RCB won WPL 2024 Trophy : डब्ल्यूपीएल २०२४ च्या अंतिम सामन्यात आरसीबीने दिल्ली कॅपिटल्स संघाचा ८ गडी राखून पराभव केला. आयपीएल आणि डब्ल्यूपीएल या दोन्ही लीग एकत्र करून आरसीबीचे हे पहिले विजेतेपद आहे. अंतिम सामन्यात दिल्ली कॅपिटल्स संघाने प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला, जो चुकीचा ठरला. या सामन्यात दिल्ली कॅपिटल्सने आरसीबीला विजयासाठी ११४ धावांचे लक्ष्य दिले, त्याला प्रत्युत्तर म्हणून आरसीबीने सहज लक्ष्याचा पाठलाग केला. या सामन्यानंतर कोणाला कोणता पुरस्कार मिळाला जाणून घेऊया.
डब्ल्यूपीएलच्या इतिहासात पहिल्यांदाच हे घडले –
महिला प्रीमियर लीगच्या इतिहासात पहिल्यांदाच एखाद्या संघाने डब्ल्यूपीएलचे विजेतेपद पटकावले आहे आणि त्याच संघाच्या खेळाडूंनी ऑरेंज कॅप आणि पर्पल कॅपही जिंकली आहे. एलिस पेरीने आरसीबीकडून ऑरेंज कॅप जिंकली आहे. तिने डब्ल्यूपीएल २०२४ मध्ये सर्वाधिक धावा केल्या आहेत. याशिवाय श्रेयंका पाटीलने आरसीबीसाठी अप्रतिम कामगिरी करत स्पर्धेत सर्वाधिक विकेट्स घेतल्या आहेत. याच कारणामुळे तिला पर्पल कॅप मिळाली आहे. उदयोन्मुख खेळाडूचा पुरस्कारही श्रेयंकाच्या खात्यात गेला आहे.
सोफी मोलिनक्स ठरली सामनावीर –
सोफी मोलिनक्स अंतिम सामन्यात आरसीबीसाठी शानदार गोलंदाजी करताने एका षटकात तीन विकेट्स घेत सामन्याची बाजू पलटली. तिने चार षटकात २० धावा देऊन तीन विकेट्स घेतल्या. तिला सामनावीराचा पुरस्कार देण्यात आला. आरसीबी च्या जॉर्जिया वेरहॅमला डब्ल्यूपीएल २०२४ चा ‘सुपर स्ट्रायकर ऑफ द सीझन’ पुरस्कार देण्यात आला. तिने १६३.२३ च्या स्ट्राइक रेटने १११ धावा केल्या आणि बंगळुरूसाठी महत्त्वपूर्ण धावा केल्या. आरसीबीने डब्ल्यूपीएल २०२४ मध्ये विजेतेपद पटकावले आहे. यानंतर आरसीबीच्या खेळाडूंनी ऑरेंज कॅप, पर्पल कॅप, इमर्जिंग प्लेयर ऑफ द सीझन, फायनलमधील प्लेअर ऑफ द मॅच, सुपर स्ट्रायकर ऑफ द सीझन आणि फेअर प्ले अवॉर्ड जिंकले आहेत.
हेही वाचा – आव्हानांचा निडरपणे सामना केल्यानेच अश्विन यशस्वी! भारताचा माजी कर्णधार कुंबळेकडून स्तुती
डब्ल्यूपीएल २०२४ चे सर्व पुरस्कार विजेते:
विजेता (६ कोटी रुपये) – रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु
उपविजेता (३ कोटी रुपये) – दिल्ली कॅपिटल्स<br>उदयोन्मुख खेळाडू (५ लाख रुपये) – श्रेयंका पाटील (आरसीबी)
सर्वात मौल्यवान खेळाडू (५ लाख रुपये) – दीप्ती शर्मा (यूपीडब्ल्यू)
ऑरेंज कॅप (५ लाख रुपये) – एलिस पेरी (आरसीबी)
पर्पल कॅप (५ लाख रुपये) – श्रेयंका पाटील (आरसीबी)
सर्वाधिक षटकार मारले (५ लाख रुपये) – शफाली वर्मा (दिल्ली कॅपिटल्स)
सुपर स्ट्रायकर ऑफ द सीझन (५ लाख रुपये) – जॉर्जिया वेअरहम (आरसीबी)
हंगामातील कॅच (५ लाख रुपये) – एस. सजना (एमआय)
फेअर प्ले अवॉर्ड (५ लाख रुपये) – रॉयल चॅलेंजर्स बंगलोर
अंतिम सामन्यातील सर्वोत्कृष्ट खेळाडू (२.५ लाख रुपये) – सोफी मोलिनक्स (आरसीबी)
हंगामातील सर्वोत्तम झेल (५ लाख रुपये) – संजना सजीवन (मुंबई इंडियन्स)
मोसमातील सर्वाधिक षटकार (५ लाख रुपये) – शफाली वर्मा (दिल्ली कॅपिटल्स)
अंतिम सामन्यात सर्वाधिक षटकार (१ लाख रुपये)- शफाली वर्मा (दिल्ली कॅपिटल्स)
डब्ल्यूपीएल २०२४ मधील सर्वोच्च धावसंख्या- हरमनप्रीत कौर (मुंबई इंडियन्स)