Anant Radhika’s Pre-Wedding Ceremony : भारतातील सर्वात मोठे उद्योगपती मुकेश अंबानी यांचा धाकटा मुलगा अनंत अंबानी आणि राधिका मर्चंट लवकरच लग्न करणार आहेत. अशा परिस्थितीत अंबानी कुटुंब या दोघांच्या वेडिंगच्या तयारीत व्यस्त आहे, हे लग्न इतके भव्यदिव्य होणार आहे की शतकानुशतके जगभर स्मरणात राहील. रिपोर्ट्सनुसार, या लग्नाला फिल्म स्टार्ससह जगभरातील प्रसिद्ध उद्योगपती आणि कलाकार उपस्थित राहणार आहेत. अनंत राधिकाचा प्री-वेडिंग सोहळा १ मार्च ते ३ मार्च दरम्यान जामनगरमध्ये आयोजित केला आहे. त्यात उपस्थित राहण्यासाठी भारतीय संघाचा सर्वात यशस्वी कर्णधार एमएस धोनी पत्नी साक्षीसह जामनगरला रवाना झाला आहे.

भारतीय संघाचा सर्वात यशस्वी कर्णधार एमएस धोनी पत्नी साक्षीसह अनंत अंबानी आणि राधिका मर्चंट यांच्या प्री-वेडिंगला उपस्थित राहण्यासाठी जामनगरला रवाना झाला आहे. एमएस धोनीचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर वेगाने व्हायरल होत आहे. ज्यामध्ये एमएस धोनी मरून रंगाचा हाफ टी-शर्ट आणि काळ्या रंगाची जीन्स परिधान करून पांढऱ्या कारमधून खाली उतरताना दिसत आहे. एमएस धोनीने चेहऱ्यावर मास्क लावला आहे. साक्षी गाडीच्या मागच्या सीटवर बसली आहे. त्याची लाडकी मुलगी झिवा धोनी आणि साक्षीबरोबर दिसली नाही. हे दोघेही झिवाशिवाय प्री-वेडिंगला हजेरी लावणार आहेत.

Suspect related to Babbar Khalsa arrested from Mumbai NIA takes action
बब्बर खालसाशी संबंधित संशयीताला मुंबईतून अटक, एनआयएची कारवाई
Madhuri Dixit Refused Darr Offer Do You Know The Reason?
Madhuri Dixit : डर चित्रपट माधुरी दीक्षितने का…
Navri Mile Hitlarla
Video: ‘नवरी मिळे हिटलरला’मधील एजे-लीलाच्या रोमँटिक सीनचे ‘असे’ झाले शूटिंग; पाहा व्हिडीओ
police arrested accused who looted citizens with fear of Knife
चाकूचा धाक दाखवून पादचाऱ्यांची लूटमार
Baba Siddiqui murder case Accused suspected of training in Naxal affected areas Mumbai news
बाबा सिद्दीकी हत्या प्रकरणः आरोपींनी नक्षलग्रस्त भागात प्रशिक्षण घेतल्याचा संशय
Rishabh Pant Becomes 3rd Indian Keeper To Complete 150 Dismissals in Just 41 Matches IND vs AUS
IND vs AUS: ऋषभ पंतने गाबा कसोटीत घडवला इतिहास, १५० चा आकडा पार करत धोनी-द्रविडच्या मांदियाळीत मिळवलं स्थान
allu arjun hospital video
Video: पोलिसांनी अल्लू अर्जुनला नेलं वैद्यकीय तपासणीसाठी, रुग्णालयातील व्हिडीओ आला समोर
mumbai best bus crash driver gets police remand till dec 21
कुर्ला अपघातःचालकाला सदोष मनुष्यवधाच्या गुन्ह्यांत अटक; २१ डिसेंबरपर्यंत पोलीस कोठडी

अनंत-राधिकाच्या प्री-वेडिंग सेरेमनीमध्ये प्रत्येक दिवसासाठी खास थीम ठेवण्यात आली आहे. पहिल्या दिवसाची थीम “एव्हरलँडमधील संध्याकाळ” आहे, ज्याचा ड्रेस कोड “एलिगंट कॉकटेल” आहे. दुसऱ्या दिवसाचा ड्रेस कोड “जंगल फीवर” आहे आणि दिवसाची थीम “अ वॉक ऑन द वाइल्डसाइड” आहे जी जामनगर येथील अंबानी कुटुंबाच्या प्राणी बचाव केंद्रात आयोजित केली जाईल. शेवटच्या दिवशी दोन कार्यक्रम आयोजित केले जातील.

हेही वाचा – NZ vs AUS : ग्रीन-हेझलवूडची शेवटच्या विकेटसाठी विक्रमी भागीदारी, कॅमेरूनच्या शतकाने सावरला ऑस्ट्रेलियाचा डाव

ज्यामध्ये पहिल्या कार्यक्रमाचे नाव आहे “टस्कर ट्रेल्स” ज्याचा ड्रेस कोड “कॅज्युअल चिक” आहे. शेवटच्या पार्टीचे नाव “हस्तक्षर” आहे. ज्यामध्ये सर्व पाहुण्यांना भारतीय पोशाख परिधान करून उत्सवाला उपस्थित राहावे लागेल. गाईडमध्ये पाहुण्यांना ड्रेस कोड समजावून सांगितला असला तरी, त्यांना त्यांच्या सोयीनुसार कपडे घालण्याचा पर्याय देखील आहे. जेणेकरून ते या कार्यक्रमाचा पुरेपूर आनंद घेऊ शकतात.

हेही वाचा – Shreevats Goswami : क्रिकेट जगतात खळबळ! बंगालच्या माजी क्रिकेटपटूने केला मॅच फिक्सिंगचा आरोप, वाचा नेमकं प्रकरण?

अहवालानुसार, त्यांच्या लग्नात पाहुण्यांसाठी सुमारे २,५०० डिश तयार केल्या जातील ज्यात थाई, जपानी, मेक्सिकन, पारशी आणि पॅन आशियाई यासह जागतिक पाककृतींचा समावेश असेल. यासाठी १० महिला शेफसह ६५ शेफ आणि पदार्थांनी भरलेले चार ट्रक इंदूरहून जामनगरला पोहोचले आहेत. याशिवाय, तेथे एक विशेष इंदूर सराफा फूड काउंटर देखील स्थापित केले जाईल, जे इंदोरी कचोरी, पोहे जलेबी, भुत्ते की कीस, खोपरा पॅटीस, उपमा आणि इतर प्रसिद्ध पदार्थांचा समावेश आहे.

Story img Loader