Mohammed Siraj – Travis Head Fight: ॲडलेड कसोटीत ऑस्ट्रेलिया आणि भारत यांच्यातील सामन्यादरम्यान वादावादी पाहायला मिळाली. गुलाबी चेंडूच्या या कसोटीत सिराज खूपच आक्रमकपणे खेळत होता. मार्नस लबुशेननंतर त्याचा ट्रॅव्हिस हेडशीही वाद झाला. यानंतर ऑस्ट्रेलियन चाहत्यांची त्याची मैदानात हुर्याे उडवली होती. माजी ऑस्ट्रेलियन खेळाडू आणि मीडिया देखील त्याच्यावर टीका करताना दिसले. आता सिराज-हेडच्या वादाचे प्रकरण आयसीसीपर्यंत पोहोचले असून ते दोन्ही खेळाडूंवर कारवाई करणार असल्याची बातमी समोर येत आहे.

द टेलिग्राफच्या वृत्तानुसार, आयसीसीने आता या प्रकरणाची दखल घेतली असून दोन्ही खेळाडूंना शिस्तभंगाच्या सुनावणीसाठी बोलावले आहे. यावेळी आयसीसी दोन्ही बाजूंचे म्हणणे ऐकून घेणार आहे. मात्र, दोन्ही खेळाडूंना कोणत्याही प्रकारच्या निलंबनाचा सामना करावा लागणार नसल्याचेही या वृत्तामध्ये म्हटले आहे. रिपोर्टनुसार, कॅमेऱ्यात कैद झालेल्या फुटेजसाठी आयसीसीच्या आचारसंहितेत फार मोठी शिक्षा नाही. ॲडलेडमध्ये गुलाबी चेंडू कसोटीच्या दुसऱ्या दिवशी सिराज आणि हेड यांच्यात शाब्दिक बाचाबाची झाली.

पाकिस्तान एअरलाइन्सच्या वादग्रस्त जाहिरातीची होणार चौकशी; नेमकं प्रकरण काय? (फोटो सौजन्य X/@Official_PIA)
Pakistan Airlines : पाकिस्तान एअरलाइन्सच्या वादग्रस्त जाहिरातीची होणार चौकशी; नेमकं प्रकरण काय?
Pushpak train accident of karnataka express play horn may save life of many passengers
Jalgaon Train Accident : कर्नाटक एक्स्प्रेसच्या चालकाने भोंगा वाजवला…
Saif Ali Khan And Arvind Kejriwal
Saif Ali Khan : “गुजरातच्या तुरुंगात बसलेला गुंड…” सैफ अली खानवरील हल्ल्यानंतर लॉरेन्स बिश्नोईचे नाव घेत केजरीवालांकडून भाजपा लक्ष्य
ROHIT Pawar
सैफ अली खानवर झालेल्या हल्ल्यानंतर रोहित पवारांची प्रतिक्रिया, म्हणाले, “प्रसिद्ध अभिनेत्याचं घर सुरक्षित नसेल तर…”
Suresh Dhas On Dhananjay Munde
Maharashtra News Updates : धनंजय मुंडेंच्या राजीनाम्याबाबत सुरेश धस यांचं मोठं विधान; म्हणाले, “राजीनामा घेणं…”
Supriya Sule and Saif Ali Khan
Attack on Saif Ali Khan : सैफ अली खानवर चाकू हल्ला, खासदार सुप्रिया सुळे यांनी दिली महत्त्वाची अपडेट, म्हणाल्या…
centre appointed alok aradhe as chief justice of bombay high court
मुंबई उच्च न्यायालयाच्या मुख्य न्यायमूर्तीपदी आलोक आराधे; देवेंद्र कुमार यांची दिल्ली उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायमूर्ती म्हणून बदली
possibility of Eknath Shinde and Ganesh Naik coming together in municipal elections is less
महायुतीच्या संकेतांना नवी मुंबईत खोडा? महापालिका निवडणुकीत शिंदे- नाईक मनोमिलनाची शक्यता धुसरच

हेही वाचा – VIDEO: सिराज आणि हेडमध्ये नेमकं काय बोलणं झालं? सिराजने भांडण मिटवलं का? त्यावर हेड काय म्हणाला?

हेड शतक झळकावून भारताविरूद्ध १४० धावा करत खेळत होता, त्यानंतर सिराजने त्याला यॉर्करवर क्लीन बोल्ड केले आणि पॅव्हेलियनचा रस्ता दाखवला. यानंतर दोघेही एकमेकांना भिडताना दिसले. हेड आऊट झाल्यावर काहीतरी बोलला, त्यावर सिराजने प्रतिक्रिया दिली आणि ड्रेसिंग रूमकडे बोट दाखवत त्याला जाण्यासाठी सांगितले. सिराज आक्रमकपणे सेलिब्रेशन करतानाही दिसला. ॲडलेड हे हेडचे होम ग्राउंड आहे. या मैदानावर त्याच्याबरोबरचं असं वागण पाहून ऑस्ट्रेलियन चाहत्यांनी बाऊंड्री लाईनवर सिराजला चिडवायला सुरुवात केली.

हेही वाचा – IND vs AUS: “हॉटेलच्या रूममध्ये बसून…”, सुनील गावस्कर पराभवानंतर भारतीय संघावर संतापले, रागाच्या भरात नेमकं काय म्हणाले?

दुसऱ्या दिवसाचा खेळ संपल्यानंतर हेडने पत्रकार परिषदेत सिराजच्या चांगल्या गोलंदाजीचे कौतुक केल्याचा दावा केला होता. पण बदल्यात मला मिळालेली वागणूक चुकीची होती, मी निराश झालो आहे, असे तो म्हणाला. सिराजने त्याच्या वक्तव्याचे लगेच खंडन केले. हेडने आधी शिवीगाळ केल्याचा दावा त्याने केला. मात्र, खेळाच्या तिसऱ्या दिवशी दोन्ही खेळाडू हे प्रकरण मिटवताना दिसले. सिराजने फलंदाजी करताना हेडशी बोलून गैरसमज दूर करण्याचा प्रयत्न केला होता. यानंतर हा वाद संपल्याचे मानले जात आहे.

Story img Loader