India vs New Zealand ICC Cricket World Cup 2023 Match Updates: धरमशाला येथील हिमाचल प्रदेश क्रिकेट स्टेडियमवर भारत आणि न्यूझीलंड यांच्यात विश्वचषक २०२३ चा २१ वा सामना खेळला गेला. या सामन्यात भारताने न्यूझीलंडचा ४ गडी राखून पराभव करताना २० वर्षांनंतर ऐतिहासिक विजयाची नोंद केली आहे. या सामन्यात विराट कोहलीचे शतक हुकले. मात्र, चाहते या सामन्याची आतुरतेने वाट पाहत होते. कारण, दोन्ही संघांनी या स्पर्धेत एकही सामना गमावला नव्हता आणि ही टेबल टॉपर होण्यासाठीची लढाई होती. सामन्यादरम्यान संपूर्ण स्टेडियम प्रेक्षकांनी खचाखच भरले होते. मैदानावर या सामन्याची क्रेझ सुरू असतानाच, ऑनलाइन ओटीटी प्लॅटफॉर्मवर विक्रमी संख्येने लोकांनी हा शानदार सामना थेट पाहिला. या विश्वचषकाच्या सामन्याने प्रेक्षकसंख्येचे सर्व जुने विक्रम मोडीत काढले.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

भारत-न्यूझीलंड सामन्याने रचला इतिहास –

डिज्नी प्लस हॉटस्टारवर ३.५ कोटींहून अधिक लोक भारत-न्यूझीलंड सामना एकाच वेळी पाहत होते. विराट कोहली आणि रवींद्र जडेजा एकत्र सामना संपवत होते, तेव्हा विक्रमी ४.३ कोटी प्रेक्षक सामना पाहत होते. त्यामुळे भारत-न्यूझीलंड सामन्यात भारत-पाकिस्तान सामन्याचा विक्रम मोडला गेला. याच महिन्यात, १४ ऑक्टोबर रोजी, ३.५ कोटी लोकांनी हॉटस्टारवर भारत-पाकिस्तान सामना एकाच वेळी पाहिला होता. यापूर्वी आशिया चषक २०२३ दरम्यान २.८ कोटी लोकांनी ऑनलाइन सामना पाहिला होता.

वास्तविक, एकदिवसीय विश्वचषक २०२३ सामन्यांचे प्रसारण हक्क स्टार स्पोर्ट्स नेटवर्ककडे आहेत. याशिवाय चाहते डिज्नी प्लस हॉटस्टारवर लाईव्ह स्ट्रीमिंग पाहू शकतात. विशेष म्हणजे विक्रमी ३.७ कोटी लोकांनी भारत-न्यूझीलंड सामना डिज्नी प्लस हॉटस्टार अर्थात ओटीटीवर लाइव्ह पाहिला. हा आतापर्यंतचा सर्वात मोठा विक्रम आहे. आतापर्यंत एवढ्या मोठ्या संख्येने लोकांनी क्रिकेटचा सामना कधी लाइव्ह पाहिला नव्हता.

आशिया चषक २०२३ दरम्यान भारत आणि पाकिस्तान यांच्यात खेळला गेलेला सुपर फोरचा सामना २.८ कोटी लोकांनी लाइव्ह पाहिला होता. त्यानंतर त्याने जुने रेकॉर्ड तोडले होते. बीसीसीआयचे सचिव जय शाह यांनी स्वतः एक्स (पूर्वीचे ट्विटर) वर ही माहिती दिली होती. त्याचबरोबर या विश्वचषकात भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील सामना अडीच कोटींहून अधिक लोकांनी लाइव्ह पाहिला. तसेच, २०१९ एकदिवसीय विश्वचषकातील भारत-न्यूझीलंड सामना २.५२ कोटी लोकांनी लाइव्ह पाहिला होता.

हेही वाचा – IND vs NZ: “…सबका बदला लेगा तेरा चिकू”; माहीच्या नावाचं पोस्टर व्हायरल होताच, चाहत्यांना झाली धोनीच्या रनआऊटची आठवण

सामन्याबद्दल बोलायचे, तर न्यूझीलंड संघाने प्रथम फलंदाजी करताना ५० षटकांत सर्व १० गडी गमावून २७३ धावा केल्या होत्या. न्यूझीलंडकडून डॅरिल मिशेलने सर्वाधिक १३० धावा केल्या. त्याचबरोबर रचिन रवींद्रने ७५ धावांचे योगदान दिले. भारताकडून मोहम्मद शमीने सर्वाधिक पाच विकेट्स घेतल्या. प्रत्युत्तरात टीम इंडियाने ४८ षटकांत ६ गडी गमावून विजय मिळवला. भारताकडून विराट कोहलीने सर्वाधिक ९५ धावांचे योगदान दिले.

मराठीतील सर्व क्रीडा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: More than three and a half crore people watched the india vs new zealand match live on the online ott platform vbm