भारतीय क्रिकेट संघाचा जलदगती गोलंदाज मोहम्मद शमीसमोरच्या तक्रारी काही केल्या कमी होण्याचं नाव घेत नाहीयेत. पत्नी हसीन जहाँने शमीविरोधात कोलकात्याच्या लाल बाझार पोलीस स्थानकात तक्रार दाखल केली आहे. काही दिवसांपूर्वीच हसीन जहाँने शमीचे इतर मुलींसोबत अनैतिक संबंध असल्याचा आरोप केला होता. आपल्या आरोपांना पुष्टी देण्यासाठी हसीनने शमीच्या फोनवरील संभाषणाचे काही स्क्रिनशॉट आपल्या फेसबूक अकाऊंटवर टाकले होते. मात्र शमीने आपल्यावरील सर्व आरोप फेटाळले होते.

आफ्रिका दौऱ्यावरुन परत आल्याने शमीला आपल्याला मारहाण करत जीवे मारण्याची धमकी दिल्याचा आरोपही हसीन जहाँने केला होता. आज पोलीस स्थानकात तक्रार दाखल करताना हसीनने शमीसोबत त्याच्या घरच्यांविरोधातही तक्रार दाखल केल्याचं समजतं आहे. या आरोपांनंतर बीसीसीआयने मोहम्मद शमीचा वार्षिक करार राखून ठेवला होता.

अवश्य वाचा – ……तर बिनशर्त माफी मागेन, पत्नीच्या आरोपांवर मोहम्मद शमीची प्रतिक्रीया

Story img Loader