एखाद्या क्रिकेटच्या सामन्यात पुरुष आणि महिला एकत्र खेळल्याचे फार क्वचितच पाहायला मिळते. मात्र, क्रिकेटमध्ये आई आणि तिच्या मुलाने नाबाद शतकी भागीदारी जोडत सामना जिंकवल्याचे तुम्ही ऐकले आहे का? नसेल तर तसे खरच घडले आहे. पुरुषांच्या एका क्लब सामन्यात आई आणि तिच्या मुलाने सलामीला येत चक्क १४३ धावांची नाबाद भागीदारी रचली. इतकेच नव्हे, तर या दोघांनी प्रतिस्पर्धी संघातील गोलंदाजांचा धुव्वा उडवत सामनाही खिशात टाकला.
ही घटना इंग्लंडच्या क्लब क्रिकेटमध्ये पाहायला मिळाली. इंग्लंडची माजी आंतरराष्ट्रीय क्रिकेटपटू एरेन ब्रिंडल आपल्या १२ वर्षाचा मुलगा हॅरीसह क्रिकेट खेळायला मैदानात आली. ओम्बी सीसी ट्रोजन्सकडून खेळणार्या ब्रिंडल आणि हॅरीने नेतालहॅम क्रिकेट अकादमी-११ विरूद्ध संघाला १० गड्यांनी विजय मिळवून दिला. ब्रिंडलने अर्धशतकी खेळी खेळली.
Former England cricketer Arran Brindle adds a new chapter in her trailblazing run – this time with her 12-year-old son Harry Brindle – in men’s cricket.https://t.co/d4QxvuVoQ6
— Express Sports (@IExpressSports) May 24, 2021
वयाच्या १९व्या वर्षी कर्णधार
इंग्लंड संघाकडून एरेन ब्रिंडलने १३४ आंतरराष्ट्रीय सामन्यांत २८५२ धावा केल्या. तिच्या काळात इंग्लंड संघाने तीन वेळा अॅशेसचे जेतेपदही जिंकले आहे. वयाच्या १९व्या वर्षी ब्रिंडल एकदिवसीय संघाची कर्णधार झाली. महिला क्रिकेटमध्ये हा मोठा विक्रम आहे. २००५च्या अॅशेसमध्ये ब्रिंडलने शानदार कामगिरी करून संघाला विजय मिळवून देण्यात महत्त्वपूर्ण भूमिका बजावली होती. याच कारणास्तव इंग्लिश संघ ४२ वर्षानंतर अॅशेस जिंकण्यात यशस्वी झाला. तिच्या पहिल्या कसोटीतील शतकाच्या जोरावर इंग्लंडने पहिला कसोटी सामना अनिर्णित राखला. त्यानंतर दुसऱ्या कसोटीतील विजयी धावेच्या वेळी ती खेळपट्टीवर उपस्थित होती.
अवश्य वाचा – विराट कोहलीचा ‘किलर’ लूक सोशल मीडियावर तुफान व्हायरल!
आई झाल्यानंतर क्रिकेटमधून घेतला होता ‘ब्रेक’
३९ वर्षीय ब्रिंडल आई झाल्यानंतर २००५ ते २०११ या काळात आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून बाहेर पडली. मात्र यादरम्यान ती क्लब क्रिकेट खेळत राहिली. पुरुषांच्या प्रीमियर लीग क्रिकेटमध्ये शतक झळकावणारी ती पहिली महिला खेळाडू आहे. फेब्रुवारी २०१४मध्ये ती निवृत्त झाले. ब्रिंडलने ११ कसोटीत ५५१ धावा केल्या. ८८ एकदिवसीय सामन्यात तिने १९२८ आणि ३५ बळी घेतले. ३५ टी-२० मध्ये ब्रिंडलने ३७३ धावा केल्या आणि २२ बळी घेतले.
अवश्य वाचा – कौतुक करावं तेवढं कमीच..! ‘पंड्या ब्रदर्स’नं दिलं करोना लढ्यात मोठं योगदान