Concussion Controversy in IND vs ENG 4th T20I : भारत विरुद्ध इंग्लंड यांच्यातील चौथा टी-२० सामना पुण्यात पार पडला. या सामन्यात भारताने इंग्लंडचा १५ धावांनी पराभव करत मालिकेत ३-१ ने अभेद्य आघाडी घेतली. कनक्शन सब्स्टिट्यूट म्हणून मैदानात उतरलेल्या हर्षित राणाने सामन्याला कलाटणी दिली. त्याने इंग्लंडच्या तोंडातील विजय हिसकावून घेत भारताच्या पारड्यात टाकला, ज्यामुळे भारताने सामन्यात बाजी मारली. त्याने तीन विकेट्स घेत महत्त्वाची भूमिका बजावली. ज्यामुळे आता यावरुन वाद सुरु आहे. यावर बॉलिंग कोच मॉर्ने मॉर्केलने महत्त्वाची प्रतिक्रिया दिली.

भारताने सामना जिंकल्यानंतर कनक्शन सब्स्टिट्यूटचा विषय ठरला. विशेषत: हर्षित राणाचे नाव वादात सापडले आहे. शिवम दुबे फलंदाजी करत असताना त्याचा हेल्मेटला चेंडू लागला होता. त्यामुळे कनक्शन सब्स्टिट्यूट म्हणून हर्षित राणाला संधी मिळाली. हर्षितने या सामन्यात एकूण ३ विकेट्स घेत मॅच विनिंग कामगिरी केली. आता भारतीय संघाचे गोलंदाजी प्रशिक्षक मॉर्नी मॉर्केल यांनी शिवम दुबे ड्रेसिंग रूममध्ये परतल्यानंतर काय झाले? याबद्दल सर्व काही सांगितले आहे.

मॉर्ने मॉर्केल काय म्हणाला?

चौथ्या सामन्यात भारताने विजय मिळाल्यानंतर मॉर्ने मॉर्केलने सामन्यानंतरच्या सादरीकरणात सांगितले की, “भारताचा डाव संपल्यानंतर शिवम दुबे ड्रेसिंग रूममध्ये परतला होता. तेव्हा त्याने सांगितले की त्याचे थोडे दुखत आहे. यानंतर आम्ही याबाबत मॅच रेफरीला सांगितले आणि बदली खेळाडू म्हणून एक नाव पुढे करण्यात आले. त्यानंतर, मॅच रेफरी अवलंबून असते की मान्यता द्यायची की नाही. मात्र, रेफरीने मान्यता दिला. हा निर्णय झाला, तेव्हा हर्षित राणा डिनर करत होता. अशा परिस्थितीत, आम्हाला शक्य तितक्या लवकर त्याला मैदानात उतरवून गोलंदाजीसाठी तयार करावे लागले.”

शिवम दुबेला कशी झाली दुखापत?

भारताने आठव्या षटकात ५७ धावांवर चौथी विकेट गमावली, तेव्हा शिवम दुबे फलंदाजीला आला. दुबेने येथून एक बाजू सांभाळत ३४ चेंडूत ५३ धावांची खेळी साकारली. या खेळीत त्याने ७ चौकार आणि २ षटकारही मारले. या खेळीदरम्यान, जेमी ओव्हरटनने टाकलेला बाऊन्सर चेंडू शिव शिवम दुबेच्या हेल्मेटवर आदला. त्यामुळे त्याला डोकेदुखीचा त्रास झाला. म्हणूनत्या त्याच्या जागी हर्षित राणाला कनक्शन सब्स्टिट्यूटच्या रुपाने मैदानात उतरवण्यात आले होते.

Story img Loader