श्रीकांत मोलागिरी व अभिषेक दैठणकर यांना पुणे जिल्हा फुटबॉल संघटनेतर्फे अनुक्रमे अव्वल श्रेणी व द्वितीय श्रेणी गटांतील सवरेत्कृष्ट खेळाडूचा मान मिळाला. प्रथम श्रेणी व तृतीय श्रेणी विभागात अनुक्रमे नईम सय्यद व साहील डावर यांना सवरेत्कृष्ट खेळाडू पारितोषिक देण्यात आले. सवरेत्कृष्ट गोलरक्षक म्हणून एस.रायनीकुमार (अव्वल श्रेणी), सिद्धार्थ खामकर (प्रथम श्रेणी), सूरज बहादूर (द्वितीय श्रेणी) व विन्लँड डीसूझा (तृतीय श्रेणी) यांची निवड करण्यात आली. महिलांमध्ये अलिशाराणी खेतवाला हिला सवरेत्कृष्ट खेळाडूचे पारितोषिक देण्यात आले, तर वेदांगी कुलकर्णी हिला सवरेत्कृष्ट गोलरक्षकाचे बक्षीस देण्यात आले. अव्वल श्रेणी गटातील विजेता डीएसके शिवाजीयन्स व उपविजेता डेक्कन रोव्हर्स ‘अ’, प्रथम श्रेणी गटातील विजेता डेक्कन रोव्हर्स ‘ब’ व उपविजेता आर्यन्स स्पोर्ट्स फाउंडेशन, द्वितीय श्रेणी गटातील विजेता बिशप्स कोट्स व उपविजेता एलान क्लब, तृतीय श्रेणी गटातील विजेता फातिमा इलेव्हन व उपविजेता उत्कर्ष क्कीडा संघ यांचा जिल्हा संघटनेतर्फे संघटनेचे अध्यक्ष विश्वजित कदम, उपाध्यक्ष प्यारेलाल चौधरी, मानद सचिव प्रदीप परदेशी यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.

Story img Loader