इंग्लंडचा जेम्स अँडरसन, दक्षिण आफ्रिकेचा हशिम अमला आणि ऑस्ट्रेलियाचा मायकेल क्लार्क या तिघांना सर गारफिल्ड सोबर्स वर्षांतील सर्वोत्तम क्रिकेटपटूचा पुरस्कार आणि वर्षांतील सर्वोत्तम क्रिकेटपटूचा पुरस्कार अशा दोन्ही ठिकाणी नामांकने मिळाली आहे. आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेचा (आयसीसी) वार्षिक पुरस्काराचा कार्यक्रम १४ डिसेंबरला टीव्हीवर प्रसारित करण्यात येणार आहे. मंगळवारी मुंबईत झालेल्या पत्रकार परिषदेत आयसीसीचे मुख्य कार्यकारी डेव्हिड रिचर्डसन यांनी एलजी आयसीसी पुरस्कारांसाठीची नामांकन यादी घोषित केली.
वर्षांतील सर्वोत्तम क्रिकेटपटूच्या प्रतिष्ठेच्या पुरस्कारासाठी इंग्लंडचा कप्तान अॅलिस्टर कुक, भारताचा कप्तान महेंद्रसिंग धोनी आणि श्रीलंकेचा कुमार संगकारा यांनाही नामांकने मिळाली आहेत. तथापि, वर्षांतील सर्वोत्तम कसोटीपटूसाठी दक्षिण आफ्रिकेचा डेल स्टेन याचप्रमाणे भारताचा आर. अश्विन आणि चेतेश्वर पुजारा यांना मानांकने मिळाली आहेत.
धोनी आणि संगकारा या दोघांनी वर्षांतील सर्वोत्तम क्रिकेटपटू आणि एकदिवसीय क्रिकेटपटू या दोन्ही पुरस्कारांच्या नामांकनांमध्ये स्थान मिळवले आहे. सर्वोत्तम एकदिवसीय क्रिकेटपटूच्या पुरस्कारासाठीच्या मानांकनांमध्ये पाकिस्तानचे मिसबाह उल हक आणि सईद अजमल याचप्रमाणे भारताचे शिखर धवन आणि रवींद्र जडेजा यांचीही नावे आहेत. ७ ऑगस्ट २०१२ ते २५ ऑगस्ट २०१३ या कालावधीमधील खेळाडूंच्या कामगिरीच्या आधारे आयसीसीच्या समितीने ही मानांकन यादी जाहीर केली आहे.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा