Mohsin Naqvi PCB chairman set to replace Jay Shah as ACC President : भारतीय क्रिकेट नियामक मंडळाचे (बीसीसीआय) सचिव जय शहा यांची काही दिवसांपूर्वी आयसीसीच्या अध्यक्षपदी बिनविरोध निवड झाली आहे. ते आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेचे (आयसीसी) सर्वात तरुण अध्यक्ष ठरले आहेत. यानंतर आशियाई क्रिकेट परिषदेच्या (एसीसी) प्रमुखपदी त्यांच्या बदलीचे नावही पुढे येत आहे. आयसीसी अध्यक्षपदाची सूत्रे स्वीकारताच त्यांना बीसीसीआयच्या सचिवपदच नव्हे तर एसीसी अध्यक्षपदही सोडावी लागणार आहे. ज्यामुळे पीसीबीचे अध्यक्ष मोहसिन नक्वी यांना मोठी जबाबदारी मिळणार आहे.

मोहसिन नक्वी एसीसीचे नवे अध्यक्ष होण्याच्या शर्यतीत आघाडीवर –

पाकिस्तान क्रिकेट बोर्डाचे प्रमुख मोहसिन नक्वी हे एसीसीचे नवे अध्यक्ष होण्याच्या शर्यतीत आघाडीवर आहेत. पीटीआय या वृत्तसंस्थेने दिलेल्या वृत्तात दावा करण्यात आला आहे की नक्वी हे जय शाह यांच्या जागी एसीसीचे नवे प्रमुख म्हणून नियुक्ती होतील. या वर्षाच्या अखेरीस या निर्णयाची अधिकृत घोषणा केली जाईल. “या वर्षाच्या अखेरीस जेव्हा एसीसीची बैठक होईल, तेव्हा नक्वी दोन वर्षांच्या कालावधीसाठी पुढील अध्यक्ष असतील याची पुष्टी केली जाईल,” असे पीटीआयच्या सूत्राने सांगितले. जय शहा पद सोडल्यानंतर पीसीबी प्रमुख पदभार स्वीकारतील.

Shreyas Iyer to captain Mumbai Team in Syed Mushtaq Ali Trophy Prithvi Shaw included in Squad Ajinkya Rahane
Shreyas Iyer: श्रेयस अय्यरच्या खांद्यावर ‘या’ संघाने कर्णधारपदाची दिली जबाबदारी! अजिंक्य रहाणेही अय्यरच्या नेतृत्त्वाखाली खेळणार
Manoj Jarange Patil on Kalicharan
‘हिंदुत्व तोडणारा राक्षस’, कालीचरण यांच्या विधानानंतर मनोज जरांगे…
mahayuti will win 160 seats in maharashtra assembly election 2024
पदाची लालसा नाही!‘लोकसत्ता’च्या विशेष मुलाखतीत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा दावा
Challenges facing by political parties in Maharashtra state assembly elections 2024
लक्षवेधी लढत : प्रतिष्ठा, अस्तित्व आणि वर्चस्वाची लढाई
Who will be Chief minister if Mahayuti wins
महायुतीचा विजय झाल्यास मुख्यमंत्री कोण होणार? भाजपाकडून मिळालेले ‘हे’ संकेत महत्त्वाचे
NCP Ajit Pawar group
Nawab Malik : “आम्ही किंगमेकर राहणार, आमच्याशिवाय कोणतंही सरकार…”, अजित पवार गटाच्या नेत्याचं मोठं विधान
Amit Shah IMP Statement about CM Post
Amit Shah : ‘महायुतीचं सरकार आल्यास मुख्यमंत्री कोण?’ अमित शाह म्हणाले, “नेतृत्व…”
Dhananjay Mahadik
Dhananjay Mahadik : धनंजय महाडिक आगीतून फुफाट्यात? महिलांबाबत केलेल्या वक्तव्यावरून माफी मागताना नवं वक्तव्य, म्हणाले…

आतापर्यंत ४ भारतीयांनी आयसीसी प्रमुखपद भूषवले –

आतापर्यंत ४ भारतीयांनी आयसीसी प्रमुखपद भूषवले आहे. जगमोहन दालमिया १९९७-२००, शरद पवार २०१०-२०१२, एन श्रीनिवासन २०१४-१५ आणि शशांक मनोहर २०१५-२०२० पर्यंत आयसीसीचे अध्यक्ष होते. जय शाह आता आयसीसीचे नवे बॉस बनणारे पाचवे भारतीय ठरले आहेत. आयसीसी चेअरमन पदासाठी अर्ज करणारे एकमेव अर्जदार जय शाह होते. यासह जय शाह यांची अध्यक्षपदासाठी बिनविरोध निवड झाली. येत्या १ डिंसेबर २०२४ पासून जय शाह आयसीसीच्या अध्यक्षपदाचा पदभार स्वीकारतील.

हेही वाचा – Suryakumar Yadav Injury : सूर्याच्या दुखापतीबद्दल मोठी अपडेट! दुलीप ट्रॉफी खेळणार की नाही? टीम इंडियाची वाढली डोकेदुखी

जय शाहांचा क्रिकेट व्यवस्थापनातील प्रवास –

जय शाहांचा क्रिकेट व्यवस्थापनातील प्रवास २००९ मध्ये सुरू झाला, जेव्हा त्यांनी जिल्हा स्तरावर सेंट्रल क्रिकेट बोर्ड अहमदाबाद (सीबीसीए) मध्ये काम करण्यास सुरुवात केली. त्यानंतर ते गुजरात क्रिकेट असोसिएशन (जीसीए) मध्ये सामील झाले आणि २०१३ मध्ये संयुक्त सचिव झाले. भारतीय क्रिकेट नियामक मंडळाचे (बीसीसीआय) सचिव म्हणून काम करताना जय शाह यांनी आपल्या कार्यक्षमतेने आणि कठोर परिश्रमाने सर्वांना प्रभावित केले. त्यांचे खेळाडूंशी असलेले चांगले संबंध आणि व्यवस्थापन कौशल्य यामुळे त्यांना या पदापर्यंत पोहोचवले आहे.