IND vs AUS 3rd Test Updates in Marathi: भारत-ऑस्ट्रेलिया यांच्यातील गाबा कसोटीत ऑस्ट्रेलियाने प्रथम फलंदाजी करताना दुसऱ्या दिवशी लंच ब्रेकपर्यंत ३ बाद १०४ धावा केल्या आहेत. यादरम्यान लबुशेन आणि सिराज यांच्यात मजेशीर घटना पाहायला मिळाली. दुसऱ्या दिवसाच्या खेळात मैदानावर मोहम्मद सिराज आणि मार्नस लबुशेन यांच्यात बेल्स बदलतानाची घटना पाहायला मिळाली, ज्याचा व्हीडिओ व्हायरल होत आहे.

गाबा कसोटीच्या पहिल्या दिवशी पावसाचा व्यत्यय आल्याने १३.२ षटकांचा सामना होऊ शकला आणि अखेरीस सततच्या पावसाने खेळ रद्द करण्यात आला. दुसऱ्या दिवसाचा खेळ सुरू होताच टीम इंडियाने ऑस्ट्रेलियाच्या दोन्ही सलामीवीरांना झटपट पॅव्हेलियनमध्ये पाठवले. त्यानंतर मार्नस लबुशेन आणि स्टीव्ह स्मिथ यांनी ऑस्ट्रेलियाचा डाव सांभाळण्याचा प्रयत्न केला. दरम्यान, सिराज जेव्हा गोलंदाजी करत होता तेव्हा लबुशेनबरोबर बेल बदलण्याची घटना सुरू होती.

Jasprit Bumrah Moment in BBL as Mark Waugh Points out Lockie Ferguson Unconventional Delivery Like Indian Pacer Video
VIDEO: यत्र तत्र बुमराह; लॉकी फर्ग्युसनलाही आवरला नाही जसप्रीत बुमराहची अ‍ॅक्शन कॉपी करण्याचा मोह
bjp ravindra chavan
Ravindra Chavan : ‘उपरा’ डोंबिवलीकर ते भाजप प्रदेश…
Loksatta anvyarth Gautam Gambhir India lose in Test series
अन्वयार्थ: खरेच ‘गंभीर’ आहोत?
IND vs AUS Virat Kohli shows empty Pockets to Aussie Fans Reminding them of Sandpaper Scandal video viral
IND vs AUS : ‘माझा खिसा रिकामा…’, विराटशी पंगा घेणे ऑस्ट्रेलियन चाहत्यांना पडले महागात, सँडपेपर प्रकरणाची करून दिली आठवण
Jasprit Bumrah Faces Shocking Accusation of Using Sandpaper During Sydeney Test by Australian Fans Video
IND vs AUS: जसप्रीत बुमराहवर बूटमध्ये सँडपेपर लपवल्याचा ऑस्ट्रेलियन चाहत्यांचा आरोप; व्हायरल VIDEO मुळे सोशल मीडियावर चर्चांना उधाण
Sachin Tendulkar Praised Rishabh Pant Fiery Inning in Sydney Test Said He has rattled Australia from ball one
IND vs AUS: सचिन तेंडुलकरही ऋषभ पंतची वादळी खेळी पाहून भारावला, कसोटीत टी-२० स्टाईल पाहून म्हणाला; “त्याने ऑस्ट्रेलियाला…”
IND vs AUS Yashasvi Jaiswal Video Viral
IND vs AUS : यशस्वी जैस्वालची कसोटीत टी-२० शैलीत फटकेबाजी! मिचेल स्टार्कला फोडला घाम, VIDEO व्हायरल
BBL 2025 Daniel Sams and Cameron Bancroft clashing Video
BBL 2025 : मैदानातच भीषण अपघात! कॅच घेण्याच्या नादात दोन खेळाडूंमध्ये जोरदार धडक, एकाच फुटलं नाक, VIDEO व्हायरल

हेही वाचा – IND vs AUS: विराटने ‘नैनोंं में सपना’ गाण्यावर डान्स करत हरभजनची घेतली फिरकी, अचानक डान्स का करू लागला कोहली? पाहा VIDEO

ऑस्ट्रेलियन डावाच्या ३३व्या षटकात मोहम्मद सिराज गोलंदाजी करत असताना दुसऱ्या चेंडूवर तो थेट स्ट्राईक एंडच्या दिशेने गेला आणि लबुशेन त्याला काहीतरी बोलला. सिराजने काहीच न बोलता जाऊन त्याच्यामागील विकेटवरील बेल्सची अदलाबदली केली. तर सिराजने बेल्स बदलून गेल्यानंतर लबुशेनने पुन्हा त्या बेल्सची अदलाबदली केली. हा प्रकार सर्वच जण पाहत राहिले. या घटनेचा व्हीडिओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे. पण आता सिराजच्या या युक्तीचा टीम इंडियाला फायदा झाल्याचेही दिसत आहे.

हेही वाचा – IND vs AUS: ऋषभ पंतने गाबा कसोटीत घडवला इतिहास, १५० चा आकडा पार करत धोनी-द्रविडच्या मांदियाळीत मिळवलं स्थान

बेल बदलण्याच्या घटनेनंतर पुढच्याच षटकात नितीश रेड्डी फलंदाजीला आला. लबुशेन आणि स्मिथ चांगल्या लयीत दिसत होते आणि दोघेही चांगली भागीदारी रचत होते. त्यामुळे ही भागीदारी तोडणं भारतासाठी खूप महत्त्वाचं होतं. पुढच्याच षटकात नितीश रेड्डीने हे काम केलं. नितीश रेड्डीच्या चेंडूवर मार्नस लबुशेन पॅव्हेलियनमध्ये परतला. ऑफ स्टंपच्या बाहेर जाणारा चेंडू ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न केला. पण बाऊन्समुळे चेंडूने बॅटची कड घेतली आणि चेंडू थेट स्लिपमध्ये उभ्या असलेल्या विराट कोहलीच्या हातात गेला. अशारितीने सिराजच्या या युक्तीचा टीम इंडियाला फायदा होत तिसरी महत्त्वाची विकेट मिळाली.

हेही वाचा – Mohammed Shami: शमीला ऑस्ट्रेलिया नाही हैदराबादचं मिळालं तिकीट, गाबा कसोटीदरम्यान आली मोठी अपडेट

सध्या लंच ब्रेकनंतर स्टीव्ह स्मिथ आणि ट्रॅव्हिस हेडची जोडी ऑस्ट्रेलियाचा पुढे नेत चांगली फटकेबाजी करत आहे. भारताला जर ऑस्ट्रेलियाला कमी धावसंख्येवर रोखायचे असेल तर या दोन्ही खेळाडूंची भागीदारी तोडणं खूप महत्त्वाचं असणार आहे.

Story img Loader