Azam Khan father Moin Khan slams PCB Former Chief Ramiz Raja : माजी कसोटी कर्णधार आणि आझम खानचे वडील मोईन खान पाकिस्तान क्रिकेट बोर्डावर संताप व्यक्त केला आहे. मोईन खान म्हणाला की, आझम खानला गेल्या अनेक वर्षांपासून ज्या पद्धतीने वागणूक दिली जात आहे. त्यामुळे त्याच्या मुलाचा आत्मविश्वास दुखावला आहे. त्याचबरोबर त्याने मुलाच्या कारकिर्दीत झालेल्या नुकसानास पीसीबीचे माजी अध्यक्ष रमीझ राजा यांना जबाबदार धरले आहे. तसेच मोईन खान म्हणाला की, २०२४ मधील टी-२० विश्वचषकादरम्यान पाकिस्तानने खेळलेले सर्व सामने पाहिल्यानंतर, तो आत्मविश्वासाने सांगू शकतो की यष्टिरक्षक फलंदाजाच्या भूमिकेसाठी त्याचा मुलगा सर्वात योग्य आहे.

काय म्हणाला मोईन खान?

मोईन खान म्हणाला, “मी संपूर्ण विश्वचषक आणि त्याआधीचे सामने पाहिले. त्यामुळे मला असे वाटले की यष्टीरक्षण फलंदाज म्हणून आझम हाच पहिल्या पसंतीचा खेळाडू होता. त्यानंतर अचानक एका सामन्यानंतर संपूर्ण रणनीती बदलण्यात आली. त्याला एका सामन्यानंतर यष्टीरक्षण करण्याची संधी देण्यात आली नाही. त्याचबरोबर पहिल्याच चेंडूवर तो बाद झाल्यानंतर त्याला संघातून बाहेर बसवण्यात आले.” अमेरिकेविरुद्धच्या सलामीच्या सामन्यात पहिल्या चेंडूवर खाते न उघडता बाद झाल्यानंतर आझमला भारताविरुद्धच्या सामन्यातून वगळण्यात आले.

Saif Ali Khan And Arvind Kejriwal
Saif Ali Khan : “गुजरातच्या तुरुंगात बसलेला गुंड…” सैफ अली खानवरील हल्ल्यानंतर लॉरेन्स बिश्नोईचे नाव घेत केजरीवालांकडून भाजपा लक्ष्य
Ayurvedic Natural Remedies | Health Tips Ayurvedic Remedies
…तर औषधाची गरजच नाही! वाचा निरोगी आयुष्य जगण्यासाठी…
saif ali khan treatment at lilavati hospital who is dr nitin dange
सैफ अली खान ‘आऊट ऑफ डेंजर’! अभिनेत्याची शस्त्रक्रिया करणारे मराठमोळे डॉ. नितीन डांगे आहेत तरी कोण? मध्यरात्री केली धावपळ
Saif Ali Khan Attack
Saif Ali Khan : “फक्त सैफ अली खान याचं आडनाव खान आहे म्हणून…”, हल्ल्याबाबत गंभीर शंका घेणार्‍या आव्हाडांना गृहराज्यमंत्र्यांचं प्रत्युत्तर
saif ali khan stabbed
Saif Ali Khan Attacked : “सैफ अली खान यांच्यावर झालेला हल्ला हा पूर्वनियोजित कटाचा भाग?”, जितेंद्र आव्हाडांनी उपस्थित केली गंभीर शंका
Saif Ali Khan
“धक्का बसला…”, सैफ अली खानवर झालेल्या हल्ल्यावर दाक्षिणात्य सिनेसृष्टीतून पहिली प्रतिक्रिया; दाक्षिणात्य सुपरस्टार म्हणाला…
kaeena kapoor khan reaction on saif ali khan attack
“कुटुंबातील इतर सदस्य…”, पती सैफ अली खानवर झालेल्या हल्ल्याबद्दल करीना कपूरची पहिली प्रतिक्रिया
ROHIT Pawar
सैफ अली खानवर झालेल्या हल्ल्यानंतर रोहित पवारांची प्रतिक्रिया, म्हणाले, “प्रसिद्ध अभिनेत्याचं घर सुरक्षित नसेल तर…”

खेळाडू घडवण्याची परंपरा आता राहिलेली नाही –

आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये ६००० हून अधिक धावा करणारा मोईन खान म्हणाला, “कोणताही खेळाडू पहिल्या चेंडूवर बाद होऊ शकतो. मात्र, येथे खेळाडू घडवण्याची परंपरा आता राहिलेली नाही. कर्णधार असो की व्यवस्थापन, जर ते वारंवार खेळाडू बदलत असतील तर आपण चांगले खेळाडू कसे घडवणार?” मोईनने आपल्या मुलाच्या नुकसानीसाठी मिळालेल्या वागणुकीसाठी पीसीबीचे माजी अध्यक्ष रमीझ राजा यांना जबाबदार धरले.

हेही वाचा – ‘मला त्याच्याविरुद्ध खेळताना…’, मिचेल स्टार्कचे विराटबरोबरच्या स्पर्धेबाबत मोठे वक्तव्य; म्हणाला, ‘आमच्या दोघात…’

रमीझ राजाने युवा खेळाडूचे मनोधैर्य खचवण्याचे काम केले –

मोईन खान म्हणाला की माजी क्रिकेटपटूने पीसीबीचे अध्यक्षपद स्वीकारताच, त्याने आझमला २०२१ टी-२० विश्वचषक संघातून वगळले. ज्यावर मोईन खान म्हणाला, ‘त्यावेळी मुख्य निवडकर्त्याने चुकीची निवड केली होती, तर त्याला काढून टाकायला हवे होते, पण त्याच्यात ती हिंमत नव्हती आणि परिणामी त्याने एका युवा खेळाडूचे मनोधैर्य खचवण्याचे काम केले.’ मात्र, मोईनने हे देखील कबूल केले की आझममध्ये काही कमतरता आहेत आणि तो त्याचा फिटनेस सुधारण्यासाठी कठोर परिश्रम घेत आहे.

हेही वाचा – कोण आहेत टीम इंडियाचे भावी विराट-रोहित? पियुष चावलाने सांगितली ‘या’ दोन खेळाडूंची नावं

मुलाच्या फिटनेसवर मोईन खानची प्रतिक्रिया –

मुलाच्या फिटनेसबद्दल मोईन खान म्हणाला, “सगळी चूक संघ व्यवस्थापन आणि कर्णधाराची आहे, असे मी म्हणत नाही. आझममध्येही काही कमतरता आहेत. त्यानी स्वत:ला शारीरिक आणि मानसिकदृष्ट्या मजबूत बनवण्याची गरज आहे. त्याला इतर खेळाडूंच्या फिटनेस रूटीनचे पालन करावे लागेल. गेल्या महिनाभरात, मी त्याला त्याचा प्रशिक्षक शाहजार मोहम्मदसोबत फिटनेस सुधारण्यासाठी कठोर परिश्रम करताना पाहिले आहे. ज्याने त्याला कॅरेबियन लीगमध्येही नेले आहे. मला आशा आहे की आझमने या अनुभवातून बरेच काही शिकले असेल.”

Story img Loader