MPL 2023 Puneri Bappa beat Kolhapur Tuskers by 8 wickets: महाराष्ट्र प्रीमियर लीगमधील पहिला सामना गुरुवारी पार पडला. या सामन्यात पुणेरी बाप्पा आणि कोल्हापूर टस्कर्स संघ आमनेसामने आले होते. या सामन्यात पुणेरी बाप्पा संघाने कर्णधार ऋतुराज गायकवाडच्या अर्धशतकाचच्या जोरावर ८ गडी राखून विजय मिळवला. सामन्यात प्रथम फलंदाजी करताना कोल्हापूर टस्कर्सने ७ बाद १४४ धावा केल्या होत्या. प्रत्युत्तरात पुणेरी बाप्पाने दोन गडी गमावून १४.१ षटकात १४५ धावा केल्या.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

११० धावांची भागीदारी –

प्रथम फलंदाजी करताना टस्कर्स संघाने २० षटकांत ७ गडी गमावून १४४ धावा केल्या. कोल्हापूर टस्कर्स संघाकडून अंकित बावणेने ५७ चेंडूत ७२ धावा केल्या. १४५ धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना पुणेरी संघाची सुरुवात दमदार झाली. पवन शहा आणि ऋतुराज गायकवाड यांच्यात ११० धावांची भागीदारी केली. दोघांनीही आपले अर्धशतके पूर्ण केली. गायकवाडने अवघ्या २२ चेंडूत ५० धावा पूर्ण केल्या होत्या.

गायकवाडच्या रूपाने पुणेरी संघाला ११० धावांवर पहिला धक्का बसला. तो ६४ धावा करून बाद झाला. यानंतर पवन शहा आणि सूरज शिंदे यांच्यात भागीदारी झाली. १४२ धावांवर पुणेरीची दुसरी विकेट शहाच्या रूपाने पडली. यानंतर सुजर शिंदेने यशच्या साथीने पुणेरी संघाला १४.१ षटकात ८ गडी राखून विजय मिळवून दिला. ऋतुराज गायकवाडला सामनावीरचा पुरस्कार देण्यात आला

हेही वाचा – Team India: रोहित शर्मानंतर भारतीय कसोटी संघाचा कर्णधार कोण? रहाणेशिवाय ‘हे’ चार खेळाडू प्रबळ दावेदार

पत्नीच्या नंबरची जर्सी घालून ऋतुराज खेळला –

ऋतुराज गायकवाड या सामन्यात पत्नीची १३ क्रमांकाची जर्सी घालून मैदानात उतरला होता. खरंतर त्याची पत्नी उत्कर्षा देखील एक क्रिकेटर आहे आणि तिचा जर्सी नंबर १३ आहे. त्याचवेळी ऋतुराज अनेकदा ३१ क्रमांकाच्या जर्सीत दिसला होता, मात्र यावेळी तो १३ क्रमांकाची जर्सी परिधान करुन खेळताना दिसला.

मराठीतील सर्व क्रीडा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Mpl 2023 first match puneri bappa beat kolhapur tuskers by 8 wickets vbm
Show comments