वेगवान गोलंदाज मोहम्मद इरफानने घेतलेल्या ४ विकेट्सच्या जोरावर पाकिस्तानने दुसऱ्या एकदिवसीय सामन्यात दक्षिण आफ्रिकेवर ६ विकेट्सनी मात केली. पावसामुळे प्रत्येकी ४४ षटकांच्या सामन्यात दक्षिण आफ्रिकेची प्रथम फलंदाजी करताना घसरगुंडी उडाली. दक्षिण आफ्रिकेतर्फे फरहाद बेहराडीनने सर्वाधिक ५८ धावा केल्या. या लक्ष्याचा पाठलाग करताना मिसबाह उल हकने नाबाद ५७ धावांची खेळी करत पाकिस्तानच्या विजयावर शिक्कामोर्तब केले. या विजयासह पाच सामन्यांच्या मालिकेत पाकिस्तानने १-१ अशी बरोबरी केली आहे. मोहम्मद इरफानला सामनावीर पुरस्काराने गौरवण्यात आले.

Story img Loader