Mohammed Siraj Statement on Travis Head Fight: भारत-ऑस्ट्रेलिया दुसऱ्या कसोटीत मोहम्मद सिराज आणि ट्रॅव्हिस हेड यांच्यातील वादाने सर्वांचं लक्ष वेधून घेतलं. गुलाबी चेंडूच्या कसोटीच्या दुसऱ्या दिवशी ट्रॅव्हिस हेड आणि मोहम्मद सिराज यांच्यात भर मैदानातच वादावादी झाली. हेड शतक झळकावत खोऱ्याने धावा करत होता, ज्यामुळे भारतासाठी तो डोकेदुखी ठरला होता. सिराजने त्याला क्लीन बोल्ड करत त्याला माघारी पाठवले. बाद झाल्यानंतर हेड आणि सिराजमध्ये वाद झाला होता.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

हेड बाद झाल्यानंतर सिराजबरोबर जोरदार वादावादी झाली. त्याने हेडला ड्रेसिंग रूमच्या दिशेने जाण्याचा इशारा केला. ऑस्ट्रेलियन फलंदाज ट्रॅव्हिस हेडने सांगितले की, भारताचा वेगवान गोलंदाज मोहम्मद सिराजने ज्यापद्धतीने माझ्या बोलण्याचा अनर्थ काढत प्रतिक्रिया दिली ते पाहून मी निराश झाला आहे.

हेही वाचा – Travis Head on Siraj Fight: “मी म्हणालो चांगला चेंडू होता पण त्याने…”, सिराज आणि हेडमध्ये नेमका कशावरून झाला वाद? ट्रॅव्हिस हेडने सामन्यानंतर सांगितलं

ट्रॅव्हिस हेड दुसऱ्या दिवसाचा खेळ संपल्यानंतर बोलताना म्हणाला, “मी त्याला म्हणालो चांगला बॉल होता पण त्याने याचा काहीतरी वेगळाच अर्थ घेतला… जेव्हा त्याने अशी प्रतिक्रिया दिली ते पाहून मी सुद्धा प्रत्युत्तर दिलं.” हेड पुढे म्हणाला, “माझ्या बोलण्याचा अनर्थ घेत त्याने ज्याप्रकारे प्रतिक्रिया दिली ते पाहून मी थोडा निराश झालो. आता जे आहे ते आहे. जर त्यांना असंच वागायचं असेल आणि स्वत:ला जगासमोर असंच दाखवायचं आहे. तर ठिके तसंच वागा.”

हेही वाचा – NZ vs ENG: न्यूझीलंडचा मोठा पराभव! टीम इंडियाला चीतपट करणाऱ्या किवींची घरच्या मैदानावर इंग्लंडसमोर शरणागती

मोहम्मद सिराजने हेडच्या या वक्तव्यावर प्रतिक्रिया दिला आणि म्हणाला की ऑस्ट्रेलियन फलंदाजाने सांगितलेला घटनाक्रम खोटा आहे. स्टार स्पोर्ट्सशी बोलताना सिराज म्हणाला, मी विकेटचं सेलिब्रेशन करत होतो आणि काहीच बोललो नाही. पण तो जे पत्रकार परिषदेत म्हणाला ते खोटं आहे. हेड म्हणाला की तो मैदानावर मला चांगला चेंडू टाकला, असं म्हणाला पण असं कुठेच दिसलं नाही की तो मला काहीतरी चांगलं म्हणाला आहे. आम्हीही प्रत्येकाचा मान ठेवतो, सन्मानाने वागतो. मी प्रत्येकाला मान देऊनच त्याच्याशी बोलतो कारण क्रिकेट हा जेंटलमॅन्सचा गेम आहे. पण त्याची पद्धत चुकीची होती आणि मला ती आवडली नाही. म्हणूनच मी बोललो.”

मोहम्मद सिराज दुसऱ्या डावात जेव्हा फलंदाजीला आला तेव्हा ऑस्ट्रेलियाच्या प्रेक्षकांनी त्याची हुर्याे उडवली. पहिला चेंडू खेळून झाल्यानंतर सिराज हेडजवळ गेला आणि दोघेही एकमेकांशी बोलताना दिसले, यावरून पुन्हा चर्चा सुरू झाल्या. बोलँडच्या गोलंदाजीवर ट्रॅव्हिस हेडने झेल टिपत मोहम्मद सिराजला बाद केलं.

मराठीतील सर्व क्रीडा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Mohammed siraj statement on travis head sendoff incident said its a lie that he said well bowled to me ind vs aus bdg