तव्य

सिराज आणि हेडच्या शिस्तभंगाच्या रेकॉर्डमध्ये प्रत्येकी एक डिमेरिट पॉइंट जोडला गेला आहे, गेल्या २४ महिन्यांतील त्यांचा पहिला गुन्हा आहे. “दोघांनीही त्यांचे गुन्हे कबूल केले आणि सामनाधिकारी रंजन मदुगले यांनी प्रस्तावित केलेल्या निर्बंधांना मान्यता दिली,” असे आयसीसीने म्हटले आहे. ऑस्ट्रेलियाने दुसऱ्या कसोटीत १० गडी राखून मिळवलेल्या विजयादरम्यान दुसऱ्या दिवशी हेड आणि सिराज यांच्यात वाद झाला होता. सिराजच्या गोलंदाजीवर बाद होण्यापूर्वी हेडने १४१ चेंडूत १४० धावांची शानदार खेळी खेळली होती.

मराठीतील सर्व क्रीडा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Mohammed siraj got a heavier penalty than travis head after adelaide controversy what is the reason ind vs aus bdg