MS Dhoni singing the Salaam e Ishq Meri Jaan song Video: भारताचा माजी कर्णधार एमएस धोनीने शुक्रवारी (७ जुलै) आपला ४२वा वाढदिवस साजरा केला. कॅप्टन कूल सोशल मीडियापासून दूर राहतो, मात्र सोशल मीडियावरुन चाहते आणि सहकारी खेळाडूंनी शुभेच्छांचा वर्षाव केला. टीम इंडियाचा क्रिकेटर मोहित शर्माने इन्स्टाग्रामवर एक व्हिडीए शेअर त्याला वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या आहे. हा व्हिडीओ चेन्नई सुपर किंग्जच्या ड्रेसिंग रूमचा आहे. यामध्ये धोनी बॉलिवूडचे प्रसिद्ध गाणे ‘सलाम-ए-इश्क मेरी जान’ गाताना दिसला.

व्हिडीओमध्ये महेंद्रसिंग धोनी मोनू सिंगसोबत दिसत आहे. तो मुकद्दर सिकंदर या चित्रपटातील ‘सलाम-ए-इश्क मेरी जान’ हे गाणे गातोय. सध्या आयपीएलमध्ये मोहित शर्मा हार्दिक पांड्याच्या गुजरात टायटन्सचा भाग आहे. त्याने आयपीएल २०२३ मध्ये चमकदार कामगिरी केली होती. तो काही वर्षांपूर्वी धोनीच्या चेन्नई सुपर किंग्ज संघाचाही तो भाग होता.

Paaru
Video: “मी तुझ्याशिवाय आता श्वासही…”, आदित्यने पारूसमोर दिली प्रेमाची कबुली? प्रोमोवर प्रसाद जवादेच्या पत्नीच्या कमेंटने वेधले लक्ष
ladki bahin yojana money recovery
अपात्र ‘लाडक्या बहिणी’ची रक्कम पुन्हा सरकारजमा
Virat Kohli Shouts At Mohammed Siraj who is Talking to Marnus Labuschagne Said Dont Talk To Them Laughingly Video
VIDEO: “यांच्याबरोबर हसत बोलू नकोस…”, लबूशेनबरोबर बोलताना पाहून विराट कोहली सिराजला ओरडला, मैदानात नेमकं काय घडलं?
Deepika Ranveer reveals daughter Dua face
Video: रणवीर सिंह-दीपिका पादुकोणने दाखवला लेकीचा चेहरा, खास ‘या’ लोकांसाठी ठेवली पार्टी
rahul vaidya says virat kohli blocked him on instagram
Video: “विराट कोहलीने मला ब्लॉक केलंय”, प्रसिद्ध मराठमोळ्या गायकाचा दावा; म्हणाला…
bigg boss marathi season 5 fame yogita Chavan lavani dance video viral
Video: “मला लागली कुणाची उचकी…”, योगिता चव्हाणची ठसकेबाज लावणी; नेटकऱ्यांकडून होतंय भरभरून कौतुक, म्हणाले…
Navri Mile Hitlarla
Video: “मेरी दिल की…”, एजे-लीलाचा रोमँटिक अंदाज; प्रोमो पाहताच नेटकऱ्यांच्या मजेशीर प्रतिक्रिया, म्हणाले, “आमच्या भावनांशी…”
elvish yadav reacts on video with hardik pandya ex wife Natasa Stankovic
हार्दिक पंड्याच्या वाढदिवशी नताशाबरोबरचा ‘तो’ व्हिडीओ जाणूनबुजून टाकला? एल्विश यादव म्हणाला, “मी त्यादिवशी…”

एमएस धोनीवर क्रिकेट विश्वातून शुभेच्छांचा वर्षाव –

हा व्हिडीओ शेअर करताना मोहित शर्माने कॅप्शनमध्ये लिहिले की, “आयुष्यभरासाठी शुभेच्छा”. यासोबत त्याने “हॅपी बर्थडे माही भाई” असे लिहिले आहे. त्यासोबत हार्ट इमोजीही शेअर केले आहे. भारताच्या अनेक माजी आणि सध्याच्या क्रिकेटपटूंनी शुक्रवारी महेंद्रसिंग धोनीला वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या. त्यात सचिन तेंडुलकर, वीरेंद्र सेहवाग आणि रविचंद्रन अश्विनसह इतर क्रिकेटपटूंचा समावेश होता. ऋषभ पंतने केक कापतानाचा एक फोटो शेअर केला होता.

धोनीने चेन्नईला ५व्यांदा चॅम्पियन बनवले –

महेंद्रसिंग धोनीच्या क्रिकेट कारकिर्दीबद्दल सांगायचे तर, ४२ वर्षीय धोनीने २०२० मध्ये आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती घेतली. तथापि, धोनी अजूनही सक्रिय क्रिकेटपटू आहे आणि तो आयपीएलमध्ये चेन्नई सुपर किंग्ज (CSK) चे नेतृत्व करतो. अलीकडेच फ्रँचायझीने त्याच्या नेतृत्वाखाली आयपीएल २०२३ चे विजेतेपद पटकावले. संघाने पाचव्यांदा आयपीएलचे विजेतेपद पटकावले.

हेही वाचा – Apex Council Meeting: बीसीसीआयने घेतले पाच मोठे निर्णय! देशांतर्गत टी-२० क्रिकेटमध्ये लागू होणार ‘हे’ नियम, अष्टपैलूंची कारकीर्द लागणार पणाला

इतका आहे धोनीचा नेटवर्थ

महेंद्रसिंग धोनीच्या संपत्तीबद्दल बोलायचं झालं, तर रिपोर्ट्सनुसार, धोनी १०४० कोटी रुपयांचा मालक आहे. यामध्ये क्रिकेटमधून मिळणाऱ्या आर्थिक उत्पन्नाशिवाय वेगवेगळ्या कंपन्यांचे ब्रांस एंडोर्समेंट, अनेक कंपन्यांसोबत केलेल्या करारातून मिळणारे उत्पन्न, अन्य व्यवसायातून मिळणाऱ्या कमाईचा समावेश आहे. क्रिकेट खेळण्यासोबतच अनेक स्पोर्टिंग आणि डायरेट्क-टू-कंज्यूमर बिजनेस फर्मकडून आर्थिक उत्पन्न मिळालं आहे.

Story img Loader