IND vs BAN 2nd Test Scorecard Mohammed Siraj Catch: बांगलादेशविरुद्धच्या कानपूर कसोटीत भारतीय खेळाडूंनी उत्कृष्ट क्षेत्ररक्षण केले आहे. भारतीय कर्णधार रोहित शर्माच्या शानदार झेल टिपून लिटन दासला बाद केले. यानंतर काही वेळाने मोहम्मद सिराजने आश्चर्यकारक झेल घेत शकीब अल हसनला पॅव्हेलियनचा रस्ता दाखवला. दुसऱ्या कसोटीच्या तिसऱ्या दिवशी सिराज आणि रोहितने दोन आश्चर्यकारक झेल घेत खळबळ उडवून दिली. सोशल मीडियावर दोन्ही कॅचचं भन्नाट कौतुक होत आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

अश्विनच्या चेंडूवर शकिब गडबडला

शकिब अल हसनच्या चेंडूवर मोहम्मद सिराजने जबरदस्त झेल तर टिपला पण यादरम्यान त्याने आपली लवचिकताही दाखवली. ५६व्या षटकाच्या शेवटच्या चेंडूवर मोहम्मदने शानदार झेल टिपला. अश्विनने शकीबला चकमा देण्यासाठी चेंडू टाकला, जो खेळण्यासाठी शकीब क्रीजवरून पुढे आला. मात्र, तो चेंडूचा नीट अंदाज घेऊ शकला नाही आणि एका हाताने हवेत शॉट खेळला. शकिबने मारलेला चेंडू हवेत खूरच उंच उडाला होता. उनही खूप होते त्यामुळे चेंडू टाईम करण आणि तो टिपणं खूप अवघड होतं पण सिराजने ते करून दाखवलं.

हेही वाचा – IND vs BAN: रोहित शर्माचा हवेत झेपावत एकहाती झेल; गिलने धरलं डोकं तर कोच झाले चकित, पाहा VIDEO

मिडऑफवर तैनात असलेल्या मोहम्मद सिराजने झेल घेण्यासाठी मागे धावत गेला. चेंडू त्याच्या मागे पडणार होता आणि सिराज तोवर तिथे पोहोचला नव्हता. याच अंदाज येताच सिराजने लवचिकता दाखवत पाठीमागे झुकत झेल घेतला. चेंडू पकडताच त्याचा तोल गेला आणि तो जमिनीवर पडला पण चेंडू त्याच्या हातातून पडला नाही.

सिराजच्या उत्कृष्ट झेलने भारताला अनुभवी शाकिब अल हसनची विकेट मिळाली. सिराजने अप्रतिम झेल घेतल्याने पॅव्हेलियनमध्ये जावे लागेल यावर साकिबचाही विश्वास बसत नव्हता. शाकिबने १७ चेंडूंत दोन चौकारांसह ९ धावा केल्या. मात्र, या झेलसाठी सिराजने मोठीजोखीम पत्करली होती. तो झेल घेण्यासाठी खूप वाकला होता, त्यामुळे त्याला पाठीला दुखापत झाली असती. याशिवाय तो ज्या पद्धतीने जमिनीवर आदळला त्यामुळे दुखापत होण्याची दाट शक्यता होती. किरकोळ दुखापतही वेगवान गोलंदाजांसाठी अडचणीची ठरते. पण सिराजने केलेल्या या यशस्वी प्रयत्नाचं सर्वांनीच कौतुक केलं.

हेही वाचा – IND vs BAN: ३०० पार… रवींद्र जडेजाने कसोटीमध्ये घडवला इतिहास, ही कामगिरी करणारा भारताचा पहिलाच फिरकी गोलंदाज

बांगलादेशचा संघ २३३ धावा करत सर्वबाद झाला. भारताकडून जसप्रीत बुमराहने ३ विकेट, तर सिराज, अश्विन आणि आकाशदीपने प्रत्येकी २-२ विकेट मिळवल्या तर रवींद्र जडेजाने १ विकेट घेतली. जडेजाने एक विकेट मिळवत कसोटी क्रिकेटमधील ३०० विकेट पूर्ण केल्या.